Monday, February 28, 2022

आज महाशिवरात्री या निमित्ताने सर्व देशभर हा दिवस अत्यंत उस्ताहात साजरा केला जातो , त्याचे महत्त्व .श्री महाशिवरात्री व्रत महात्म्य व कथासार

आज  महाशिवरात्री या निमित्ताने सर्व देशभर हा दिवस अत्यंत उस्ताहात साजरा केला जातो , त्याचे महत्त्व 
.श्री महाशिवरात्री व्रत महात्म्य व कथासार 
.सातारा दि 1 .प्रा.अजय शेटे..वडूज.लिंगायत TV live
.. मंगळवार.. दि.1मार्च 2022..रोजी माघ मासी कृष्ण पक्ष चतुर्दशी ..14..रोजी सर्व हिंदू धर्म व  वीरशैव लिंगायत धर्माला अतिशय पवित्र असणाऱ्या श्री महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न होत आहे..याचा निशिथ काल मध्य रात्री 12.36 ते 1.15 असा आहे.त्यानंतर दर्श अमावस्या सुरू होत आहे..
..भगवान श्री शंकर..महादेव यांचे  प्रतीक म्हणून शिवलिंगाचे पूजन केले जाते.या शिवलिंगाचा खालील भाग श्री ब्रम्हा असून मध्य भाग श्री विष्णु नारायण आहेत व वरील भाग हा श्री शिवशंकर आहेत. हे शिवलिंग उत्पत्ती..स्थिती आणि लय यांचेही द्योतक आहे.तसेच सर्व विश्व व्यापी  ब्रम्हांडा चे  पण प्रतीक आहे.
..एका पौराणिक कथेनुसार याच रात्री श्री भगवान शंकराने  देव आणि दानव यांच्या समुद्र मंथनातून निघालेले ,' काल कूट ' नावाचे विष प्राशन करून त्याचे अमृत बनविले..तसेच श्री शिव पुराणा मधील कोटी रुद्र आख्याना नुसार जी कथा आहे.ती पुढीलप्रमाणे..
..एका जंगल वनात भिल्लांची वस्ती होती. त्यात गुरुद्रुप नावाचा अतिशय बलवान व रागीट शिकारी भिल्ल रहात होते होता..त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडील..पत्नी व मुले होती. तो रोज त्या जंगलात शिकारीला जाई व हरीण अथवा इतर प्राण्यांची हत्या करी व त्यांचे मांस खाऊन आपली व कुटुंबाची उपजीविका पूर्ण करत असे.शिवाय तो चोऱ्या व दरो डे घालण्याचे काम करून लूटमार पण करत असे..असेच एकदा त्याच्या कुटुंबाने त्याच्या जवळ हरणाचे मांस खाण्याची इच्छा व्यक्त केली.. त्या शिकारीच्या शोधात तो जंगलात धनुष्यबाण व प्यायला  फक्त पाणी घेवून गेला..दिवसभर त्याने प्रयत्न करून पण त्याला हरिण दिसले नाही त्यामुळे त्याच्या शोधात तो खूप आतपर्यंत अनभिज्ञ अशा दाट जंगलात शिरला. व त्याला हरीण दिसले नाही.संध्याकाळ..रात्र होऊन खूप अंधार पडला पण रिकाम्या हाताने गेलो तर कुटुंबाची भूक आपण भागवू शकणार नाही.त्यामुळे शिकार सापडे पर्यंत रात्रभर तेथेच राहण्याचा निर्धार त्याने केलं व तो एका पाण्याच्या तळ्या जवळ आला.रात्री नक्कीच इथे पाणी पिण्यासाठी एखादे हरीण येईल आणि आपल्याला शिकार मिळेल या हेतूने तो फक्त प्यायला पाणी व हाती धनुष्यबाण घेवून शेजारच्या एका  बेल वृक्षाच्या झाडावर चढून बसला..परंतु रात्रीचा पहिला प्रहर सुरू होऊन बराच वेळ झाला तरी तिथे हरीण आले नाही..परंतु बऱ्याच वेळाने अचानक एक हरिणी तिथे पाणी पिण्यास आली.त्या बरोबर त्याने सावध पवित्रा घेण्यासाठी हालचाल केली. त्याच्या हाताच्या व शरिराच्या  हालचाली मुळे काही बेलाची पाने व हातातील पाणी त्या झाडाखाली दडून असलेल्या श्री शिवलिंगावर पडले आणि अनावधनाने त्याच्या हातून पहिल्या रात्र प्रहराची पूजा पूर्ण झाली.