Monday, June 13, 2022

तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्र्वर ला म.बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कार प्राप्त


 तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्र्वर ला म.बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कार  प्राप्त 
सातारा, दि.14 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे.
वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक ,शैक्षणिक,आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी कलात्मक,समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत,साहित्यिक,प्रबोधनकार,संघटक व समाजसेवक असलेल्या व्यक्ती व संस्थांची निवड शासनाने केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली आहे.
सन 2016- 17 या वर्षीचा म.बसवेश्वर समता - शिवा व्यक्तिगत पुरस्कार प्रा.मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था पुरस्कारासाठी  शिवा अखिल भारतीय युवक संघटना , ओरंगाबाद या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
सन 2017- 18 या वर्षाकरिताचा म.बसवेश्वर समता - शिवा पुरस्कार नागपूर येथील मा. अभय मनोहर कल्लावार यांना तर संस्था मध्ये हाच पुरस्कार वीरमठ संस्थान, ता.अहमदपूर , जि.लातूर या संस्थेला मिळाला आहे.
सन 2018.19 करिता हाच पुरस्कार मा.विठ्ठल बळीराम ताकबिडे यांना तर 2019.20 करिता मा.उमाकांत गुरुनाथ शेटे,पुणे यांना तर संस्थेमधून म.बसवेश्वर सेवाभावी संस्था, 
फलकळस , ता. पूर्णा, जि.परभणी या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
सन 2020.21 या वर्षाकरिता लातूर येथील मा. रामलिंग बापूराव तत्तापूरे व संस्थान मधून तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्र्वर,पोस्ट दिवशी खुर्द , ता. पाटण, जि.सातारा या संस्थानची निवड करण्यात आली आहे.
सन 2021.22 या वर्षाकरिता व्यक्तिगत पुरस्कार डॉ.यशवंत बाबाराव सोनटक्के ,नवी मुंबई यांना प्राप्त झाला असून,तर संस्थे मधून सारथी प्रतिष्ठान,शिवकृपा बिल्डिंग, म.बसवेश्वर नगर ,नांदेड या संस्थेची म.बसवेश्वर समता - शिवा पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे.
सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्र्वर यांना जाहीर झालेला पुरस्कार शुक्रवार, दि.17 जून रोजी सकाळी 10.30 वा. मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते  यशवंतराव चव्हाण सभागृह , नरीमन पॉइंट ,मुंबई येथे  सद्गुरू डॉ.निळकंठ शिवाचार्य महाराज यांना प्रदान करण्यात येणार आहे.रक्कम रु.रोख 51 हजार व सन्मानपत्र अशा या पुरस्काराचे स्वरूप आहे.हा पुरस्कार म्हणजे श्री महाराज यांच्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येचे फळ आहे. तसेच या मानाच्या पुरस्कारात  मठाशी संबंधित सर्व मंडळींचे  पण खूप मोठे योगदान आहे.

या शासकीय व संस्थात्मक पुरस्काराची व्यक्तिगत साठी मानधन रक्कम रुपये 25 हजार असून,संस्थेसाठी हिच मानधन रक्कम रुपये 51 हजार आहे.या रकमेचे धनादेश लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांनी दिली आहे.
पुरस्कार प्राप्त सर्व व्यक्ती , संस्था व   संस्थान यांचे लिंगायत इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांच्या वतीने  हार्दिक अभिनंदन,हार्दिक अभिनंदन .

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...