Sunday, May 29, 2022

वीरशेेेैव हितसंवर्धक मंडळाची नविन कार्यकारीणी जाहिर

 


वीरशेेेैव हितसंवर्धक मंडळाची नविन कार्यकारीणी जाहिर
यवतमाळ दि 29 प्रतिनिधी निलेश शेटे लिंगायत TV live
वीरशेेेैव हितसंवर्धक मंडळाची नविन कार्यकारीणी जाहिर
अध्यक्षपदी डॉ.जयेश हातगांवकर, उपाध्यक्षपदी डॉ.प्रा. किशोर मांडगावकर,तर सचिव पदी निलेश शेटे ह्यांची निवड
लिंगायत समाज यवतमाळच्या वीरशैव हितसंवर्धक मंडळ, यवतमाळची २०२२-२०२५ करिता नवनीवार्चीत कार्यकारिणीची सर्व सम्मंतीने निवड करण्यात आली.
वीरशैव हितसंवर्धक मंडाळाची २०२१-२२ची वार्षीक आमसभा डॉ.अशोक मेनकुदळे ह्यांचे अध्यक्षेते खाली महात्मा बसवेश्वर भवन येथे संप्पन झाली,प्रास्तावीक सचिव निलेश शेटे ह्यांनी केले तसेच  २०२१-२२ चे संपुर्ण जमा खर्च वाचुन दाखवुन त्यास मान्यता सर्वानुमते  देण्यात आली.ह्यानंतर नविन कार्यकारीणी ची निवड  सर्वानुमते करण्यात आली ह्या मध्ये अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर, उपाध्यक्षपदी डॉ.प्रा. किशोर मांडगावकर, सचिव पदी निलेश शेटे,सहसचिव पदी गजानन हातगांवकर, कोषाध्यक्ष पदि गिरीष गाढवे,सदस्य म्हणुन विनोद देशमुख, नागेश कुल्ली, रमेश केळकर, राजु कुऱ्हेकार,जयंत डोंगरे,भुषण तंबाखे,ह्यांची निवड करण्यात आली आणि सल्लागार पदी अध्यक्ष म्हणून डॉ.अशोक मेनकुदळे, चंद्रशेखर उमरे रविंन्द्र दिवे,सुधाकर केळकर,सुरेश शेटे,महेश्वरराव गाढवे,प्रकाश चनेवार,अशोक तेले,विनोद नारिंगे,विजय देशमुख,
तांत्रिक प्रमुख प्रदिप उमरे,निर्मल ठोंबरे ह्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.ह्यानंतर नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वांचे आभार मानले तसेच भविष्यात मंडळाला विशिष्ट उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला आणि  नवनिर्वाचीत कार्यकारिणीत नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.त्यामुळे आता 
लिंगायत समाजामध्ये नवनवीन कार्य करू असे आश्वासित केले,
नवनिर्वाचीत कार्यकारीणीची लिंगायत समाजातील सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

Saturday, May 28, 2022

डॉ.शिवमूर्ती बसाप्पा शाहीर शिवैक्य


 डॉ.शिवमूर्ती बसाप्पा शाहीर शिवैक्य 
सातारा, दि.28 -प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
 नाशिक जिल्ह्याचे समाजभूषण असलेले धोंडबे या गावचे सुपुत्र व सोलापूर येथे स्थायिक होऊन वैद्यकीय व्यवसाय व समाज कार्य यामध्ये भरीव योगदान देणारे डॉ.शिवमूर्ती बसाप्पा शाहीर हे शुक्रवार दि.28 रोजी शिवैक्य झाले.
लिंगायत समाजाच्या जुन्या पिढीतील ते पाहिले एम. बी. बी.एस डॉक्टर  होते.ते महाराष्ट्र वीरशैव सभा,पुणे चे संस्थापक आधारवड होते.सोलापूर जिल्ह्याचे प्रांताध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.तसेच सोलापूरच्या शैक्षणिक,सहकार व कृषी क्षेत्रातही भरीव योगदान दिले होते.श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे ते विद्यमान विश्वस्त होते.श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.श्री वीरशैव महाजन सभा ट्रस्टचे ते उपाध्यक्ष पण होते.समाजकार्यातील भीष्माचार्य व मार्गदर्शक श्रद्धास्थान म्हणूनही त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असे त्यांच्या लिंगैक्य होण्याने समाज चळवळीतील एक विद्यापीठ काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वांना अतिशय दुःख झाले आहे.
त्यांना वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.ओम शांती!

