Monday, June 27, 2022

विटा बँक निवडणुकीत ' जय सहकार पॅनेल च विजयी होईल - कुटुंब प्रमुख व विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी ..

 विटा बँक निवडणुकीत ' जय सहकार पॅनेल च विजयी होईल - कुटुंब प्रमुख व विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी .
.
सातारा, दि.28 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे
जवळ जवळ सात वर्षानंतर सन 2022 ते 2027 या काळासाठी दि विटा मर्चंटस को. ऑप.बँक लि. विटा ची निवडणूक लागली असून,यात 'जयसहकार ' पॅनेल हे 'कपबशी ' हे चिन्ह घेवून निवडणूक लढवत आहे.यातील 9 सदस्य बिनविरोध निवडले गेले असून,उर्वरित 12 जागांसाठी केवळ एका व्यक्तीमुळे निवडणूक चुरस होत आहे.तरी पण हे सर्व पॅनेल चे सभासद बहुमताने विजयी होतील. व बँकेला पुन्हा स्थिरता देवून प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवतील असा आत्मविश्वास विद्यमान अध्यक्ष श्री.विनोद चिंतामण गुळवणी यांनी वडूज,येथील ओंकार मंगल कार्यालय येथे रविवार दि. 27 रोजी , दु.4 ते 6 या वेळेत झालेल्या सभासद व पदाधिकारी यांच्या सभेत बोलताना व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की,विटा बँक हि गेली 60 वर्षे सहकारी क्षेत्रात काम करणारी संस्था असून,या बँकेचा कारभार हा आज अखेर 24 गावे व तीस शाखांच्या माध्यमातून सलग चालू आहे. 
कोरोना काळातही बँकेचा आलेख उंचावत राहीला आहे.रिझर्व्ह बँकेच्या नियमाने .25 कोटी रुपये पर्यंत सक्षम व्यक्तींना कर्ज पुरवठा करू शकते.
.त्यामुळे चांगले कर्जदार असलेस बँक त्वरित कर्ज मंजूर करून देण्यास सक्षम आहे .तसेच रिझर्व्ह बँकेने ही बँकेच्या कामाचे अनेक वेळा उच्च मूल्यमापन केले आहे.
तेव्हा येत्या रविवार दि.3 जुलै रोजी विटा बँक ,शाखा वडूज येथे सकाळी 8 ते दु.4 या वेळेत 
वडूज शाखेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 876 सभासद मतदारांनी भरघोस मतदान करून ' जय सहकार ' पॅनेल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे. तसेच इतर सभासदांनी त्या त्या गावी असलेल्या शाखेच्या  मतदान केंद्रावर मतदान करावे.असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यानंतर वडूज शाखेचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य मा.सतीश शेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्व.गुळवणी आण्णा यांचेपासून सर्व सभासदांचे व स्थानिक समिती पदाधिकारी यांचे कौटुंबिक नाते असून जय सहकार पॅनेल ला आपण सर्वजण मिळून विजयी करू.तसेच डॉ.हेमंत पेठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,विटा बँक सांगली जिल्ह्यासह खटाव तालुका व इतर ठिकाणीही  व्यावसायिक वर्गाची जिव्हाळ्याची अर्थवाहिनी ठरली असून, 'जय सहकार ' पॅनेल लाच विजयी करून आपण बँकेच्या भावी प्रगतीला साथ देवू.
या सभेवेळी श्री.सुकुमार शेठ शहा, श्री.प्रकाशशेठ माळी, शेखर भाऊ म्हामणे ,  ,दिलीप शेठ माळी,  तुकाराम भादुले,गोविंद भंडारे, महेश इनामदार,अरुण तिडके,रवींद्र पेठे, दत्ताशेठ येवले, विद्याधर कुलकर्णी, आबासाहेब महामुनी,संतोष देशमाने,नंदू भंडारे,हणमंत माळी, राजेंद्र गोडसे, बापू पवार ,अशोक जोशी, श्रीकांत म्हामणे,
विटा बँक माजी कर्मचारी अधिकारी  विजय शेटे,अनिल बाबर,श्री.जमदाडे साहेब ,  व इतर सर्व सभासद हजर होते.
आभार प्रा.अजय शेटे यांनी मानले .




No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...