रविवारी राज्यस्तरीय मोफत वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळावा
पिंपरी चिंचवड येथे काशी जगद्गुरुंचे लाभणार सानिध्य
रविवारी राज्यस्तरीय मोफत वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळावा
पिंपरी चिंचवड येथे काशी जगद्गुरुंचे लाभणार सानिध्य
पुणे दि 23 : ओम नमः शिवाय अधिष्ठान व श्रावणमास तपोनुष्ठान समिती यांच्या वतीने डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात राज्यस्तरीय मोफत वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक महेश स्वामी यांनी दिली.
काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे तपोनुष्ठान पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स याठिकाणी सुरू आहे. दरवर्षीच्या श्रावण महिन्यातील यंदा त्यांचे बत्तीसावे तपोनुष्ठान आहे. यावर्षी या निमित्ताने अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
रविवार दि. 28 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे होणाऱ्या या मेळाव्यात वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचे मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील हजारो वधू-वर उपस्थित राहणार आहेत. ज्यांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी रविवारी बायोडाटासह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
परमपूज्य काशी जगद्गुरू आणि पंचपीठाच्या अनेक शिवाचार्यांच्या सानिध्यात पुणे जिल्ह्यात होणारा हा 25 वा मोफत वधू-वर मेळावा आहे. या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत सर्व पोटजाती वधू-वर परिचय मेळाव्यात उपस्थित राहण्याऱ्या वधू-वर आणि पालकांच्या चहा, नाष्टा आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वधू-वर मेळावा यशस्वी होण्यासाठी ओम नमः शिवाय अधिष्ठान व श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे महेश स्वामी आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.
No comments:
Post a Comment