Sunday, February 5, 2023

जागतिक लिंगायत महासभा बेंगलोरच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण (जि. बिदर) येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन.

 जागतिक लिंगायत महासभा बेंगलोरच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण (जि. बिदर) येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन.


जागतिक लिंगायत महासभा बेंगलोरच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण (जि. बिदर) येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन.

                                                        

सातारा दि 5  ;- रविंद्र  वाकडे  प्रतिनिधी 

जागतिक लिंगायत महासभा बेंगलोरच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण (जि. बिदर) येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन आयोजित केले आहे.

     या महाअधिवेशनात प्रत्येक गावातील सर्व समाज बांधवांनी सहभागी होण्याचे नियोजन करण्याचे ठरले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी लिंगायत धर्म महासभेच्या सांगली व कोल्हापूर जिल्हा कोअर कमिटी आणि तालुकाध्यक्ष यांची मीटिंग जयसिंगपूर येथे पार पडली. यावेळी सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्वर,  बसवकल्याण येथील महात्मा बसवांना,  जगनमता अक्कमहादेवी,  श्री अल्लमप्रभूदेव, अक्कनगलंबिका,   चन्नबसवेश्वर, मडिवाळ माचीदेव, आंबिगर चौडया आदीसह शरण स्थळांची आणि अनुभव मंडप विषयी माहिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पिंपळे यांनी दिली.

      जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने आयोजित या महाअधिवेशनाची माहिती राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील यांनी दिली. तसेच उपस्थित सर्वांनी आपल्या भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये किमान एक लक्झरी करण्याचा निर्णय जाहीर केला.

       कोल्हापूर जिल्ह्यातून किमान दहा हजार शरण बांधव या महाधिवेशनात सहभागी होण्याचे नियोजन करण्याचे ठरले. तसेच सांगली जिल्ह्यातूनही किमान दहा हजार शरण बांधव या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी नियोजन करण्याचे ठरले. 

      या नियोजन बैठकीस लिंगायत धर्म महासभेच्या महिला राज्य अध्यक्षा श्रीमती वैशाली दिलीप पाटील,  महिला राज्य सरचिटणीस सौ. रश्मी अशोक चौगुले, सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल बापू कोठावळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्रीदेवी संजय कबाडे, महिला मिरज तालुकाध्यक्षा श्रीमती जयश्री दीपक खिलारे, शिरोळ महिला तालुकाध्यक्षा सौ. सारिका शिवप्रभू आवटी, कोल्हापूर जिल्हा सचिव संजय पानदारे आदी सह सांगली व कोल्हापूर जिल्हा कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...