Friday, May 27, 2022

डॉ.अशोक नगरकर यांना उच्च ऊर्जा स्त्रोत प्रणाली विकास व सुरक्षा पुरस्कार प्राप्त


डॉ.अशोक नगरकर यांना उच्च ऊर्जा स्त्रोत प्रणाली विकास व सुरक्षा पुरस्कार प्राप्त 
सातारा, दि.27 - प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी 
डी. आर .डी. ओ, ( सुरक्षा संशोधन विकास संस्था ) पुणे या संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक गोविंद नगरकर यांना  राष्ट्रीय उच्च ऊर्जा स्त्रोत प्रणाली विकसन व सुरक्षा कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारा अतिशय मानाचा असा  ' उच्च ऊर्जा विकास व सुरक्षा ' पुरस्कार देवून नुकतेच ' संरक्षक व भेदक क्षेपणास्त्र संशोधन प्रयोगशाळा , ' डी.आर डी. ओ. चंदिगढ - पंचकुला  येथील कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार राष्ट्रीय स्वरूपाचा असून भारतीय केंद्र शासनाच्या सहकार्याने प्रदान करण्यात येतो.प्रशस्तीपत्र,ट्रॉफी व इतर लाभ असे या पुरस्काराचे स्वरूप असून उपस्थित सर्व मान्यवर वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी बहिस्थ शास्त्रज्ञ मार्गदर्शक तसेच उच्च ऊर्जा स्त्रोत संशोधन व शिक्षण विभाग डी आर डी ओ चे वरिष्ठ शास्त्रज्ञ मा. के पी एस मूर्ती, टी बी आर एल , डी आर डी ओ चे वरिष्ठ संचालक मा.प्रतीक किशोर, सर्वसाधरण क्षेपणास्त्र प्रणाली चे वरिष्ठ संचालक मा.डॉ.नारायण मूर्ती,सतीश धवन अंतरिक्ष व अंतराळ संशोधन केंद्र , इस्त्रो चे वरिष्ठ संचालक मा.राजा राजन तसेच आर्मामेंट क्लस्टर , डी. आर, डी. ओ .चे वरिष्ठ संचालक मा.पी. के.मेहता साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
   डॉ.अशोक गोविंद नगरकर यांना हा श्रेष्ठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांच्या तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा,हार्दिक शुभेच्छा.

सामूहिक विवाह ही लोकचळवळ व्हावी : श्री काशी जगद्गुरू सर्वधर्मीय 35 जोडपी झाले विवाहबद्ध


