समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष आहेत-- विनायक कारेगांवकर ,पोलिस उपनिरीक्षक
वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठानचा उपक्रम
समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष आहेत-- विनायक कारेगांवकर ,पोलिस उपनिरीक्षक
वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठानचा उपक्रम
यवतमाळ ( विदर्भ ) दि २१ :- निलेश शेटे यवतमाळ लिंगायत TV Live प्रतिनिधी
वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठान, यवतमाळ द्वारा जेष्ठ नागरिप्रतिनिधी क आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन महात्मा बसवेश्वर सांस्कृतीक भवन येथे आयोजित करण्यात आले, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक डॉ.अशोक मेनकुदळे,प्रमुख पाहुणे म्हणुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री विनायक कारेगांवकर, चंद्रशेखर उमरे,वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयेश हातगांवकर, उपाध्यक्ष प्रा.डॉ. किशोर मांडगावकर, सचिव निलेश शेटे, लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.विद्या बेलोरकर उपस्थित होते,
महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली,समाजातील जेष्ठांचा सत्कार सोहळा शाल,श्रीफळ,रोख,सन्मानचिन्ह,तसेच विद्यार्थांना गौरव चिन्ह, रोख प्रमाणपत्र आणी समाजातील दिवंगत कै सौ. सुनेत्रा अरविंद मांडगावकर,कै सौ हेमा व श्रीनिवास देशमुख, कै.दिंगाबर डोंगरे स्मृती प्रित्यर्थ तसेच श्रीमती पुष्पाताई हातगांवकर ह्यांचे द्वारा रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले,
तसेच समाजातील विशेष नैपुण्य दाखविलेले,सुवर्ण पदक प्राप्त कु.नभा उमरे,माती वाचवा फाऊंडेशनचे विराज बेलोरकर,योगा मध्ये जागतिक रेकॉर्ड करणारी सिध्दी चांदेकर ,योगगुरू प्रदिप उमरे ह्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ह्या प्रसंगी बोलताना लाचलुचपत विभागाचे विनायक कारेगांवकर म्हणाले
समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष आहेत
त्यांच्या प्रेरणा व अनुभव कल्पवृक्षांप्रमाणेच काम करतात. मला जेव्हा अडीअडचणी येतात, मार्ग सापडत नाही, तेव्हा मी ज्येष्ठांकडून आवर्जून मार्गदर्शन घेतो, मनुष्याचा वृद्धापकाळ हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण असायला हवा. त्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक सहाय्य त्यांना लाभले पाहिजे जेणेकरून शेवटची काही वर्षे त्यांना परमानंद मिळू शकेल. असा उदात्त हेतू लक्षात घेऊन तरुणपिढीने त्यांना सन्मानयुक्त जगवणे गरजेचे आहेअसे ते म्हणाले
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अशोक मेनकुदळे म्हणाले प्रत्येकाने आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सांभाळ करणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. आपण सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांचे महत्व समजून घेतले पाहिजे, कारण ते आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि हितचिंतक राहिलेले असतात.तसेच गुणवंताना मार्गदर्शन करतानाकष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा असे मनोगत व्यक्त केले.
ह्या कार्यक्रमाचे संचालन भुषण तंबाखे व आभार प्रदर्शन निलेश शेटे ह्यांनी केले,ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गिरीष गाढवे,गजानन हातगांवकर,वीरभद्र पाटील,
रमेश केळकर,विनोद देशमुख, विनोद नारिंगे,जयंत डोंगरे,राजु कुऱ्हेकार,निर्मल ठोंबरे,अशोक तेले,मंगेश शेटे, बाळासाहेब दिवे,सुधाकर केळकर,सुरेश शेटे,प्रदिप उमरे,प्रकाश चनेवार,अशोक जिवरकर सौ.कल्पना देशमुख, सौ.पद्मश्री हातगांवकर सौ जुही शेटे,सौ.शिला तेले,सौ.स्वाती हातगांवकर,सौ.जिवरकर ताई ईत्यादी सदस्यांचे सहकार्य लाभले.








No comments:
Post a Comment