परमपूज्य डॉ. धारेश्वर महाराज यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल जाहीर निषेध,जाहीर निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अतिशय अशोभनीय वर्तन
परमपूज्य डॉ. धारेश्वर महाराज यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल जाहीर निषेध,जाहीर निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अतिशय अशोभनीय वर्तन
सांगली दि.25 - adv अंश खलीपे लिंगायत TV live विशेष प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मगुरू व श्री क्षेत्र धारेश्र्वर संस्थांचे आद्यगुरू परमपूज्य डॉ. निळकंठ धारेश्र्वर महाराज यांना निमणी ता.तासगाव येथे श्री मारुती मंदिराच्या कलशारोहण व श्री विठ्ठल - रखुमाई यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी रविवार दि.21 ऑगस्ट रोजी आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी सर्व धार्मिक विधी अतिशय उत्तम प्रकारे पार पडल्यानंतर रितसर ठरलेली दक्षिणा देण्याची वेळ आली.त्यावेळी रितसर रकमेबाबत मोठा वादविवाद झाला.त्यावेळी स्थानिक स्वामींनी जे ठरवले होते त्याप्रमाणे मानधन रक्कम द्यावी अशी मागणी करण्यात आली.शिवाय या कामासाठी महाराजांना दोन वेळा प्रवास करावा लागला. त्यांचा प्रवास खर्च द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी स्थानिक स्वामींच्या समोर कार्यक्रमाच्या आयोजकांनी परमपूज्य महाराजांबद्दल अपशब्द वापरून अपमानास्पद भाषेचा वापर केला.शिवाय आम्ही जी रक्कम दिली आहे त्यापेक्षा जास्त रक्कम देणार नाही.तसेच महाराज काय अमेरिकेतून आले आहेत काय ? तुम्ही कार्यक्रम ॲडजेस्ट करत आलाय. असे उर्मटपणे बोलून हेटाळणी केली व वंदनीय महाराजांचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी जगन्नाथ म्हस्के,निमणी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विलासराव पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती नवनाथ म्हस्के यांच्यासह आयोजक हजर होते.
यावेळी स्थानिक स्वामींनी वंदनीय महाराज यांना त्यांचा दोन वेळचा प्रवास खर्च व ठरलेली दक्षिणा देण्यात यावीच असे म्हणून वादात उडी घेतली.यावेळी जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
यावेळी जाणकार बुजुर्ग नागरिकांनी या राष्ट्रवादी काँग्रेस च्या ' खाटुम - खुटुम ' संस्कृतीतील लोकांना वंदनीय महाराजांचे पावित्र्य व विद्वत्ता आयुष्यात समजणार नाही.असे उद्गार काढलेव अशा ऐन वेळी विश्वासघात करून शब्द बदलणाऱ्या अव्यवहार्य संस्कृतीचा जाहीर निषेध नोंदवला.
वंदनीय परमपूज्य डॉ.धारेश्र्वरकर महाराज यांना दिल्या गेलेल्या या अशोभनीय वागणूकीमुळे सर्व लिंगायत समाजात समाज संतप्त झाला असून मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. लवकरच या घटनेचे परिणाम प्रस्तुत घातकी व्यवस्थेला भोगावे लागतील.एव्हढे मात्र नक्की आहे.
तेव्हा असे अशोभनीय भ्याड कृत्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांच्या वीरशैव लिंगायत समाज संघटना , लिंगायत टिव्ही लाईव्ह यांच्या वतीने जाहीर निषेध.
No comments:
Post a Comment