सामूहिक विवाह ही लोकचळवळ व्हावी : श्री काशी जगद्गुरू 
सर्वधर्मीय 35 जोडपी झाले विवाहबद्ध
बागलकोट दि 26 : राजशेखर बुरुकुले प्रतिनिधी
 कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकांवर झालेला आहे. विवाह समारंभ पार पाडणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. त्यामुळे सामूहिक विवाह ही सध्याच्या काळातील गरज बनली आहे. प्रत्येक गावागावात सामूहिक विवाह समारंभ झाले पाहिजेत. सामूहिक विवाह ही लोकचळवळ बनली पाहिजे असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
             बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील गिरीसागर येथील सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, काशीचे नुतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, बागलकोटचे आमदार इरण्णा चरंतीमठ, गिरीसागर कल्याण मठाचे मठाधिपती रुद्रमणि शिवाचार्य, मंद्रूप मठाचे मठाधिपती रेणुक शिवाचार्य तसेच बिलकेरी, कोळनुर, बिळगी, चळगेरी, मणीकेरी, मुत्तती आणि येमेगनूर येथील मठाधिपती उपस्थित होते.
          यावेळी गिरीसागर कल्याण मठाचे मठाधिपती रुद्रमणि शिवाचार्य यांच्या जन्म सुवर्णमहोत्सव आणि पट्टाभिषेक अमृतमहोत्सव निमित्त 35 जोडप्यांचा विवाह पार पडला.
             ते पुढे म्हणाले की सामूहिक विवाह समारंभ ही अनेक लोकांना उपयोगी आहे. सर्वधर्मीय सामूहिक विवाहामुळे समाजात एकोपा निर्माण होतो. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता येते. अशा विवाह समारंभात जगद्गुरु, धर्मगुरू, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहून आशीर्वाद देतात. त्यामुळे सामूहिक विवाह समारंभात लग्न होणे ही देखील भाग्याची गोष्ट आहे.

Thursday, May 26, 2022

श्री शनी जयंती निमित्त सोळशी येथे अनेक कार्यक्रम


 श्री शनी जयंती निमित्त सोळशी येथे अनेक कार्यक्रम 
सातारा, दि.26 -  प्रा.अजय शेटे.प्रतिनिधी
शनिवार दि.28 ते सोमवार दि.30 मे अखेर श्री शनैश्वर जयंती निमित्त श्री क्षेत्र सोळशी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिश नंदगिरी महाराज यांनी दिली.
यावेळी समाजामध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्री शनैश्वर कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे .
शनिवार ते सोमवार अखेर येथील श्री शिव मंदिरात एक कोटी बेलार्पण व महारुद्राभिषेक केला जाणार आहे तसेच शनिवारी श्री शिवलीलामृत पारायण व इतर धार्मिक कार्यक्रम तसेच रविवारी दु.एक वाजता श्री शनी महात्म्य पारायण , गोपूजन,धर्म ध्वजवंदन व भजन आदी कार्यक्रम होतील सोमवारी पहाटे पासून धार्मिक विधी व दुपारी अडीच वाजता श्री त्यागेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढली जाईल संध्या. सहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री शनैश्वर कृतज्ञता पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
यंदाचा युवा धर्मरक्षा पुरस्कार मा.धनंजय देसाई, भूमिपुत्र पुरस्कार मा.मंगेश धुमाळ,गोरक्षा पुरस्कार मा.शिवशंकर स्वामी, प्रगतशील शेतकरी पुरस्कार मा.जालिंदर सोळस्कर यांना देण्यात येणार आहे.त्यानंतर श्री शनैश्वर जन्मोत्सव सोहळा व महाआरती करण्यात येईल .
या कार्यक्रमाला सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी,द्वारकेचे जगद्गुरु सूर्योचार्य कृष्णानंदगिरी महाराज, शांतीगिरी महाराज,बुद्ध गिरी शितलगिरी  महाराज,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदींसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तेव्हा सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी हजर रहावे.असे आवाहन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट व सेवेकरी मंडळ यांनी केले आहे.
  तसेच हे हिंदू देवस्थान असून लिंगायत समाजाचे पवित्र असे स्थान आहे.येथे सर्व धार्मिक संस्काराचे जातं केले जाऊन अनेक गरजू विद्यार्थ्यांना शाळेत व धार्मिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते.संस्थान तर्फे येणाऱ्या सर्व भक्तांना वेळेनुसार नाष्टा,भोजन व चहाचा महाप्रसाद दिला जातो.तसेच अनेक उपक्रम हे पूर्णपणे मोफत केले जातात.असे मा.नंदगिरी महाराज यांनी बुधवार दि.25 रोजी संध्या. 6 वा.संस्थान मध्ये दर्शनासाठी गेलेल्या श्री.सतीश शेटे,प्रा.एन .एस.गोडसे सर्,प्रा.नागनाथ स्वामी , श्री.प्रदिप शेटे,श्री अशोक काळे,डॉ.चंद्रशेखर येवले यांना सांगितले.

