Monday, August 22, 2022

सौ शोभा खलीपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

                      सौ.  शोभा खलीपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार 


                     सौ.  शोभा खलीपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार 




कडेगाव दि.22 - दिलीप महाजन प्रतिनिधी

सौ.शोभा खलिपे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ जि.प.शाळा तोंडोलीच्या प्रांगणात संपन्न झाला. सौ.शोभा खलिपे या 36 वर्षे 6 महिन्याच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याकारणाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन, तसेच इशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. यावेळी मा.अनिस नायकवडी - गटशिक्षणाधिकारी पं.स.कडेगाव, मा.ज्ञानेश्वर चिमटे - विस्तार अधिकारी पं.स.कडेगाव, मा.विकास राजे - विस्तार अधिकारी पं.स.खानापूर, केंद्रप्रमुख मा.मधुकर जंगम, मा.नानासाहेब कांबळे, मा.विलास शेळके, मा.अशोक महिंद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.





यावेळी बोलताना मा.नायकवडी म्हणाले, सौ.शोभा खलिपे यांनी 36 वर्षे 6 महिन्याच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेत 36 पिढ्या घडवण्याचे महान कार्य केले आहे. तसेच कुटुंब आणि नोकरी याचा समतोल योग्यरीत्या साधला. शाळेतील मुलांना घडवत त्यांनी स्वतःच्या मुलांना देखील योग्यरीत्या घडवले. त्यांच्यात असणारा विनम्रपणा तसेच सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची भावना प्रत्येक शिक्षकाने घेण्याजोगी आहे. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांच्या संख्येवरून त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती सर्वांना पाहायला मिळत आहे.

यावेळी सौ.शोभा खलिपे म्हणाल्या, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात मला काम करण्याची संधी मिळाली आणि नवीन पिढी घडवण्याच्या कार्यात माझा हातभार लागला याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी, मित्रमंडळी, पाहुणेमंडळी, पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी, ज्ञात-अज्ञात सर्व व्यक्तींनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल तुमचे आभार न मानता पुढील आयुष्य तुमच्या ऋणात घालवेन.




यावेळी कडेगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, पालक, ग्रामस्थ, तोंडोली गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवशंभु प्रतिष्ठानचे पदाधिकारी, साद फाउंडेशनचे पदाधिकारी, ग्रामविकास संस्थेचे पदाधिकारी, तसेच पत्रकार बांधव, आप्तिष्ट यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सौ शोभा खलिपे व त्यांच्या परिवारास शुभेच्छा,दिल्या .

कार्यक्रमाचे संयोजन तोंडोली व नेवरी केंद्र तसेच शा.व्य.स.तोंडोली व नेवरी यांनी केले. प्रास्ताविक व निवेदन मा.गोरख मोहिते तसेच आभार प्रदर्शन मा.महकु ढवळे यांनी केले.




No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...