इष्टलिंग पूजन वीरशैवांचे मुख्य आचरण : श्री काशी जगद्गुरु
काशीपीठात शाहीस्नान व धर्मसभा
वाराणसी दि 7 :
प्रतिनिधी
जो इष्टलिंगाची भक्तिपूर्वक पूजन करतो. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच्यावर येणारी संकटे टळतात. त्यामुळे इष्टलिंग पूजा हा वीरशैवांचे प्रमुख आचरण होय असे प्रतिपादन काशी जंगमवाडी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
काशी जंगमवाडी मठातील शाहीस्नान व धर्मसभेचे उद्घाटन करून ते आशीर्वचन देत होते. याप्रसंगी नूतन काशी जगद्गुरु डॉ. मलिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी, शाकापुर तपोवन मठाचे डॉ. सिद्धाराम शिवाचार्य स्वामी उपस्थित होते.
पुढे बोलताना काशी जगद्गुरु म्हणाले की आज वीरशैव इष्टलिंग पूजेपासून विमुख होऊन धर्माबाहेर आचरण करताना दिसून येत आहेत हे उचित नाही. नित्य इष्टलिंग पूजा करत योग्य मार्गाने चालले पाहिजे. काम, क्रोध, मोह, मध आणि मत्सर हे अवगुण सोडून दया, शांती, भक्ती, देव आणि धर्म हे लिंगगुण आत्मसात करायला पाहिजे. श्रद्धेने लिंगपूजा करणारा स्वतः लिंगच होतो. इष्टलिंग पूजा शरीराला लिंगमय शरीर बनवण्याचे उत्कृष्ट साधन आहे. यासाठी प्रत्येक वीरशैवांनी गुरूकडून इष्टलिंग गळ्यात धारण करून दररोज इष्टलिंग पूजा केले पाहिजे.
याप्रसंगी कलबुर्गी जिल्ह्यातील जेऊरगी तालुक्यातील शाकापुर तपोवन मठाचे डॉ. सिद्धाराम शिवाचार्य स्वामी यांना मठाचे उत्तराधिकारीपदी चि. सिद्धलिंग मरिदेव यांची नेमणूक केल्याचे पत्र जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रदान केले. तसेच बाळामठाचे डॉ. गुरुमुर्ती शिवाचार्य स्वामी यांना 'शिष्य मानस हंस' हा पुरस्कार काशी जगद्गुरूंनी प्रदान केले.
सकाळी ब्राम्ही मुहूर्तावर काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी व नूतन काशी जगद्गुरु डॉ. मलिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी यांना दशाश्वमेध घाट येथे शाहीस्नान घालण्यात आले. त्यानंतर शाकापुर मठ येथून आलेले 2 हजार भक्त वाद्यवृंदासह जलकुंभ घेऊन यांची बग्गीमधून दशाश्वमेध घाट ते जंगमवाडी मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीतील सुवासिनींनी डोक्यावर घेतलेले जलकुंभ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
No comments:
Post a Comment