Wednesday, May 25, 2022

आयुष्यात "श्रद्धा" आणि "श्रबुरी" महत्वाची : स्व.विलासराव देशमुख साहेब यांची एक अविस्मरणीय आठवण,विशेष लेख - मंगेश चिवटे


आयुष्यात "श्रद्धा" आणि "श्रबुरी" महत्वाची : स्व.विलासराव देशमुख साहेब यांची एक अविस्मरणीय आठवण,
विशेष लेख - मंगेश चिवटे,
जवळपास 11 वर्षांपूर्वी, 2009 साली मार्च-एप्रिल महिन्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या समवेत लोकसभा निवडणुकांच्या काळात स्टार माझा ( सध्याचे ABP माझा ) वृत्तवाहिनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून  " एक दिवस, एक नेता " कार्यक्रम करण्याची संधी संपादक राजीव खांडेकर सर यांनी दिली होती...माझे वरिष्ठ सहकारी निलेश खरे सर यांनी यावेळी काही महत्वाच्या नेत्यांसोबत तू कार्यक्रम कर, भरपूर शिकायला मिळेल - अनुभव येईल असे सांगत तुझ्या आवडत्या स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्यासमवेत तू कार्यक्रम कर असे सांगितले...
आदरणीय स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्या झंझावाती प्रचारसभा त्यावेळी मी अनुभवल्या... खरं तर मुख्यमंत्री म्हणून 2009 साली निवडणुकांना सामोर जाण्याची प्रचंड त्यांची प्रचंड इच्छा होती...पण नियतीला ते मान्य नव्हते...26/11च्या हल्ल्यानंतर ते मुख्यमंत्री 
पदावरून पायउतार झाले होते..परंतु तरीही विदर्भ, मराठवाडा सहित संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये तूफानी प्रचार सभा घेत होते...काँग्रेस पक्षासाठी सतत...अविरत आणि अविश्रांत...झटत होते...एका दिवसात जवळपास 6 ते 7 प्रचारसभा घेत होते...घसा बसलेला असताना स्व.विलासराव वारंवार कंठ सुधारक वटी खात भाषणं देत होते...

आमचे चार्टेड फ्लाइट नागपुर मधून टेक ऑफ करण्याच्या अगोदर..साहेबांना एक फोन आला...बहुतेक समोरच्या व्यक्तीला साहेबांचा आवाज नीट ऐकू जात नसावा...*तेव्हा साहेब पुन्हा म्हणाले..बोला, बोला...*" मी विलास देशमुखच बोलतोय"...मला थोडेसे विचित्र वाटत होते...*कारण जेव्हापासून राजकारण समजू लागले तेव्हापासून कायम "विलासराव देशमुख "असेच नाव एकत आलो होतो...न राहवून मी साहेबाना विचारले साहेब "आपण फोनवर  स्वतःला संबोधित करताना विलास देशमुख असे म्हणालात...ऐकायला थोड़े विचित्र वाटले...कारण आम्ही आजपर्यंत फ़क्त विलासराव देशमुख असेच एकत लहानाचे मोठे झालो.." 
*त्यावर साहेबानी अतिशय मार्मिक उत्तर दिले होते...*
*"मोठेपणा हा कधी स्वतःहून घ्यायचा नसतो...तो दुसऱ्यांनी द्यायला हवा...आणि त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा..."*

आज गल्ली तले "राव, भाऊ, शेट, दीदी, दादा, नेते, सरकार " ही विशेषण लावणारे पुढारी कुठे....आणि विलासराव साहेब कुठे...?? 

