वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद,जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण
वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद,जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण
उदगीर दि २६ (प्रतिनिधी)ः
लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी रघुकूल मंगल कार्यालय, उदगीर येथे वीरशैव लिंगायत समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 450 वधू-वरांनी भाग घेवून उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.मनोहर पटवारी, मल्लिकार्जुन मानकरी, उदगीर हावगीस्वामी मठाचे शिवाचार्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे, प्रा.प्रभाकर उदगीरे, रामेश्वरअप्पा कानडे, लिंगायत महासंघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील गुंजोटीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष उद्योजक अनिल शेटकार, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, प्रदेश सहसचिव सुरेश वाले, लातूर लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, काशीनाथ मोरखंडे, लिंगेश्वर बिरादार, विठ्ठलराव पाटील, निलकंठ शिवणे, नांदेडचे प्रसिध्द ठेकेदार माधवराव पटणे, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, कपील माकणे, गणेश पटणे, अहमदपूर अध्यक्ष महेश भिंगोले, संतोष कल्याणी, नवनाथ डोंगरे, सांगलीचे प्रदिप वाले, बसवराज पाटील कौळखेडकर, माधवराव निंगदाळे, प्रा.रामदास मिरजगावे, चंद्रकांत शिरसे, सुभाष शेरे, भिमाशंकर शेळके, राजकुमार वडले, अशोक तोंडारे, बाबुराव शेटकार, चंद्रकांत डांगे, अशोक काडादी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रा.प्रभाकर उदगीरे सर नांदेड व रामेश्वरअप्पा कानडे माजलगाव यांना जीवनगौरव पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उमाकांत मळगे, शिवहार येलुरकर, माधवराव लिंगदाळे, रामदास मिरजगावे, शिवकुमार हासरगुंडे, सुनिल हवा, श्रीनिवास गंगथडे, उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्यासह 22 मान्यवरांना समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच श्रीमती अंजुम कादरी व सौ.सुलभा साकोळकर यांना अक्कामहादेवी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या वधूवर मेळाव्यासाठी भावी वधू व वर आणि पालकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली व 450 वधूवरांची नाव नोंदणीही झाली.
या मेळाव्यासाठी उदगीर तालुका व परिसरातून समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



No comments:
Post a Comment