Tuesday, February 7, 2023

बसव कल्याण मध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन.

 बसव कल्याण मध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन.



बसव कल्याण मध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन.

                                                   

    सातारा दि  7 :- रविंद्र वाकडे   प्रतिनिधी 

जागतिक लिंगायत महासभा आणि सर्व बसवतत्त्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ४  व ५ मार्च रोजी बसवकल्याण (कर्नाटक) येथे प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जागतिक लिंगायत महासभेद्वारे देण्यात आली आहे. 

जागतिक लिंगायत महासभेद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, १२ व्या शतकातील बसवादी शरणांचा त्याग व बलिदानाच्या समग्र क्रांती गर्भातून उगम पावलेला धर्म म्हणजे लिंगायत धर्म होय. लिंगभेद, जातीभेद, वर्गभेद याचे समूळ उच्चाटन करून विश्वबंधुत्वाच्या आधारावर उभारलेल्या लिंगायत धर्माला सांविधानिक मान्यता मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. स्वतंत्र धर्माचे आंदोलन आणि आरक्षणासाठीचा संघर्ष हा परस्पर विरूद्ध नसून, त्या पुरक आहेत. ज्याप्रमाणे बौद्ध, जैन, शिख यांनी स्वतंत्र धर्माची सांविधानिक मान्यता मिळविली असूनही आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्याप्रमाणे त्या दोन्हीचा लाभ घेण्याचा अधिकार लिंगायतांना आहे. ही सत्यता लिंगायतांनी जाणून घेतली पाहिजे. 

                      


त्यासाठीच ऐतिहासिक अशा बसवकल्याणमध्ये प्रथमच राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. 4 व 5 मार्च रोजी बसवकल्याण येथील थेर मैदानात आयोजित या अधिवेशनात लिंगायत धर्म, इतिहास, परंपरा, साहित्य, संस्कृती, लिंगायत समाजाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल या महत्वपूर्ण विषयांवर अभ्यासक, साहित्यिक, लेखक, विचारवंत व विविध मठांचे मठाधीश मार्गदर्शन करतील. याशिवाय अधिवेशनात महिला सत्र, युवा सत्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावेळी देशातील विविध राज्य व विदेशातील लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत. तसेच आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या सर्व पोटजातींतील समाज बांधवही उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात येणार असून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन जागतिक लिंगायत महासभेद्वारे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी   बसवराज धनुरू ९४४८१४९४०१,राजशेखर तंबाके 9422414077या नंबरवर संपर्क साधावा.



No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...