*अजुन एक गोष्ट त्यांनी मला प्रवासात सांगितली....साहेब नेहमी म्हणायचे....आयुष्यात दोन गोष्टी खुप महत्वाच्या....*
*" श्रद्धा "आणि " श्रबुरी"....ही शिर्डीच्या साईं बाबांची शिकवण....जीवनात संयम खुप महत्वचा....पराभावाने खचून जावू नका...आणि विजयाने उन्माद येवू देवू नका...*

( स्व.देशमुख साहेब "सबुरी"च्या ऐवजी "श्रबुरी" म्हणायचे ) 
 
आणखी एक आठवण 

*तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, त्यामुळे सकारात्मक विचार करा - स्व.विलासराव देशमुख*

साधारणतः 2002 साली , मी नववीत असताना माझ्या गावी करमाळा पासून 30 किलोमीटर अंतरावर श्री मकाई सहकारी साखर कारखाना येथे स्व. विलासराव देशमुख साहेब हेलिकॉप्टरने भूमिपूजनच्या की गळीत हंगामच्या  कार्यक्रमाला येणार होते अशी माहिती मिळाली होती...एकाचवेळी 2 गोष्टींची इच्छापूर्ती होणार होती, एक म्हणजे स्व.विलासराव देशमुख यांस प्रत्यक्षात पाहणे आणि दुसरे म्हणजे हेलिकॉप्टर पाहणे...

...याच मकाई कारखानाचे संस्थापक स्व.दिगंबरजी बागल यांच्या नेतृत्वाखाली सख्खे मोठे बंधू श्री महेश चिवटे यांची श्री मकाई कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून निवड झालेली होती..घरात वडीलबंधू शिस्तप्रिय असल्याने आणि दरम्यान शाळेत परीक्षा सुरू असल्याने कार्यक्रमाला जाण्याचा हट्ट करणे जवळपास अशक्य होते...

अजूनही लक्ख आठवतंय..त्यादिवशी चाचणी परीक्षा होती..आणि सकाळी 11 वाजता आमच्या महात्मा गांधी शाळेसमोर श्री मकाई कारखाना येथे कार्यक्रम ठिकाणी निघण्याच्या तयारीत असलेला एक कार्यकर्त्यांचा 407 टेम्पो उभा होता...मनात घालमेल सुरू झाली, एका बाजूला शाळा आणि दुसऱ्या बाजूला स्व.विलासराव देशमुख साहेब यांस समक्ष पाहण्याची - भेटण्याची तीव्र इच्छा... क्षणात निर्धार केला आणि टेम्पोत बसलो...धुरळा उडवीत टेम्पो भिलरवाडी येथे मकाई कारखाना ठिकाणी पोहोचला...

टेम्पोतून उतरताना पाहिलं, हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत होत...जिथं हेलिकॉप्टर उतरणार होतं, त्या जागेजवळ गेलो...तिथं प्रचंड पोलीस बंदोबस्त होता...हेलिपॅड जवळ येणाऱ्या आम्हा लोकांना पोलीस हुसकावून लावत होते आणि बेभान जनता हुरर...हुररर...करत शिट्ट्या वाजवीत होती..

हेलिकॉप्टर खाली उतरले...प्रचंड धुरळा उडाला...नाका-तोंडात माती गेली...हेलिकॉप्टरच्या पंख्याची गर- गर थांबली तशी धुरळा खाली बसला..आणि हेलिकॉप्टरमधून गॉगल घातलेलं - अंगावर जॅकेट चढविलेलं ऐटदार व्यक्तीमत्व बाहेर पडल...ते रुबाबदार म्हणजे अर्थातच स्व.विलासराव देशमुख साहेब यांचंच होत...हेलिपॅडच्या बाजूला जी बांबूचे वर्तुळाकार सुरक्षा कवच केले होते त्या ठिकाणहुन जनता स्व.विलासरावाना हात दाखवत होते...हाका मारत होते..साहेब देखील हसतमुखाने सर्वांना हात उंचावून प्रतिसाद देत होते...स्व.दिगंबर बागल यांनी स्व.विलासराव देशमुख यांचे हेलिपॅडवर स्वागत केले..आणि अलिशान गाड्यांचा ताफा स्टेजच्या ठिकाणी निघून गेला...

