Wednesday, September 29, 2021

माहेरची आणि सासरची नाळ जोडायला येतीये कुसुम फक्त सोनी मराठीवर


माहेरची आणि सासरची नाळ जोडायला येतीये कुसुम फक्त सोनी मराठीवर 
 
मुंबई  २९ सप्टेंबर २०२१ : सोनी मराठी वाहिनीवर  कुसुम  ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या  शीतली  या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे नवीन मराठी मालिका, कुसुम. कुसुम  ही मालिका ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. 
सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आईबापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जबाबदाऱ्या  उत्तम पार पाडते.
 
२००१ साली हिंदीमध्ये  कुसुम नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी अवतारआहे. तेव्हाही  ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कुसुम  दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल. सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते.   
 
 या मालिकेबद्दल एकता कपूर म्हणाली की २१ वर्षानंतर  कुसुम  प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर  कुसुम  आणण्याची संधी मला मिळाली.  कुसुम  ही  मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली. पाहायला विसरू नका  कुसुम , ४ ऑक्टोबर पासून, संध्या. ८:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर

आरोही हेल्थ केअर सेंटर चे उद्घाटन

 आरोही हेल्थ केअर सेंटर चे उद्घाटन
 वडूज दि.19 प्रतिनिधी .. वडूज येथे बाजार चौक..धान्य बाजार मधील श्री गजानन हाइट्स या व्यापारी संकुलात हे आरोग्य केंद्र  सुरू करण्यात आले आहे.
या शॉपीचे उद्घाटन नगर पंचायतीच्या उप नगराध्यक्षा सौ.किशोरी पाटील मॅडम यांच्या हस्ते पूजन करून  करण्यात आले.
..यावेळी मा. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.अजय शेटे हे उपस्थित होते..हे केंद्र व डू ज व पंचक्रोशी यांच्या सेवेला पात्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
..या केंद्राला नगरसेवक अनिल माळी..महेश गुरव ..शहाजी गोडसे.. दिपक बोडरे.. दिपक गोडसे .. संतोष पाटील यांनी भेट देवून शुभ चिंतन व्यक्त केले..
..या केंद्राच्या माध्यमातून सर्व वयाच्या स्त्री..पुरुष रुग्णांवर सांधेदुखी.. व मणक्याचे विकार यावर अतिशय कमी सेवा शुल्क घेवून मोफत उपचार केले जाणार आहेत असे या केंद्राचे संचालक अविनाश सरवदे व अश्विन म्हामने यांनी सांगितले..

Tuesday, September 28, 2021

संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात संपन्न



संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात  संपन्न
संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात  संपन्न
औरंगाबाद दि 28:-  प्रतिनिधी
संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात व सर्व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.या वेळी श्री मन्मथस्वामी व क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते मा.खा.चंद्रकांत खैरे साहेब,   उदघाटक डॉ शिवकुमार संतपुरे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, 
माजी नगरसेवक विरभद्र गादगे, मा.सौ.कविता नावंदे(जिल्हा क्रीडधिकारी), मा.सौ.अंजली मिटकर-हुरणे(औषधी निरीक्षक), मा.सौ. भारती सोसे(क.प्रकल्प अधिकारी मा.उ. वि. के.), मा.श्री. सागर अप्पा वाडकर, यांची उपस्थिती होती. 
अहवाल वाचन प्रा.नंदकिशोर गवंडर यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री शिवा अप्पा खांडखुळे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जयश्री लद्दे यांनी केले.सचिव कैलासअप्पा झारेकर यांनी आभार प्रदर्शन केले.या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व संचालक व कर्मचारी वृंद,सभासद यांची उपस्थिती होती.

आर..फिट न्यूट्रीशन शॉपी चे उद्घाटन

 आर..फिट न्यूट्रीशन शॉपी चे उद्घाटन 
वडूज... दि.19 प्रतिनिधी .श्री अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर येथील कर्मवीर नगर मध्ये आर..फिट न्यू ट्री श न शॉपी चे उद्घाटन प्रसिद्ध वाहन व्यावसायिक श्री.वसंत राव माळी बापू व  मा.पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.अजय शेटे यांच्या हस्ते मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत केले गेले..तरुण स्त्री..पुरुष खेळाडू व युवावर्ग यांचे आरोग्य या शॉपी च्या माध्यमातून जपले जाईल .असे या वेळी प्रा.अजय शेटे यांनी सांगितले..
..तरुण वर्गातील जिम चे आकर्षण व बलसंवर्धना साठी या शाखेच्या माध्यमातून तरुण मुले..मुली तसेच गृहस्थ जीवन जगणारे स्त्री ..पुरुष यांचे साठी जिम व्यायाम प्रशिक्षण व त्यास आवश्यक असणारा पूरक आहार यांची माहिती व पुरवठा करण्यात येणार आहे.असे या शॉपीचे संचालक व सर्टि फांईड ट्रेनर  ऋतुराज राजेश माळी यानी सांगितले..
..कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या शाखेच्या माध्यमातून आरोग्य जागृती व  देशी..विदेशी पोषक व शक्तिशाली  अन्न व पेये  यांचे बाबतीत नक्कीच जागृती होईल असे सहाय्यक संचालक श्री .राजेश माळी यांनी सांगितले 

Saturday, September 25, 2021

निस्वार्थी समाज कार्याचा पुन्हा सन्मानसा.पोलीस तपास पुन्हा गौरवमातुछाया ट्रस्ट तर्फे मुंबई सत्कार


