खानापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्यांगांना निधीचे वाटप..
खानापूर दि 17 :- शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live प्रतिनिधी
: देगलूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिव्यांग निधीचे वाटप नुकतेच करण्यात आले. सन २०१४ पासून अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी शासनाच्या ध्येय धोरणानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याच अनुंगाने खानापूर येथे दि १६ रोजी, ई.स.२०२१ या वर्षाची ९७ हजार ५०० निधी मंजूर झाला असून गावातल्या एकूण ३९ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी प्रत्येकी २५०० रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मिळाली, दिव्यांग निधीचे ग्रामविकास अधिकारी गणेश कोकणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वितरण करण्यातआले,हा निधी लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका संघटक उमाकांत अटकळे यांनी मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला असल्याने हा निधी आम्हाला मिळाला असे मत अनेक उपस्थित लाभार्थ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले,
यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी गणेश कोकणे,प्रहार संघटनेचे तालुका संघटक उमाकांत अटकळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, दिव्यांग लाभार्थी तथा गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती ..
No comments:
Post a Comment