स्व.विलासराव देशमुख साहेबांना जवळून पाहता यावे यासाठी गर्दीतून वाट काढत स्टेजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला...पण काही शक्य झाले नाही...थोड्याच वेळात स्व.विलासराव देशमुख इतर मान्यवरांच्या सहित स्टेज वर दाखल झाले...मी दूर असलो तरी स्व.विलासरावांना नजरेत भरण्याचा प्रयत्न करत होतो...साहेब भाषणाला उभे राहिले आणि पब्लिक मध्ये शिट्ट्या, टाळ्या आणि एकच गदारोळ सुरू झाला...एवढ्या लहान वयात मला राजकीय परिपक्वता नव्हती, त्यामुळे स्व.विलासराव यांनी केलेल्या शाब्दिक कोट्या आणि नेमके कुणाला कोपरखळी मारली आठवत नाही...परंतू पब्लिकने साहेबांचे भाषण डोक्यावर घेतले होते... जवळपास 15 - 20 मिनिटे फक्त हशा - टाळ्या आणि शिट्या सुरू होत्या...मध्येच पब्लिक मधून कुणीतरी ईव...ईव...ईव...आवाज काढत स्व.विलासराव देशमुख साहेबांच्या भाषणाला प्रतिसाद देत होत...

स्व.देशमुख साहेबांच भाषण संपणाच्या दिशेने सुरू असतानाच स्टेजच्या डावीकडील एक घोळका उठला आणि संरक्षण D box च्या शेजारी धावू लागला...स्व.देशमुख साहेब यांस जवळून भेटण्याची सर्वांनाच इच्छा होती...मला हा अंदाज आल्याने मी देखील या घोळक्याचे दिशेने निघालो...आपल्या चाहत्यांना नाराज करतील ते विलासराव कसे...?? भाषण संपल्यावर स्व.देशमुख साहेब  तडक व्यासपीठावरून खाली आले आणि आणि सर्वांशी हस्तांदोलन करायला सुरूवात केली..स्व. विलासराव यांच्या हातात हात दिलेल्या लोकांचा आनंद अवर्णनीय होता..पण , या भाऊगर्दीत सहभागी झालेला मी निराश झालो होतो...कारण स्व.देशमुख यांच्यापर्यंत मला पोहोचताच आलं नव्हतं...स्व. देशमुख साहेब यांच्याशी आयुष्यात एकदा तरी हस्तांदोलन करायचच, एकदा तरी मुख्यमंत्र्यांना जवळून भेटायचच हा मनोमन निर्धार त्याक्षणी केला...स्व.विलासराव देशमुख यांचं हेलिकॉप्टर पुन्हा गर गर उडत आकाशात गुडूप झालं...मी आकाशाकडेच पाहत राहिलो...हेलिकॉप्टरच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता, आणि माझा निर्धार आणखी पक्का होत होता.... स्व.विलासराव देशमुख साहेब यांची माझी झालेली ही दूरवरूनची का होईना पण पहिली भेट...

एक दिवस - एक नेता या कार्यक्रमात संपूर्ण दिवसभर स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्यासमवेत हेलिकॉप्टर मधून आणि चार्टर विमानातून फिरण्याची संधी मिळली. एक खूप मोठ्या मनाचा माणूस आणि संवेदनशील राजकारणी अनुभवता आला. 

*स्व.विलासराव देशमुख साहेब यांची हेलिकॉप्टरमध्ये मुलाखत घेऊन झाल्यानंतर त्यांना माझ्या पहिल्या भेटीचा हा किस्सा वजा माझा निर्धार सांगितला..आणि स्व.देशमुख साहेब यांनी मनापासून दाद दिली...आणि एकच वाक्य म्हणाले , आयुष्यात आपण जसा विचार करतो, तशा गोष्टी घडतात...त्यामुळें नेहमी सकारात्मक विचार करा..*