निस्वार्थी समाज कार्याचा पुन्हा सन्मान
सा.पोलीस तपास पुन्हा गौरव
मातुछाया ट्रस्ट तर्फे मुंबई सत्कार
मनमाड दि प्रतिनिधी 
देशातील कोरोना कार्यकाळात संबंध नाशिक सह जवळील जिल्हातील पोलीस अधिकारी,शासकीय अधिकारी,समाजासाठी चांगली सेवा बजावणारा अधिकारांचा समाज सेवकांचा जिल्हासह,अनेक शेजारील जिल्हाल्यात स्व:ताचा खर्चाने फिरुन,निस्वार्थ पणे सेवा भावी वुर्ती ठेवुन,सामाजीक कार्याला वाहुन घेत,स्व:ताचा जिवाची कुठली ही पर्वा न करता,पोलीस दलाचा अधिकारी,पोलीस कर्मचारी,डाँक्टर नर्स ,खर्रा अर्धाने समाजाची सेवा करणारे समाज सेवकांचा साप्ताहिक पोलीस तपास तर्फे मनोधैर्य बहुमान वाढविणारे,लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते व शिव व्यापारी सेनेचे जिल्हा अध्यक्ष,व राज्य संघटक, कट्टर ऐक निष्ठ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक,व साप्ताहिक पोलीस तपासचे महाराष्ट्र चिफ श्री.गणेश शांतीलाल देशमुख यांचा सामाजीक कार्याची,सेवाभावी वुर्त्तीची,समाजा प्रति असलेल्या तळमळीची,ज्या ही कार्यात हात घालेल त्या कार्याला त्या कामाला ऐकनिष्ठेने पुर्ण करुनच सोडणार,मातीचे हि सोनेच करणारा,तुटेगे लेकीन झुकेगे नही असा अहवलियाचा कार्याची दखल घेत, कल्याण ( मुंबई ) येथील तळागाळातील गोर गरीबाना मदत करणारी समाजासाठी कार्य करणारी संस्था "मातुछाया ट्रस्टने" कोरोना योध्दाचा सन्मान देत त्यांचा कार्याचा बहुमान गौरव केला आहे,लवकरच मुंबई येथे सत्कार करुन श्री गणेश देशमुखाना हे कोरोना योध्दा सन्मान बहाल  केला जाणार आहे,नाशिक जिल्हातील ऐका छोटयाशा मनमाड सारख्या शहरातुन कुठलीही राजकीय पार्श्वभुमी नाही,कुठलेही राजकीय पाठबळ किंवा पाठींबा नसतांना,स्व:ताचा कुर्तुत्वाने मनमाड सह नाशिक जिल्हाची संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या धडाकेबाज कार्याने ओळख निर्माण करुन,वेगळा ठसा उमटवणारे श्री.गणेश देशमुखांचा बहुमान हा नाशिक जिल्हा,मनमाड शहरांचा,तसेच सर्व लिंगायत समाज बांधवांचा सत्कार आहे.शाब्बास.... गणेशआप्पा*
🔸 *लिंगायत संघर्ष समिती नासिक* *जिल्हा समिती व उत्तर* *महाराष्ट्र* 🔸

Friday, September 24, 2021

लिंगायत समाजातील सर्वानी एकत्रआले पाहिजे या साठी समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे राजुशेठ घुटे

 समाजातील सर्वानी एकत्र
आले पाहिजे या साठी समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे  राजुशेठ घुटे 
उंब्रज दि :-  प्रतिनिधी
लिंगायत समाजातील सर्वानी एकत्र
आले पाहिजे या साठी समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे  राजुशेठ घुटे 
राजूशेठ घुटे यांनी उदयोग क्षेत्रामध्ये लिंगायत समाजाचे नाव उज्वल केले . उंब्रज तालूका कराड येथील लिंगायत समाजातील उदयोजक् राजूशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला पुरस्कार आणी उदयोग ग्रामीण भागात   चांगले काम केल्या बद्दल् अमेरिकेन युनिव्हर्ससिटी ची डॉक्टरेट ही पदवी मिळाल्या बद्दल उंब्रज मधील समस्त लिंगायत समाज यांचे वतीने  राजूशेट  घुटे  यांचा सत्कार करणेत आला  यावेळी बोलताना राजूशेठ बोलले की लिंगायत समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे  सर्व समाजांनी एकत्र आले पाहिजे  असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले ,
यावेळी उंब्रज मधील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनी हजर  होते

Thursday, September 23, 2021

खानापुरात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा.


खानापुरात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा..
 खानापूर: दि 23 प्रतिनिधी लिंगायत TV live  ( शिवकुमार कल्याणी )
राष्ट्रसंत,लिंगैक्य, डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे प्रथम स्मृतिदिन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला,गुरूवर्यांनी राष्ट्रप्रेम, पर्यावरण संरक्षण,व किर्तन, सत्संग व भजनातुन समाजप्रबोधनाचे अतुल्य कार्य केले,वयाचे शंभरी पार केल्यानंतर  ते ज्या तडफडीने समाजाला मार्गदर्शन करीत होते ती त्यांच्यातली ऊर्जा आश्चर्यकारकच  होती, अध्यात्मिक क्षेत्रातील एक विज्ञाननिष्ठ कर्मयोगी अशी गुरूमाऊली राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची ओळख होती,अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्याप्रति शब्दसुमनांजली अर्पण केली, खानापूर येथील विरभद्र स्वामी मठात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  माजी उपसरपंच अनंत पाटील खानापूर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी राष्ट्रसंताच्या स्मृतींची पुष्पपुजा करून अभिवादन करण्यात आले,व तदनंतर भावीक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, यावेळी , ग्रामपंचायत सदस्य राजेश्वर अटकळे, मारोती परबते,रवी कामशेटे, नांदेड ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार ताडकोले, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पटणे,संजय धनसुरे, बसवेश्वर भजनी मंडळाचे शंकर पटणे , उमाकांत स्वामी व इतर अनेक गावकऱ्यांची उपस्थिती होती..

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...