Wednesday, August 31, 2022

श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे श्रावणमास तपोनुष्ठान भक्तीभावात संपन्न भक्तांनी दिलेली 16 लाखाची गुरुदक्षिणा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी प्रदान

 

श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे श्रावणमास तपोनुष्ठान भक्तीभावात संपन्न भक्तांनी दिलेली 16 लाखाची गुरुदक्षिणा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी प्रदान 



श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे श्रावणमास तपोनुष्ठान भक्तीभावात संपन्न भक्तांनी दिलेली 16 लाखाची गुरुदक्षिणा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी प्रदान 




पुणे दि ३०  : प्रसाद वाकडे प्रतिनिधी 

श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचा 32 वा श्रावणमास तपोनुष्ठान पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्समध्ये संपन्न झाला. ओम नमः शिवाय प्रतिष्ठान आणि काशी जगद्गुरू तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनुष्ठान सोहळा 32 दिवस चालला.

          दररोज सकाळी इष्टलिंग महापूजा, संध्याकाळी सिद्धांत शिखामणी ग्रंथावर आध्यात्मिक आशीर्वचन परमपूज्य महास्वामीजी देत होते. या सोहळ्यात १० ऑगस्ट रोजी काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा जन्म अमृतमहोत्सव तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

             याप्रसंगी भक्तांनी 1 रुपयापासून 1 लाख रुपयांपर्यंत गुरुदक्षिणा महास्वामीजींच्या चरणी अर्पण केली. ही रक्कम एकूण 16 लाख रुपये झाली. महाराष्ट्रातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी ही रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्याची घोषणा महास्वामीजी यांनी याप्रसंगी केली.

            तसेच याप्रसंगी महास्वामीजी यांच्या १२ भक्तांनी १२ विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून निरंतर देण्याचा संकल्प केला. अनुष्ठान सोहळ्याची फलश्रुती म्हणजे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची चिरंतन व्यवस्था होय. काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी २००२ पासून विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा प्रारंभ लातूर येथे केला. भारतातील विविध प्रांतातील ५०० विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आजपर्यंत घेत आहेत. ही संख्या भविष्यात वाढविण्याची इच्छा महास्वामीजींनी याप्रसंगी व्यक्त केली.

           तपोनुष्ठान समाप्ती प्रसंगी काशीपीठाचे नूतन जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा अड्डपालखी सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. हजारो महिला पंचपीठाचा वेश परिधान करून कलश, आरतीसह या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. ढोल, ताशा यासह अनेक पारंपरिक वाद्यासह हजारो भक्तगण सहभागी झाले होते. भारतातील विविध प्रांतातील 25 हून अधिक शिवाचार्यगण यावेळी उपस्थित होते. 

            महास्वामीजींच्या जन्म अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'विभूती वैभव' विशेषांकाचे प्रकाशन झाले. तपोनुष्ठान सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील 8 मान्यवरांना काशीपीठाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. काशीपीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

         पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश स्वामी यांनी या सोहळ्याचे नेतृत्व केले. चिंचवडे लॉन्सचे खंडूशेठ चिंचवडे यांनी या समारंभासाठी चिंचवडे लॉन्स सवलतीच्या दरात देऊन सहकार्य केले. श्रावण मास अनुष्ठान यशस्वीतेसाठी ओम नमः शिवाय प्रतिष्ठान आणि तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती यांचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

      


फोटो ओळी : श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या श्रावणमास तपोनुष्ठान समारोपप्रसंगी नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य, मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य व उपस्थित शिवाचार्यगण

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...