पाऊस,महापूर सुरक्षा काळजी आणि जागर
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
सातारा, दि .21 - मान्सून आणि अवकाळी पावसाचा प्रश्न आणि त्यातून तयार होणाऱ्या गंभीर समस्या,नुकसान व जीवितहानी याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.कराड,पाटण तालुका,कोल्हापूर जिल्हा,सातारा,पुणे,मुंबई सारखी महानगरे येथे पावसाचे पाणी आणि समुद्र अथवा खाडीचे पाणी यांनी वेळोवेळी मोठी पूर समस्या उद्भवली जाऊन मोठ्या प्रमाणावर भौतिक नुकसान झालेले आहे.याचा विचार करून तातडीने काही गोष्टींची उपाययोजना अंमलबजावणी हि शासन ,प्रशासन स्तर,भांडवली कंपन्या व सार्वजनिक लोकसंस्था व लोकसहभाग यांच्या सहकार्याने होणे आवश्यक बनले आहे.
सन 1975 पासून आज पर्यंत जवळजवळ 47 वर्षात 15 समित्यांनी आपत्ती निवारण बाबत आपले अहवाल सादर केलेले आहेत.त्यानुसार जवळ जवळ 10 उपाय योजना सुचवलेल्या दिसून येतात .त्या पुढील प्रमाणे आहेत.
1) पाणी स्त्रोत व महापूर याबाबत ची रियल टाइम आकडेवारी संकलन यंत्रणा जास्त व्यापक, सधन व अत्याधुनिक पद्धतीने केली जावी.
2) धरण तसेच नदी पाणी विसर्ग पर्जन्य केंद्रांचा दर्जा वाढवून तिथे अत्याधुनिक यंत्रणा बसवणे.
3) डॉपलर रडार यंत्रणा बसवणे.
4 ) दररोज 24 तास आपत्ती निरीक्षण साखळ्या सातत्य तयार करणे.
5) मोठी शहरे व पूरग्रस्त ठिकाणे जाहीर होऊन त्यासाठी पूर पूर्वानुमान सुरक्षित यंत्रणा तयार ठेवणे.
6 ) उपग्रहाच्या माध्यमातून अशा पूरग्रस्त भागाचा आढावा सलग घेणे.
7) नद्या,तलाव,धरणे,बंधारे यातील गाळ व अतिक्रमित भाग काढून त्या खोल करणे व त्यांची साठवण व वहन क्षमता वाढवणे.
8 ) रुंदीकरण ,खोलीकरण करून संरक्षक भिंती उभ्या करणे .जलस्त्रोतांचे व नद्या यांचे सरळीकरण करणे.
9 ) पाण्याचा निचरा सहज लवकर होईल अशा पद्धतीने ओढे व नाले तयार करून सुरक्षित जलनिचरा मार्ग तयार करणे. गटार मुखावर सुरक्षित भक्कम लोखंडी जाळ्या व रेलिंग बसवणे.प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन करणे.
10) पूरग्रस्त भागातील अतिक्रमणे हटवून धरण,तलाव,बंधारे यांची उंची वाढवणे.
अशा मोठ्या उपाययोजना बरोबरच सध्याच्या
11) पूर शक्यता भागातील लोकांचे सक्तीने स्थलांतर करून त्यांना सर्व सोयींनी युक्त अशा सुरक्षित सार्वजनिक ठिकाणी अथवा पाहुणे रावळे व मित्र परिवार यांचे कडे तात्पुरत्या अथवा कायम स्वरूपात पुनर्वसन करणे.
12 ) पूल,धरणे,रस्ते,तलाव,बंधारे यांचे शासकीय ऑडिट सलग करणे. काठावरील झाडे काढून टाकणे अथवा त्यांची दूरवर पुनर्लागवड करणे.
13 ) उपनद्या जोड प्रकल्प गतीने राबवून पाण्याचे विलगिकरण करणे.
14) 25,50,100 फूट लांब व 10 ते 15 फूट रुंद तरंगत्या फायबर,प्लास्टिक जेट्या जवळच्या ठिकाणी तयार ठेवणे.
15 ) हवेच्या दुहेरी ट्यूबस,हलक्या वजनाच्या फायबर अथवा धातूच्या शिड्या, दोरखंड शिड्या ,गाठीचे व सरळ जाड दोरखंड ,लाईफ जॅकेट,लाईफ बोटी,रेनकोट,प्लास्टिक कँड, तरंगते प्लास्टिक बॅरल तराफे, बांबूचे तराफे तयार ठेवणे. उपयोगी दुचाकी,चारचाकी वाहने, कामाचे संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी संच तयार ठेवणे .सक्षम प्रसार माध्यम यंत्रणा तयार करणे.
16) शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवून , अन्न,पाणी ,वस्त्र,निवारा, मेडीसिन,वीज व स्वच्छ्ता गृहे पुरविणारी प्रशिक्षित यंत्रणा उभी करणे .
17) पशु पक्षी ,जनावरे यांच्या गळ्यात लाकडी ओंडणे ,घुंगुर पट्टे बांधून त्यांचा मुक्त संचार गोठा पद्धत अवलंबणे अथवा अतिशय लहान अशा त्यांना सहज तुटू शकतील अशा सैल दोऱ्यांचा वापर करणे .
हे सर्व करण्यासाठी लोकसहभाग,सामाजिक संस्था,दानशूर व्यक्ती, नामांकित फर्मस व कंपन्या यांचा उपयोग करून घेवून त्यांना योग्य तो प्रसिद्धी मोबदला देवून या महान कार्यात सहभागी करून घेणे.तसेच पोहता येणारे व इतर मदतनीस जीवरक्षक व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजन करून त्याची मदतनीस सदस्य समिती तयार ठेवणे .
अशा प्रकारे काही लहान मोठ्या योग्य उपाययोजना वेळेवर राबवून महापूरासारख्या व पर्यायाने तयार होणाऱ्या इतर समस्या पासून सर्व व्यक्ती व साधन संपत्ती यांना सुरक्षित ठेवणे सहजरीत्या सोपे होऊन जाईल.
जागर अपघात व आपत्ती निवारण संस्था, व डू ज.
No comments:
Post a Comment