हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे उत्तुंग यश
सातारा, दि.19 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज, व डू ज मधील विद्यार्थी.. विद्यार्थिनींनी सन 2021- 22 या शैक्षणीक वर्षात ई.10 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे.शाळेचा एकूण निकाल 93.20% इतका लागला आहे.
या शाळेच्या विद्यार्थिनी कु.गायत्री विठ्ठल पवार 96.60 %, कु.समृद्धी राहूल जाधव 94.80 %, कु.धनश्री संतोष खटावकर 94.80%, कु.अमृता वैभव फडतरे 94.80% कु. प्राची चंद्रकांत डोंगरे 94.60% गुण मिळवून त्यांनी उत्तुंग यश मिळविले.
तसेच 90% वर एकूण 14 व 80% वर एकूण 27 विद्यार्थी आहेत.
तसेच इयत्ता 12 वी परीक्षेत कला विभाग कु.नयन शुक्राचार्य साळुंखे 82.67%, कु.जाधव आदर्शा दादासो 75%, कु.पाटोळे वैष्णवी बनाजी 70.67% .
वाणिज्य शाखा कु.कदम आकांशा दिनेश 77.67%, कु.चव्हाण मयुरी संदिप 70%, पाटोळे ईशा उमेश 62.67% या विद्यार्थिनींनी यश मिळविले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उच्च न्यायालय नियुक्त सदस्य डॉ.हेमंत पेठे, मा.सतीश शेटे,नितीन जाधव,गोविंद भंडारे ,प्राचार्या नयना गंभरे,उपप्राचार्य एम.एस.गोडसे,ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.एस.बी.जाधव. म.फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शितल पवार यांनी अभिनंदन केले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शाळेने मिळवलेले हे यश अतिशय कौतुकास्पद असून,
विद्यार्थ्यांच्या या यशात त्याचे सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग यांचेही खूप मोठे योगदान आहे.त्यांचेही शाळा शाळा संकुल व वडूज पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment