आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा .
.प्रा.अजय शेटे वडूज खटाव.. सातारा..9823540239
आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा ..प्रा.अजय शेटे वडूज खटाव.. सातारा..9823540239
सातारा दि ..आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा .
.राणी चेन्नमा यांचा जन्म सध्याच्या पुणे बेंगलोर महामार्गावरील ' काकती ' या गावातील किल्ल्यात झाला.आंध्र प्रदेशातील काकतिय लिंगायत संप्रदायाचे उपासक असलेल्या राजघराण्यातील धुल प्पा देसाई आणि त्यांची पत्नी पद्मावती यांच्या पोटी तिचा जन्म झाला. लहापणापासूनच तिला तिरंदाजी..घोडेस्वारी..तलवार युद्ध..भाला युद्ध..अशा मर्दानी क्रीडा खेळांची आवड होतीच ..शिवाय तिने त्यामध्ये विशेष प्राविण्य पण मिळविले होते..तिला संस्कृत..कानडी..मराठी आणि उर्दू या भाषा अवगत होत्या.. ..भारताच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा या रणरागिणी ने शौर्य..धैर्य..यांचे प्रदर्शन करत आपले धर्म व देशप्रेम दाखवून दिले. ..कित्तुर चेन्नमा ला केलाडी ची राणी असे पण संबोधले जाते. या केलाडी राज्याची स्थापना चौदा नायक यांनी ई. स.1499..मध्ये केली होती. ताली कोट च्या लढाईत विजयनगर साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर त्यांच्या शिलेदारांनी लहान..लहान स्वतंत्र राज्ये स्थापन केली.या लहान राज्यांना पोर्तुगीज..आणि विजापूरी व इतर मुघल सैन्याकडून सतत धोका होता.त्यामुळे 14 संस्थाने एकत्र करून लिंगायत सोमशेखर नायक हा 1664..मध्ये केलाडीचा राजा झाला. ..राणी चेन्नमा हि पूर्वाश्रमीची एका लिंगायत व्यापाऱ्याची मुलगी होती. केलाडीच्या श्री रामेश्व रा च्या जत्रेत चेन्नमा ला पहिल्यांदा पहिल्या नंतर राजा सोमश्र्वराने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ई. स.1667 मध्ये ' बिदनुर ' या शहरात लग्न केले.राजाच्या मदतीने राणी चेन्नमा ने राजकारण..राज कौशल्य ..युद्ध साहित्य इत्यादी क्षेत्रात शिक्षण घेतले.. ..पुढे राज्यात अंतर्गत बंडाळी होऊन प्रधान भारती मावूत याने राजाची विश्वासघात करून हत्या केली.तेव्हा राजेशाही नृत्यांगना कलावती हिच्या वडिलांनी राणी चेन्नमा ला राजसिंहासनावर बसवले.आणि बसा प्पा नायक याला एका राज्याचा वारस मुलगा म्हणून दत्तक घेतले.. .. आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. ..जन्म..23 ऑक्टोबर 1648.. ठिकाण.. कित्तूर्..जिल्हा..बेळगाव..राज्य..कर्नाटक..भारत.. ..मृत्यू..21 फेब्रुवारी 1729.. ठिकाण.. बैल होंगल ..कर्नाटक.. ..महान कार्य.. छ. शिवाजी महाराज पुत्र छ.राजाराम महाराज यांचे रक्षण करून आश्रय दिला व भावी संरक्षण केले.. ..प्रमुख चळवळ..1724..ते..1729 पर्यंतचे भारतीय स्वातंत्र्य युद्ध. ..प्रमुख स्मारक..कित्तुर....त्यानंतर राजकीय सुरक्षेसाठी चेन्नमाचे दुसरे लग्न राजा रुद्रम्मा याचाशी झाले. रुद्रम्मा तिला एक मुलगा झाला.पण त्याचा लवकरच मृत्यू झाला.त्यानंतर थोड्याच दिवसात रुद्रम्मा चा पण मृत्यू झाला.. ..त्यातूनही न डगमगता तिने राज्याच्या सुरक्षेसाठी तिसरे लग्न राजा मल्ल सर्जा देसाई यांच्याशी केले.परंतु पुढे त्याचाही मृत्यू लवकर झाला.त्यामुळे तिने आपला सावत्र मुलगा शिवलिंग याला तेथील गादीवर बसवले. व त्याचा राज्याभिषेक केला.