चांदवड येथील महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद , प्रदीपशेठ साखरे
सातारा, दि.14 - लिंगायत TV live प्रतिनिधी ,प्रा. अजय शेटे.
लिंगायत फाउंडेशन, लिंगायत संघर्ष समिती , नाशिक .लिंगायत जंगम ,गोसावी समाज,चांदवड यांच्या सौजन्याने रविवार दि.12 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,चांदवड येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरास सभोवतालच्या पंचक्रोशीतील रुग्णांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
अनेक रुग्णांची अतिशय योग्य तपासणी होऊन त्यांचे रोगनिदान करण्यात आले.तसेच त्यांना योग्य समुपदेशन करण्यात येवून पथ्य व घ्यावयाची काळजी सांगण्यात आली व त्यांच्या योग्य तपासण्या करण्यात येवून ओषधोपचार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी चांदवड चे नगराध्यक्ष मा.कासलीवाल, जि. प.गटनेते मा.डॉ. कुंभार्डे यांच्यासह नगरीतील अनेक मान्यवर उपस्थित होते
यावेळी चांदवड लिंगायत,जंगम व गुरव समाजातर्फे या महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेले डॉक्टर्स व त्यांचा सहकारी स्टाफ यांचा समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या मोफत महाआरोग्य शिबिराचे प्रमुख आयोजक कर्ते मा.सुनील तात्या कबाडे, मा.मोहन आण्णा होनराव, डॉ.कबाडे, मा.राजेंद्र कबाडे, मा.भगवानशेठ कबाडे, मा.बाळासाहेब होनराव, मा.संजय देशमुख, मा.श्याम देशमुख,
मा.महेशशेठ कबाडे , मा.संतोषशेठ कबाडे , मा.प्रविण गाढे , लिंगायत फाऊंडेशनचे नाशिक येथील पदाधिकारी व उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा.बंडू शेठ दंदणे, मा.किरण झारेकर, मा.गणेश देशमुख, मा.सागर जाल नेकर, मा.संतोष गाढे, मा.गडकरी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून तो यशस्वीरित्या संपन्न केला .
No comments:
Post a Comment