बसव कल्याणमध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन,राज्यातून सुमारे २ लाख समाज बांधव उपस्थित राहणार .
बसव कल्याणमध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन,राज्यातून सुमारे २ लाख समाज बांधव उपस्थित राहणार .
कराड दि. 22 : रवींद्र वाकडे प्रतिनिधी
जागतिक लिंगायत महासभा आणि सर्व बसवतत्त्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ मार्च रोजी बसवकल्याण (कर्नाटक) येथे प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. प्रदीप वाले बापु, अध्यक्ष राष्ट्रीय लिंगायत संघ आणि असे आवाहन जागतिक लिंगायत महासभा यांचे वतीने करण्यात आले आहे.
जागतिक लिंगायत महासभेद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, १२ व्या शतकातील बसवादी शरणांचा त्याग व बलिदानाच्या समग्र क्रांती गर्भातून उगम पावलेला धर्म म्हणजे लिंगायत धर्म होय. लिंगभेद, जातीभेद, वर्गभेद याचे समूळ उच्चाटन करून विश्वबंधुत्वाच्या आधारावर उभारलेल्या लिंगायत धर्माला सांविधानिक मान्यता मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. स्वतंत्र धर्माचे आंदोलन आणि आरक्षणासाठीचा संघर्ष हा परस्पर विरूद्ध नसून, त्या पुरक आहेत. ज्याप्रमाणे बौद्ध, जैन, शिख यांनी स्वतंत्र धर्माची सांविधानिक मान्यता मिळविली असूनही आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्याप्रमाणे त्या दोन्हीचा लाभ घेण्याचा अधिकार लिंगायतांना आहे. ही सत्यता लिंगायतांनी जाणून घेतली पाहिजे.
त्यासाठीच ऐतिहासिक अशा बसवकल्याणमध्ये प्रथमच राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. 4 व 5 मार्च रोजी बसवकल्याण येथील थेर मैदानात आयोजित या अधिवेशनात लिंगायत धर्म, इतिहास, परंपरा, साहित्य, संस्कृती, लिंगायत समाजाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल या महत्वपूर्ण विषयांवर अभ्यासक, साहित्यिक, लेखक, विचारवंत व विविध मठांचे मठाधीश मार्गदर्शन करतील. याशिवाय अधिवेशनात महिला सत्र, युवा सत्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावेळी देशातील विविध राज्य व विदेशातील लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत. तसेच आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या सर्व पोटजातींतील समाज बांधवही उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात येणार असून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन , संजय हिरेकर केंद्रीय समन्वयक राष्ट्रीय लिंगायत संघ,राजशेखर तंबाके उपाध्यक्ष राष्ट्रीय लिंगायत संघ , सागर कस्तुरे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ,आणि जागतिक लिंगायत महासभा यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी पत्रकार परिषदेसाठी शिवानंद डुबल,राजीव खलीपे ,रवींद्र वाकडे,सतीश बेडके, उदय हिंगमीरे /भैया,गणेश हिंगमीरे,गुरुनाथ कचरे, राजेंद्र भादुले,रविंद्र मुंढेकर ,संदीप मुंढेकर, नंदकुमार बटाणे, अशोक ससुंदी, प्रमोद तोडकर, स्नेहल तोडकर, दिलिप महाजन, संजय शेटे (तात्या ),प्रमोद तोडकर,प्रमोद सुकरे,उदय महाजन कोकरूड ,सौ नंदादेवी विभूते,सौ अश्विनी आबांली, सौ मनीषा बटाणे,सौ उषाताई चौत्रे, सौ साधना राजमाने,सौ स्नेहल तोडकर आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:
Post a Comment