श्री तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर मठाचे 33 वे नूतन उत्तराधिकारी म्हणून श्री आदिराज शिवाचार्य यांची रितसर दत्तक पत्रान्वये नियुक्ती. तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान क्षेत्र धारेश्वर ,पाटण येथे आज ष ब्र प्र १०८ पद्मभास्कर डाॅ निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचा ३८वा पिठारोहन वर्धापन दिन आणि तिलकोत्सव व दत्तक विधान सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा.
श्री तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर मठाचे 33 वे नूतन उत्तराधिकारी म्हणून श्री आदिराज शिवाचार्य यांची रितसर दत्तक पत्रान्वये नियुक्ती. तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान क्षेत्र धारेश्वर ,पाटण येथे आज ष ब्र प्र १०८ पद्मभास्कर डाॅ निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचा ३८वा पिठारोहन वर्धापन दिन आणि तिलकोत्सव व दत्तक विधान सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा.
पाटण , दि.1 - रवी वाकडे
श्री तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थांन धारेश्र्वर मठाचे 33 वे नूतन उत्तराधिकारी म्हणून रितसर दत्तक पत्र करून श्री आदीराज शिवाचार्य यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती हजारो भाविकांच्या साक्षीने करण्यात आली. हा धार्मिक सोहळा अतिशय उस्ताहात संपन्न झाला.
त्यानुसार श्री आदीराज शिवाचार्य यांचे नाव अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रामधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदिमठ धारेश्वर (पाटण/ सातारा ) मठाला नवे शिवाचार्य अशा रितीने जाहीर करण्यात आले. पाटण तालुक्यातील धारेश्वर मठ येथे हजारो भाविकांच्या साक्षीने हा धार्मिक सोहळा मंगळवारी दि. 31 जानेवारी रोजी संपूर्ण दिवसभर मोठ्या उस्ताहात संपन्न झाला .
श्री धारेश्वर मठाचे नूतन उत्तराधिकारी श्री आदीराज शिवाचार्य हे केवळ 14 वर्षाचे असून २१ वर्षानंतर त्यांचे सर्व धार्मिक शिक्षण पूर्ण झाले नंतर ते सर्व धार्मिक विधीत सहभागी होणार आहेत. या उत्तराधिकारी सोहळ्यास अनेक महाराज, साधू, संत, महंत व शिवाचार्य उपस्थित होते. हजारो भाविकांच्या साक्षीने हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. नूतन उत्तर अधिकारी यांचा तिलकरोहन तथा दत्तक विधान असा दैदिप्यमान सोहळा अनेक धार्मिक विधींनी संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये अनेक शिवाचार्य संत महंत उपस्थित होते .विशेष म्हणजे श्री गुरु मंहंत्तया रविशंकर शिवाचार्य महास्वामीजी रायपाटणकर यांच्या दैवत साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमांमध्ये श्री वाळवेकर महाराज ,श्री माढेकरकर महाराज,श्री परंडकर महाराज तसेच अनेक साधूसंत उपस्थित होते. अध्यक्ष श्री. बाळलिंग स्वामी मुंबई,सचिव श्री. रमेश स्वामी, मुंबई यांचे माहेश्वर वैदिक मंडळ, मुंबई व इतर स्वामीच्या वेद व मंत्र घोषात हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री धारेश्र्वर मठ येथे श्रीराम, पांडव यांचा अधिवास असल्याचे ऐतिहासिक दाखले दिले जातात. या मठात विविध प्रकारच्या धर्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असते.श्री धारेश्वर मठ निसर्गाच्या सानिध्यात आहे. याठिकाणी बारमाही डोंगरातून पाणी वाहत असते. लिंगायत समाजातील अनेक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात.


No comments:
Post a Comment