ती रात्र नेमकी श्री  महाशिवरात्री ची होती.श्री शिवलिंग पूजनाचे पुण्य नकळत त्याच्या हातून घडले व त्याच्या विचारात परिवर्तन होऊ लागले.पण त्याच्या  हालचाली च्या आवाजाने त्या हरिणीचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने शिकारीसाठी तिच्यावर बाण उगारला होता.त्यावर त्या हरिणी ने त्याची याचना करून सांगितले की माझ्या कुटुंबात माझी दोन लहान पिल्ले ..माझी एक बहिण व माझे पती असे आहेत..तेव्हा त्यांना भेटून  त्यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी सोपवून मी माघारी येते.नंतर तू तुझा कार्यभाग साधं .परंतु यास त्याने नकार दिला. व तू खोटे बोलून पळून जाणार आहेस असे ठणकावले..तेव्हा तिने मी जर असे खोटे वागणे  केले तर मला महापाप लागेल.असे म्हणून नक्की माघारी येण्याचे वचन देवून ती परत गेली.. तिने आपल्या पिल्लांना दूध पाजून सर्व कुटुंबात हि गोष्ट सांगितली व ती आपले वचन पूर्ण करण्यास माघारी निघाली.तेव्हा तिची बहिण तिला म्हणाली तू आई आहेस ..तुझ्या लहान पिल्लांना अजून तुझी खूप गरज आहे.तेव्हा तू थांब तुझ्या ऐवजी मी जाते .असे म्हणून ती त्या तळ्यावर पाणी पिण्यास गेली..तोपर्यंत महाशिवरात्रीचा दुसरा प्रहर पूर्ण झाला होता व भिल्लाच्या हालचालीने जवळील पाणी व बिल्वपत्रे खाली श्री शिवलिंगावर पडत होती.अशा प्रकारे त्याची ती पण पूजा नकळत पूर्ण झाली..तेव्हा त्याने त्या तरुण हरिणी वर शिकारीसाठी बाण उगारला त्यावर ती म्हणाली मला आत्ता मारू नकोस.माझे घरी माझी थोरली बहीण..भाऊजी व त्यांची मुले आहेत.तेव्हा त्यांना एकदा भेटून येते.तेव्हा तू माझी शिकार कर तेव्हा सुरुवातीला त्याने विरोध केला पण तिने हे वचन जर मी पूर्ण केले नाही तर मला महापाप लागेल असे सांगितल्यावर  अचानक  मतपरिवर्तन होऊन या घटनेला पण त्याने परवानगी दिली.ती कुटुंबात माघारी आलेली पाहून सर्वांना आनंद झाला.तिने सर्व हकिकत सांगितली त्यावर मोठा नर हरीण त्यांना म्हणाला आपली पिल्ले अजून लहान आहेत.तेव्हा तुमच्या महिलांची त्यांना खूप गरज आहे.तेव्हा आता मी जंगलात जातो.असे म्हणून तो जंगलात त ळ्या जवळ पाणी पिण्यास पोहचला .त्याला पाहून या शिकाऱ्याला खूप आनंद झाला..मध्ये बराच वेळ वाट पाहण्यात गेल्या मुळे तो वेळ जावा म्हणून बेलाची पाने तोडून खाली टाकत होता.आणि त्याच्या जवळील पाणी श्री शिवलिंगावर पडत राहिल्यामुळे त्याची रात्रीच्या तिसऱ्या प्रहराची पूजा पण त्याच्या नकळत घडून आली व त्याच्या विचारात बदल होत गेला..त्याने त्या तरुण नर हरणा वर शिकारीसाठी धनुष्य बाण रोखला .त्यावेळी तो हरण त्याला म्हणाला घरी माझे कुटुंब आहे.तेव्हा त्यांची एकदा शेवटची भेट घेवून लगेच येतो.नंतर तू माझी खुशाल शिकार कर.तेव्हा त्याने नकार देवून तुम्ही सर्व जण मला खोटे बोलून फसवत आहात व स्वतःचा जीव वाचवत आहात असे म्हटले.त्यावर त्या हरिणाने आम्ही जर असे केले तर आम्हाला सात जन्माचे पाप लागेल.तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेव असे सांगितले.त्यावर त्याने त्या नर हरणास पण माघारी येण्याच्या बोलीवर जावू दिले.
