श्रीशैल पीठाच्या आयोजित धर्मकार्यात भक्तांनी सहभाग घ्यावा-श्रीशैल जगदगुरू..
आयोजित बैठकीत सिध्दाराम म्हेत्रे यांची उपस्थिती
श्रीशैल पीठाच्या आयोजित धर्मकार्यात भक्तांनी सहभाग घ्यावा-श्रीशैल जगदगुरू..
आयोजित बैठकीत सिध्दाराम म्हेत्रे यांची उपस्थिती
चपळगाव प्रतिनिधी दि २१ - वीरशैव धर्मातील महत्वाच्या गणल्या जाणाऱ्या श्रीशैलम येथील पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपुर्तीनिमीत्त व त्यांच्या पीठारोहण कार्यक्रमास बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येत्या ऑक्टोबर महिन्यापासून विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांसाठी भक्तांनी तन-मन-धनाने सहभागी होण्याचे आवाहन श्रीशैल पीठाचे जगदगुरू डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केल्याची माहिती माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.
वीरशैवांसाठी श्रीशैल येथे होणार मोठे हाॅस्पिटल..!
श्रीशैल पीठाचे धर्मकार्य आणि सामाजिक बांधीलकी जाणून आंध्र प्रदेश शासनाने दहा एकरची जागा देण्याचे कबूल केले असून पाच एकर जागा पीठाला हस्तांतरित झाली आहे.या जागेवर मोठे हाॅस्पिटल,कंबी मंटप,यात्री निवास आणि गुरूकुल पध्दतीने शाळेची निर्मीती करण्यात येणार आहे.यासाठी भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन पत्रकान्वये करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी श्रीशैलम येथे जगदगुरूंनी आयोजित केलेल्या बैठकीत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे आपल्या शिष्टमंडळासह उपस्थित होते.पूढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की,या सर्व कार्यक्रमांची सुरूवात पदयात्रेने होणार असून २९ ऑक्टोबरपासून श्रीक्षेत्र येडूरहून श्रीशैलपर्यंत पदयात्रा संपन्न होणार आहे.पदयात्रेच्या दरम्यान विविध गावांमध्ये धर्मजागृती,लिंगदिक्षा, व्यसनमुक्ती विषयक धर्मोपदेश, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे.या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या सद्भक्तांनी १ सप्टेंबर पूर्वी आपली नावे समितीकडे नोंदवणे आवश्यक आहे.तसेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून श्रीशैल क्षेत्रामध्ये रुद्राभिषेक,बिल्वार्चन,महामंगलआरती जगद्गुरूंची इष्टलिंग महापूजा तुलाभार,रुद्रहवन,अन्नदान व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे १० जानेवारी २०२३ पासून श्रीशैल येथे या कार्यक्रमाच्या अखेरीस वीरशैव महासभेचे महाअधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वचन संमेलन,राष्ट्रीय वीरशैवागम समावेश आणि मराठी, तेलगू,कन्नड तसेच वीरशैव साहित्य गोष्टी,मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती म्हेत्रे यांनी दिली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे,लक्ष्मण चितळे,जटप्पा मुतगी आदी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment