लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यां सरलाताई पाटील यांचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी आमदार- सतेज पाटील
"आधारवड" पुस्तक प्रकाशन सोहळा
लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यां सरलाताई पाटील यांचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी आमदार- सतेज पाटील
"आधारवड" पुस्तक प्रकाशन सोहळा
सातारा दि 13 :- रविंद्र वाकडे प्रतिनिधी ,
कोल्हापूर येथील लिंगायत समाजातील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या सरलाताई पाटील यांचे विचार आणि जीवनसंघर्ष नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत,असे मत आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
सरलाताई पाटील यांच्या जीवन चरित्रावर आधारीत 'आधारवड' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. हॉटेल विकसर फर्न येथे झालेल्या या कार्यक्रमास आ. विनय कोरे, प्रा. डी. यु. पवार, काकासाहेब कोयटे आदी उपस्थित होते.सतेज पाटील म्हणाले, सरलाताईंनी लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काँग्रेसमध्येही त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. अनेक सामाजिक कामे केली. पदरमोड करून लोकांना मदत केली आहे. आ.सरलाताईंना काँग्रेसने काय दिले? : आ. कोरे म्हणाले सरलाताईंच्या कुटुंबियांचा कॉंग्रेसमध्ये मोठा दबदवा होता. उमेदवारी कोणाला द्यायची हे त्यांच्या कुटूंबातून ठरत होते. सरलाताईंचे त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम असल्यानेच त्यांचे काँग्रेसवरही प्रेम आहे. सतेज पाटील माझे मित्र आहेत. त्यांची अडचण मला करायची नाही.




No comments:
Post a Comment