महाराष्ट्राचे महापिता स्वराजसंकल्पक श्री. शहाजीराजे यांच्या कर्नाटकातील समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करणार.
सातारा दि 18:- प्रणाली वाकडे लिंगायत TV live
महाराष्ट्राचे महापिता स्वराजसंकल्पक श्री. शहाजीराजे यांच्या कर्नाटकातील समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करणार.
नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांची घोषणा
कर्नाटकातील होदिगेरे ता.चेन्नागिरी, जि.दावणगेरे येथील श्री शहाजीराजे स्मारक निधी ट्रस्टला डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून ५ लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द
श्री एकनाथजी शिंदे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी video कॉलद्वारे साधला संवाद ; स्मारकाचे काम पूर्ण करण्याची दिली ग्वाही
महाराष्ट्राचे महापिता आणि स्वराजसंकल्पक श्री. शहाजीराजे यांची कर्नाटकस्थित समाधी उघड्यावर असल्याची गंभीर बाब इतिहास संशोधक आणि कादंबरीकार श्री विश्वास पाटील यांनी समाजमध्यमाद्वारे निदर्शनास आणून दिली होती. ही माहिती राज्याचे नागरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली असता त्यांनी तात्काळ संभाजीकार श्री विश्वास पाटील यांच्याशी आणि श्री शहाजीराजे समाधी स्मारक ट्रस्टशी संपर्क साधत या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची इचछा व्यक्त केली.
गेली साडेतीनशे वर्ष होदिगेरे परिसरात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी उघड्यावर आहे. स्वराज्य संकल्पकाच्या या समाधीसाठी छत्र उभा रहावे, परिसराचा विकास व्हावा, यासाठी तात्काळ डॉक्टर श्रीकांत शिंदे फ़ाउंडेशन कड़ून पहिल्या टप्पात पाच लाख रुपयांचा धनादेश श्री शहाजी राजे स्मारक विकास समितीकडे सुपूर्द केला.
इतिहास संशोधक व संभाजीकार विश्वास पाटील , डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सदस्य मंगेश नरसिंह चिवटे, बाजीराव चव्हाण, प्रशांत साळुंखे, अतुल चतुर्वेदी यांच्या हस्ते श्री शहाजी स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे अध्यक्ष श्री मल्लेश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला गेला.
श्री शहाजी राजे यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली गेल्याने स्थानिकांसह महाराष्ट्रातील छत्रपती शहाजी भक्तांनी एकच जयघोष केला. जय शहाजी...जय शिवाजी... जय संभाजी... अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला. दरम्यान समाधीस्थळाचे पूजन पानिपतकार विश्वास पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बंगलोरस्थित शिवभक्त श्री अतुल चतुर्वेदी यांनी श्री शहाजीराजे यांच्या समाधीला खास बंगलोर येथून आणलेले 2 भव्य गुलाबपुष्पहार अर्पण केले. आमचे बंगलोर शहर वसविणार्या श्री शहाजीराजे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशी कृतकृत्य भावना श्री चतुर्वेदी यांनी भावना व्यक्त केली.
यावेळी श्री. शहाजीराजे भोसले स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे सचिव श्री. रामचंद्र राव, सदस्य सर्वश्री श्री.मंजुनाथ पवार, श्री. शामसुंदर सूर्यवंशी,श्री.अन्नोजी राव पवार, श्री सतीश म. पवार, श्री. किरण शिंदे, श्री. सुदर्शन पवार, श्री. प्रशांत भोसले
श्री. गोविंद राजे भोसले , श्री. अन्नोजी राव आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment