Saturday, February 5, 2022

भारताचा सूर आज हरपला , गान कोकिळे च स्वर आकाशवाणी बनून अनंतात विलीन..ख्यात नाम पार्श्व गायिका लता मंगेशकर काळाच्या पडद्यामागे


 भारताचा सूर आज हरपला , गान कोकिळे च स्वर आकाशवाणी बनून अनंतात विलीन..ख्यात नाम पार्श्व गायिका लता मंगेशकर काळाच्या पडद्यामागे , 
सातारा दि 6 :-   प्रतिनिधी विशेष लेख प्रा.अजय शेटे.. वडूज.
 गान कोकिळे च स्वर आकाशवाणी बनून अनंतात विलीन..ख्यात नाम पार्श्व गायिका लता मंगेशकर काळाच्या पडद्यामागे 
भारताची गानकोकिळा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या ख्यातनाम पार्श्व गायिका लता मंगेशकर यांचा जन्म 20 सप्टेंबर 1929 मध्ये मध्य प्रदेश राज्यातील इंदोर या वी गावी झाला होता.
त्यांचे कुटुंबीय हे भारतातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब म्हणून ओळखले जाते.त्यांचे आजोबा गणेश भट हे कऱ्हाडे ब्राम्हण होते.त्यांचे मूळ नाव हर्डीकर होते .परंतु गोवा राज्यातील मंगेशी या गावातील  श्री मंगेशी या प्रसिद्ध देवस्थान चे नावावरून त्यांनी आपले नाव मंगेशकर असे केले होते.
..त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 डिसेंबर 1900 रोजी मंगेशी..गोवा येथे झाला होता.ते शास्त्रीय संगीतकार व गायक होते.त्यांचे पहिले लग्न हे गुजराथ येथील थालमेंर चे  व्यापारी हरिदास रामदास लाल यांच्या नर्मदा या मुलीशी झाला होता.पण ती अकाली मृत झाल्यामुळे तिचीच दुसरी लहान बहिण शेवंती हिच्याबरोबर वी त्यांचे दुसरे लग्न झाले.याच पुढे माई मंगेशकर म्हणून परिचित झाल्या.या दाम्पत्याला लता..उषा.. आशा..मीना व हृदयनाथ अशी पाच अपत्ये झाली.लता यांचे पाळण्या तील नाव 'हृद या' होते..नंतर ते ' हेमा ' असे झाले. व परत वयाच्या ६ व्या वर्षी ' लता ' हे नाव ठेवण्यात आले.
.. मा स्टर दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीत नाटक करायचे त्यात त्यांनी लता यांना पहिल्यांदा बालकलाकार म्हणून अभिनयाची संधी दिली. व शास्त्रीय गायन व संगीत यांचे बाळकडू पाजले.
..1942 साली  मा.दिनानाथ हे अकाली निर्वतले.आणि वयाच्या 13 व्या वर्षी सर्व कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकर यांचेवर आली.तेथून पुढे या कुटुंबाला आधार देण्याचे कार्य मा.विनायक दामोदर कर्नाटकी यांनी केले. लता मंगेशकर यांच्यासह सर्वांचा सांभाळ त्यांनी केला. व लता यांना  1942 साली वयाच्या 13 व्या वर्षी ' पहिली मंगला गौर या चित्रपटातील  ' किती हसाल ? ' या मराठी गाण्याचे पार्श्व गायन करण्याची महत्वाची संधी प्राप्त करून दिली.
..पुढे ' मजबूर ' या हिंदी चित्रपटात त्यांना ' दिलं मेरा थोडा ' हे गाणे गाण्याची संधी त्यांना मिळाली.त्यांनी 1942 पासून आजपर्यंत जवळजवळ 20 मराठी व 980 हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व गायन केले. त्यांच्या या यशात उस्ताद अमानिता खान..गुलाम हैदर..अनिल विश्वास..शंकर जयकिशन ..सलील चौ ध री या गीतकार व संगीतकार  यांचा वाटा खूप मोठा ठरला .त्यांनी मीनाकुमारी..वैजयंती माला..नर्गिस..मधुबाला पासून काजोल..माधुरी दीक्षित..ऐश्वर्या रॉय पर्यंत सर्व वयाच्या नायिकांना आपल्या जादुई आवाजाने यशाच्या शिखरावर पोहचवले.' दो आंखे बारा हात.. मुगले आझम..पासून ते हम आपके हैं कौन ' या चित्र पटा पर्यंत त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गीत रसिकांना दिली.' सत्यम..शिवम..सुंदरम ' या  गाण्याने त्यांना लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोहचवले..सन 1974 ते 1991 या काळात गाण्यांच्या ध्वनी मुद्रण   क्षेत्रात  त्यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड ' मध्ये नोंदवले गेले..
. . लता मंगेशकर या आयुष्यभर अविवाहित राहिल्या..त्याच्या अनेक कथा चित्रपट क्षेत्र व प्रसार माध्यमांनी सांगितल्या..सन 1935 मध्ये जन्मलेल्या व त्यांचा पेक्षा वयाने 6  वर्षे लहान असलेल्या व त्यांचे लहान भाऊ प.हृदयनाथ मंगेशकर यांचे मित्र असलेल्या राजस्थान येथील डूनंगुर पुर राजघरण्यातील क्रिकेट खेळाडू  महाराजा राज सिंग यांचे बरोबर त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. पण लता या राज घराण्यातील नसल्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही..पुढे त्यांच्यावरील प्रेमापोटी महाराजा राज सिंग हे पण अविवाहित राहिले.पुढे आसाम चे प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांच्या बरोबरही त्यांच्या लग्नाचा असफल प्रयत्न झाला.  पुढे  मोठ्या असल्यामुळे त्यांनी कुटुंबाची जबाबदारी ओळखून  कायम अविवाहित राहण्याचा निर्णय कायम ठेवला..
..त्यांना 1989 साली भारत रत्न..2001साली दादासाहेब फाळके अवॉर्ड ..फिल्म फेअर..पद्मभूषण..पद्मविभूषण व इतर असे सर्व मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. 
..त्यांनी महमद रफी यांच्या बरोबर सर्वाधिक गाणी गायली पण अचानकपणे त्या त्यांच्या पासून ही  दूर गेल्या व पुढे कायम दोघात अबोला राहिला. त्यानंतर मुकेश..किशोर कुमार..  म न्ना डे..हेमंतकुमार.. सुधीर फडके..रवींद्र साठे..यांच्या बरोबरही गाणी गायली.
त्यांनी एकूण 36 भारतीय भाषा व परदेशी भाषांमध्येही गाणी गायली आहेत..इंग्लंड मधील जगप्रसिद्ध अशा ' अल्बर्ट हॉल ' मध्ये गायनाचा कार्यक्रम करणाऱ्या त्या एकमेव भारतीय गायिका ठरल्या आहेत..
..त्यांच्या  पश्चात लहान बहिणी आशा भोसले..मीना खडीकर..उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांनी ही आपल्या घराण्याची संगीत साधना लता दीदींच्या पावलावर पाऊल ठेवून आदर्श रित्या पुढे चालू ठेवली..
..त्यांचे ठाकरे कुटुंबीय व राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांच्याशी विशेष जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत..
..त्यांनी ' आता विसाव्याचे क्षण ..माझे सोनियाचे मनी ' हे शेवटचे मराठी गाणे 2020 साली गाऊन आपली गायन क्षेत्रातील तब्बल 60 वर्षाची कारकीर्द थांबवली..
..आज रविवार दि.6 रोजी सकाळी 9 वा.मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात लता दिंदिंचे निधन झाले..गेली 27 दिवस त्यांच्यावर न्युमोनिया व कोरोना आजारावर उपचार चालू होते..शेवटी ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज चालत नाही. लता दीदी यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांना सद्गती लाभो.त्यांच्या महान पार्श्वगायन कार्यास समस्त भारत वासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.. व विनम्र अभिवादन **

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...