..इकडे घरी पोहचल्यावर भिल्लाला दिलेल्या वचन पूर्तीची खूप चर्चा हरिणा च्या  कुटुंबात झाली.तेव्हा  वचन पूर्ती करण्यासाठी ते सर्वच कुटुंब आपल्या पिल्लांसह त्या तळ्या जवळ पोहचले त्यांनी पाणी पिले.. व आम्ही सर्वजण तुझी वचन पूर्ती करण्यासाठी आलो आहे. तेव्हा तू आमची शिकार करून तुझ्या सह सर्व कुटुंबाची भूक भाग व असे  त्या भिल्लास सांगितले
.त्यावर इतक्या सर्व हरिणा ना  पाहून त्याला सुरुवातीला  खूप आनंद झाला. पण यावेळी रात्रीचा चौथा प्रहर ही पूर्ण होऊन त्या भिल्लाच्या हातून अनेक बिल्व पत्रे व पाणी खाली सांडल्या मुळे श्री शिवलिंगाची पूजा पूर्ण झाली . व त्याच्या नकळत त्याचे पुण्यकर्म त्याला लाभले व त्याच्या विचारात पूर्ण मतपरिवर्तन झाले.त्याने विचार केला की हे सर्व कुटुंब प्राणी असून एकमेकांच्या जीवाची काळजी करतात आणि प्रसंगी एकमेकांसाठी स्वतःचा जीव ही देण्यास तयार होतात. आणि आपण माणूस असून त्यांच्या शिकारीचे दुष्कृत्य करतो व आपल्या पोटाची भूक वासना भागव तो हे मोठेच पाप आहे.तेव्हा आपण आता शिकार व लूटमार सोडून या निरपराध
 प्राण्यांसारखे प्रामाणिक जीवन जगू व इथून पुढे मानव कल्याणाचे कार्य करू असे म्हणून त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवून त्यांना नमस्कार केला व जिवंत माघारी जाण्यास परवानगी दिली .
.. तेव्हा तिथे भगवान श्री शिवशंकर प्रकट झाले व त्यांनी  त्याच्या यश ..संपत्ती व समृध्दी साठी आशिर्वाद दिला..त्याने ते दिव्यदर्शन पाहून नमस्कार केला तेव्हा अशा  प्रकारे जो  माझे महाशिव रात्रीचे व्रत करून जो पूजापाठ..मंत्र व स्तोत्र पठण करेल तेव्हा त्या व्यक्तीस यश..समृद्धी.. ऐश्वर्य..धनधान्य..सुवर्ण.. पद..पैसा ..प्रतिष्ठा..नाव ..आणि मानसन्मान प्राप्त होईल.असे सांगून 'तथास्थु'म्हणून ते अदृश्य झाले..
.. ओम नमः शिवाय..ओम नमः शिवाय **

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...