Friday, September 23, 2022

कर्तुत्व व दात्रुत्वाचा अनोखा संगम..प्रचंड ऊर्जेचा खळाळणारा झरा.लिंगायत समाजाचे खंबीर लोकनेते मा. ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे.

 

कर्तुत्व व दात्रुत्वाचा अनोखा संगम..प्रचंड ऊर्जेचा खळाळणारा झरा.लिंगायत समाजाचे लोकनेते मा. ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे.



कर्तुत्व व दात्रुत्वाचा अनोखा संगम..प्रचंड ऊर्जेचा खळाळणारा झरा.लिंगायत समाजाचे लोकनेते मा. ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे.

सातारा दि २२ :- प्रा अजय शेटे प्रतिनिधी 

 महात्मा बसवेश्वरांचा मूलमंत्र "काय कवे कैलास" हाच आपला जिवनमंत्र समजून अपार कष्टाने अक्षरशः फटाके विकणे,लाँटरीची तिकिटे विकणे , किराणा व्यवसाय ते बांधकाम व्यावसायिक ते सहकार, ब्ंँकिंग ,शैक्षणिक ,सामाजिकअशा सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळविणारे एकमेव लिंगायत लोकनेते काकासाहेब..सण 1980 च्या दशकात काका युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यावेळचे देशातील युवा नेते संजय गांधी काकासाहेबांच्या पक्षातील कामाने प्रभावित होऊन खास काकासाहेबांना दिल्ली हून भेटावयास आले 



 विधानसभेची उमेदवारी देऊ केली होती परंतु अतिशय उदार मनाने आलेली आमदारकी परत करणारे काकासाहेब...महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष झाल्यावर काकांनी सुमारे 1.5 लाख किलोमीटरचा प्रवास करून  खिचपत व दुर्लक्षित झालेल्या लिंगायत समाजाचे 2000साली नांदेड येथे सुमारे २ लाख समाज बांधवांचे महाअधिवेशन घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांना  समाजाच्या अनेक मागण्या अधिवेशन स्थळिच मान्य करावयास लाऊन समाजाची ताकद सर्व प्रथम दाखवून लिंगायत समाजात नवचैत्यन्य निर्माण करणारे खरे लिंगायत लोकनेते काकासाहेब कोयटे...व्यावसायिक समाज असणार्या आपल्या समाजात महाराष्ट्रातील ,देशातील नव्हे तर सबंध जगातील उद्योगपति,व्यावसायिक,यांना एकत्र करून लिंगायत भुषण बाबासाहेब कल्याणींच्या मार्गदर्शनाने वीरशैव लिंगायतांची एकमेव "वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन" स्थापन करून एक्स्पो, प्रदर्शन,उद्योग मेळावे, नोकरी महोत्सव या माध्यमातून हजारो लिंगायत तरुण तरुणींना व्यवसाय व नोकरी ला लाऊन खरया अर्थाने महात्मा बसवेश्वरांचा मूलमंत्र सत्यात उतरवीणारे वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे...महाराष्ट्रातील सुमारे 25000 पतसंस्थाची शिखर संस्था असणार्या महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे ऐकमेव लिंगायत अध्यक्ष काकासाहेब...जागतिक सहकारी परीषदेचे भारताचे प्रतिनिधित्व व खजिनदार पद भुषविणारे एकमेव नेते तेही लिंगायत अर्थातच काकासाहेब कोयटे...लिंगायत समाजाला OBC चा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व लिंगायत संघटनांना एकत्र करून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मार्गदर्शनाने "लिंगायत संघर्ष समिती" स्थापन करून लिंगायतांचा मुंबई येथे आझाद मैदान येथे मोर्चा 


, सबंध महाराष्ट्र भर मोर्चे, व सर्वात शेवटी कराड येथे मुख्यमंत्र्याच्या शहरात जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्पा खुमसे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन करून सरकार ला लिंगायतांच्या 16  पोट जातिंना OBC चा दर्जा मिळवून देणारे लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक व या ऐतिहासिक लिंगायत आरक्षण आंदोलनाचे खरेखुरे प्रणेते काकासाहेब कोयटे...महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारक समिती ,


मंगळवेढा चे सन्मानीय सदस्य मा काकासाहेब...जगप्रसिद्ध अशा फोर्ब्स मासिकाने दखल घेऊन फ्रंट पेजवर काकासाहेबांची मुलाखत झापलेले एकमेव लिंगायत अर्थातच काकासाहेब...कोरोनाच्या या संकटसमयी लाँकडाऊन मध्ये गोरगरीब,निराधर,लोकांना 2 वेळचे जेवण सलग 2 महिने घरपोहच देणारे, महात्मा बसवेश्वर जयंती ला लाँकडाऊन मध्ये निराधार 1000 कुटुंबांना पुरणपोळीचे जेवण देऊन निराधार कुटुंबात साक्षात परमेश्वर बघणारे मा काकासाहेब...आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेने मा काकासाहेबांच्या कार्याची दखल घेऊन अवकाशात एका ताऱ्यास "ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे" असे नाव दिले आहेअशा काकासाहेबां बद्दल सांगावयास शब्द ही कमी पडतील,



असे लिंगायत सामाजातिल हजारो तरुणांचे प्रेरणास्थाण, " लिंगायत लोकनेते काकासाहेब कोयटे "आपणास वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन लिंगायत संघर्ष समिती, लिंगायत TV Live .



No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...