जादुई आवाजाची खास शैली अनंतात विलीन
मुंबई दूरदर्शनचे मराठी वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे निधन
सातारा, दि.8 - प्रतिनिधी प्रा अजय शेटे
आपल्या जादूई आवाजाच्या शैलीने मराठी बातम्या घराघरात व मनामनात पोहचविणारे मुंबई दूरदर्शनचे मराठी वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे आज प्रदिर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.साल नव्वदच्या दशकातील ते एक अतिशय प्रसिद्ध असे वृत्त निवेदक होते
सन 1974 पासून त्यांनी मुंबई येथे वृत्त विभागामध्ये अनुवादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.तसेच त्यांनी कामगार विश्व व इ - मर्क या प्रसार माध्यम कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काही वर्षे काम केले.सन 1980 मध्ये त्यांनी खार येथे स्वतःच्या 'प्रियंका स्टुडिओ ' ची स्थापना केली होती.
मुंबई दूरदर्शन ची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972. ला म.गांधी जयंती दिवशी झाली .त्यानंतर 1974 मध्ये प्रदिप भिडे हे त्या दूरदर्शन केंद्रामध्ये दाखल झाले.वयाच्या 21 व्या वर्षापासून त्यांनी आपल्या वृत्त निवेदन कौशल्यास सुरुवात केली .मराठी अभिनेत्री स्मिता पाटील,भक्ती बर्वे,ज्योत्स्ना किरपेकर या सम व्यावसायिक वृत निवेदिकांबरोबर त्यांनी दररोज आलटून पालटून मराठी बातम्या व इतर कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना दाखवले.
मराठी वांडमय ,नाटके ,कादंबऱ्या , एकांकिका या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची होती.प्रसार माध्यम क्षेत्रात काम करण्याचा आपला मानस त्यांनी सत्यात उतरवून अखेर पूर्ण केला व मुंबई दूरदर्शनची नोकरी स्विकारली.
"संस्कृत भाषेमुळे उच्चार शुद्धी होते .वाणी सात्विक बनते.त्यामुळे सर्वांनी संस्कृत श्लोक पठण करावेत आणि आवाजाची विशिष्ठ चढ उताराची शैली जर वृत्त निवेदकाने जर आत्मसात केली .तर तो नक्कीच त्याच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊ शकतो." असे त्यांनी अतिशय ठामपणे एकदा सांगितले होते .
त्यांनी तब्बल 25 वर्षे वृत्त निवेद नाचे काम केले. 21 मे 1999 ला स्व. राजीव गांधी यांच्या निधनाची बातमी तत्कालीन वृत्त संपादिका विजया जोशी यांनी त्यांना खास पोलिसांच्या जीपने अचानक बोलावून सांगण्यास सांगितली होती. यावरून वृत्त निवेदनाच्या बाबतीत त्यांच्यावर असलेला वरिष्ठांचा विश्वास व त्यांचे खास कौशल्य यांचे प्रचिती देवून गेले होते.
असा हा अतिशय ओघावता भारदस्त मराठी वृत्त बातम्या निवेदन करणारा आवाज प्रदिर्घ निवृत्तीनंतर आज आपल्यातून नाहीसा झाला आहे . कै.प्रदिप भिडे यांना लिंगायत टिव्ही च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व यांच्या मराठी वृत्त निवेदन सादरीकरण कार्यास विनम्र अभिवादन .ओम शांती
No comments:
Post a Comment