सोबतच, नववीत असताना एवढया लहान वयात राजकारण - समाजकारणची कशी आवड होती? असा प्रश्न स्व. विलासरावानी मला विचारला..मी माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक - नगराध्यक्ष कै मनोहरपंत चिवटे आणि वडील पत्रकार श्री नरसिंह चिवटे यांचा पत्रकारितेचा संदर्भ दिला.. *त्यावेळी स्व.देशमुख साहेबांनी मला स्वातंत्र्यसैनिकाचे नातू आहात..त्यामुळे नावाला आयुष्यभर जपा असा सल्ला दिला...*

साहेब..आपण आज असता तर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नक्कीच आलो असतो...आपल्या 75 व्या जयंती निमित्त हार्दिक अभिवादन....



खानापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


खानापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
खानापूर दि 24 :-  शिवकुमार कल्याणी प्रतिनिधी लिंगायत TV live
 महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटपा च्या माध्यमातून जगाला लोकशाहीची देणगी दिली आहे.स्त्री पुरुष समानता व सामाजिक समतेचा संदेशा सोबत महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन खानापूर चे उपसरपंच श्री अनिल पाटील,  यांनी केले. खानापूर येथे, महात्मा बसवेश्वर जयंती समीतीने आयोजित केलेल्या बस्वव्याख्यान सोहळा व बसव व्याख्यानमालेत ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.

  यावेळी बसव पिठावर गावातील सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सर्व सेवा सहकारी सोसायटी सदस्य, जेष्ठ नागरिक ,तथा विविध समाजातील लोकप्रतिनिधींचे सत्कार शाल व श्रीफळ देऊन बसव समीतीच्या वतीने करण्यात आले,
 यावेळी व्यासपीठावर व्याख्याना पुर्वी संगीत सुरमणी रवीराज किडींले व त्यांच्या संच्यातर्फ अतिशय सुश्राव्य असे मंत्रमुग्ध करणारे बस्वगायन झाले व उपस्थितांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला ,
 त्यानंतर
, व्याख्यानमालेचे मुख्य वक्ते प्रा. डॉ.राजशेखर सोलापुरे यांच्या व्याख्यानाला सुरूवात झाली.
“बसव विचारांची वर्तमानातील उपयुक्तता” या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले की माणसाला माणूस बनवण्यासाठी बसव विचार आवश्यक असून काम करणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा देण्याचे काम
बसवेश्वरांनी केले आहे. महात्मा बसवेश्वर इतिहासाचे गायक नव्हे तर नायक होते. देशाचा प्रधानमंत्री कसा असावा याचा आदर्श आपल्या आचार व विचारातून बसवेश्वरांनी जगासमोर मांडला आहे. देशात देवालय नाहीतर ग्रंथालयाची गरज असून माणसाला सक्षम बनवण्यासाठी बसवेश्वरांच्या वचन साहित्याची आवश्यकता आहे. लिंगायत धर्मात कोणत्या प्रकारचे
सुतक नाही. महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत ओळख देऊन जाती संपले आहेत म्हणून आज जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी बसवण्णांच्या विचाराची गरज आहे. नैतिक राजकारणाचा आदर्श निर्माण करण्याचे काम बसवेश्वरांनी केले असून आजची संसद बसवेश्वराच्या विचाराने काम केल्यास भारत महासत्ता होईल असे परखड मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार संजय आगलावे यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनंत  पाटील खानापूरकर,माजी सरपंच भगवान विभुते ,मारोती परबते,राजेश्वर अटकळे , ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी गौतम मंगनाळे, गौतम वाघमारे, पंडीत वाघमारे, खानापूर मठातील गुरू श्री शिवराज महाराज मठवाले, बसवजयंती उत्सवाचे
 मन्मथ परबते, उपाध्यक्ष राजु वळंके सचिव अरविंद धनसुरे,विनोद रायकोडे,विजय धनसुरे बसवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ,सदस्य,तथा गावातील  बसवप्रेमी समाज बांधव उपस्थित होते..

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...