संत श्री गजानन महाराज प्रकट दिन , वंदनीय गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी .
वडूज.. दि.23.. ..प्रा.अजय शेटे..वडूज
.गणेशवाडी येथील भूमिपुत्र व पुणे येथील विभागीय पोलिस अधिकारी श्री.सुनील दादासाहेब घार्गे यांनी वडूज ..कर्मवीर नगर येथे बांधलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर मध्ये तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.अशोक आबा गोडसे यांनी बांधलेल्या वाकेश्र्वर रोड वरील मंदिरात तसेच व्यावसायिक श्री. दत्तात्रय रामचंद्र गाडवे यांच्या वाड्यात आज श्री गजानन महाराज प्रकट दिंन सोहळा साजरा करण्यात आला..
..यावेळी सकाळी 8 ते 9 होमहवन..9 ते 10 सत्यनारायण महापूजा..11 ते 12 या वेळेत श्री महाराजांची आरती व पुष्पवृष्टी.. व नंतर महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
..त्या नंतर वंदनीय श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पण करण्यात आले.. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील घार्गे साहेब व श्री.अशोक आबा गोडसे यांनी आपले धार्मिक व सामाजिक मनोगत व्यक्त केले..
..या वेळी पुणे स्थित मारुती स्टील कंपनी चे एम.डी.श्री. दिपक बतिजा साहेब..सारसबाग ग्रुपचे संस्थापक आणि म्हाडा कंपनी चे अधिकारी सतीश राऊत..संजय नाईक सर्..श्री.शैलेश आंदेकर तसेच पुणे येथील सर्व सभासद..आत्मनिर्भर भारत अभियानचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.अजय शेटे.. निवृत्त प्राचार्य श्री.मिलिंद घार्गे सर..श्री.हणमंत साळुंखे.. सागर पाटोळे..श्री गणेश वाडी ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ हजर होते..
No comments:
Post a Comment