Sunday, February 26, 2023

श्रीमती सुलोचनाताई कल्याणी शिवैक्य .

             श्रीमती सुलोचनाताई कल्याणी शिवैक्य .




                    श्रीमती सुलोचनाताई कल्याणी शिवैक्य .


कराड  , दि.27 - दिलीप महाजन 

  लिंगायत समाजातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिवंगत उद्योजक व महाराष्ट्र वीरशैव सभेचे माजी अध्यक्ष कै.निळकंठराव कल्याणी यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुलोचनाताई निळकंठराव कल्याणी, वय 90 यांचे  शनिवार दि.25 फेब्रुवारी रात्री त्यांच्या वडगाव शेरी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात भारत फोर्ज चे सर्वेसर्वा बाबासाहेब कल्याणी व गौरीशंकर कल्याणी हे दोन महान उद्योजक पुत्र असून,एक विवाहित कन्या सुगंधा हिरेमठ या आहेत.

कल्याणी परिवाराचा  नातवंडे ,नातेसंबंध व व्यावसायिक गोतावळा परिवार खूप मोठा आहे.त्यांच्यावर समाजबांधव व आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री शिवशंकर व आई तुळजाभवानी यांच्या चरणी त्यांना सद्गती लाभो हीच  सातारा ,कराड  येथील समस्त  लिंगायत समाज संघटनेच्या वतीने  भावपूर्ण श्रद्धांजली   .

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...