भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत
भीम - कुंतीच्या जयजयकाराने उंब्रज नगरी दुमदुमली
भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत
भीम - कुंतीच्या जयजयकाराने उंब्रज नगरी दुमदुमली
उंब्रज दि २२:- प्रसाद वाकडे प्रतिनिधी लिंगायत TV Live
भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत सोमवारी भीम - कुंतीच्या जयजयकाराने उंब्रज नगरी दुमदुमली. यात्रेला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह मिळाला. रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भीमसेन महाराज व कुंती मातेेेचा जयजयकार करत उंब्रज येथील मातापुत्र भेटीचा अनोखा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी पार पडला.
प्रतिवर्षी श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी उंब्रज येथे भीम कुंती उत्सव साजरा केला जातो. गत दोन वर्षांत कोरोनामुळे उत्सवांवर निर्बंध होते मात्र ही सर्व कसर सोमवारी भरुन काढत भाविकांनी भीमकुंती उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्य मिरवणुकीत कुंती मातेला घेऊन बसण्यासाठी भीम मंडपात बोली लिलावास सकाळी १०.३० वाजता प्रारंभ झाला. यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सुमारे तासभर लिलाव बोलीसाठी चढाओढ झाली. यावेळी दिपक हिंदुराव घाडगे यांनी एक लाख एक हजाराची सर्वाधिक बोली बोलून कुंती मातेच्या रथात बसण्याचा मान मिळविला. यात्रेच्या इतिहासात ही लिलाव बोली विक्रमी ठरली आहे.
दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत बॅंडच्या तालावर ठेका धरणारे तरूण युवक, त्यापाठोपाठ टाळ मृदुंगाच्या तालावर अभंग वाणी गात हरिनामाचा जयजयकार करणारे भजनी मंडळ असा लवाजमा मिरवणुकीत सहभागी झाला. फुलांनी अच्छादलेल्या छत्र्या, रथाला जुंपलेले अश्व, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा जल्लोष हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. दुपारी मुख्य मिरवणूक बाजारपेठेत येताच 'भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत परिसर दुमदुमून गेला. मिरवणूक मार्गावर ठीक ठिकाणी कुंती मातेचे दर्शन घेण्यासाठी महिलांसह भाविकांनी गर्दी केली होती.
कुंती मातेची मिरवणूक बाजारपेठेतून महामार्गाच्या पश्चिमेस कॉलेज रोडवरील मारुती मंदिरास प्रदक्षिणा घालून पुन्हा बाजारपेठ मार्गे मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीम मंडपात दाखल झाली. या ठिकाणी भीम व कुंती माता यांच्या भेटीचा अभूतपूर्व व पारंपारिक सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर विधिवत पूजाअर्चा करून कुंती मातेची भीमसेन महाराजांशेजारी प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भाविकांनी भीम महाराज व कुंती मातेचा जयजयकार केला.सोहळ्यास उंब्रजसह परिसरातील हजारो भाविकांची गर्दी झाली होती.
कुंती माता व पुत्र भीम यांच्या भेटीच्या सोहळ्याच्या पूर्व संध्येपासून भीम व कुंती यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. उत्सवानिमित्त बाजारपेठेत खेळणी, पाळणे, मेवा मिठाई तसेच गुलाल खोबऱ्याच्या दुकानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मिरवणूक पार पाडण्यासाठी भिमसेन मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत प्रशासन, उंयांनी परिश्रम घेतले तसेच यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी उंब्रज पोलीस स्टेशन च्या वतीने योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता





No comments:
Post a Comment