ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व लिंगायत लोक नेते काकासाहेब कोयटे यांची भेट
प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239..
..सातारा.. दि.12..महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.हसन मुश्रीफ साहेब यांची लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक व महाराष्ट्र शासनाच्या मंगळवेढा येथील नियोजित म.बसवेश्वर स्मारक समितीचे सदस्य लिंगायत लोकनेते ओम प्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांनी कोल्हापूर येथे भेट घेतली.
..यावेळी नियोजित स्मारकाची सरकारी मालकीची जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी.तसेच जो मंजूर निधी घोषित के ला आहे तो त्वरित वितरीत करण्यात यावा. व इतर अनेक मागण्यांचे निवेदन मा.मंत्री साहेबांची गाठ घेवून देण्यात आले व चर्चा करण्यात आली.
..यावेळी लिंगायत संघर्ष समिती प.महाराष्ट्र कार्याध्यक्षा सरला ताई पाटील..पदाधिकारी प्रदीप वाले ..सांगली ..संजय चित्तारी ..कागल..स्मारकाचे आर्किटेक्ट संजय तोडकर उपस्थित होते.
..यावेळी या सर्व मागण्या मान्य करून कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही मा.मंत्री साहेबांनी या शिष्टमंडळाला दिली..
No comments:
Post a Comment