पण पुढे सन 1724 मध्ये त्याचाही मृत्यू झाला.. ..तेव्हा जबाबदारी ओळखून राणी चेन्नमा ने केलाडीच्या प्रशासन विभागाचा ताबा घेतला.आपल्या राज्याच्या सिंहासनावर गद्दार प णे ताबा घेवू पाहणाऱ्यांना तिने यशस्वी प्रतिकार केला.आणि विजापुरी सुलताना बरोबर युद्ध करून विजय मिळविला.. ..पुढे तिने छ.शिवाजी महाराज यांच्याशी राज्याचे सहसंबंध वाढवले..परंतु केलाडी राज्यात पुन्हा अंतर्गत बंडाळी वाढली.त्यामुळे विजापूर सुलतान पुन्हा केलाडी वर चा लून आला. व त्याने वेढा टाकला. ..यावेळी सुलतानाने आपला मध्यस्थ जन्नोपंत याला राणी चेन्नमा शी बोलणी करण्यास पाठवले.पण हा एक फसवा साफ ळा होता.कारण त्याच्या मागे त्याचे सैन्य पण राज्यात आतपर्यंत घुसले होते.पूर्व शत्रू भरमे मावूत यानेच विजापूर सुलतानाला हाताशी धरून हा नवीन कट रचला होता. ..तेव्हा संभाव्य धोका ओळखून राणी चेंनामा ने पुढील युद्धाची तयारी करण्यासाठी लवचिक धोरण स्विकारले . जन्नोपंता ला तीन लक्ष रुपये देवू केले व वेळकाढू पणाचे धोरण स्वीकारले. ..तेवढ्या मिळालेल्या अवधीत राणी चेन्नमा ने आपले सर्व सैन्य सर्व साधन संपत्ती व अन्न.. धांन्यासह बिदानुर किल्ल्यावरून भुवन गिरी किल्ल्यावर हलवले..
..राणीने संपूर्ण बिदानुर किल्ला युद्धात जळालेल्या पृथ्वी सारखा करून ठेवला.जेव्हा सुलताना चे सैन्य किल्ल्यावर पोहोचले तेव्हा तेथे सैन्याला साधे अन्न..पाणी सुद्धा मिळू शकले नाही.शिवाय कोणतीही साधन संपत्ती मिळाली नाही.त्यामुळे भुकेने व्याकुळ होवून सुलतानी सैन्य हतबल झाले.. ..इकडे भुवन गिरी किल्ल्यावर राणी चेन्नमा ने आपले अगणित सैन्य गोळा केले.आणि आपल्या राजमंत्री व युद्ध निती कार जाणकारांच्या सल्ल्याचे पालन करून सुलताना विरोधात ' गनिमी कावा' केला. ..आधीच हतबल व निराश झालेल्या प्रचंड सैन्याने भुवन गिरी कडे कूच केली.पण चेन्नमा च्या आक्रमक सैन्याने विजापूरी सैन्य पूर्णपणे नष्ट केले..आणि सुलतानाला अतिशय वाईट रित्या पराभूत केले..युद्ध विजया नंतर राणी चेन्नमा ने देशद्रोही भरमे मावूत व जन्नोपंत यांना त्यांच्या शिष्यासह फाशी दिली.. ..त्यानंतर राणीने राज्याची आर्थिक परिस्थिती परिस्थिती सुधारण्यासाठी पोर्तुगीजांना जवळ केले. तिने केलाडी बंदरातून मिरची..मसाल्याचे पदार्थ व तांदूळ निर्यात करण्यास सुरुवात केली. छ.शिवाजी महाराज यांच्याशी गुपचूप अंतर्गत जवळीक ठेवून आदिलशहा आणि पोर्तुगीज यांचे पासून राज्याचे रक्षण केले. ..केलाडी राज्य आणि पोर्तुगीज यांच्यातील मिरची व मिरी यांच्या व्यापारामुळे पोर्तुगिजांनी तिला ' रिना डी पिमेंटा ' म्हणजेच मिरपूड राणी.. क्विन.. हि उपाधी दिली.पुढे मुघल व पोर्तुगिज यांनी म्हैसूर चा राजा चिक्क देव राय वो डे यार याचे कान भरून केलाडी वर हल्ला करण्यास भाग पाडले.पण भारत मातेच्या या शूर मुलीने सर्व तीन लढ्यातील हल्ल्याचा प्रतिकार केला.आणि मोठ्या धैर्याने आपल्या राज्याचे रक्षण केले. व राजाच्या निदर्शनास त्याची चूक आणून देवून शांतता प्रस्थापित केली.. ..सन 1680 मध्ये छ.शिवाजी महाराजांच्या मृत्यू झाला त्या नंतर औरं ग जेबाने 1686 मध्ये विजापूर व गोवळकोंडयावर आक्रमण केले.त्यानंतर त्याने मराठ्यांना वश व फितूर करण्यावर लक्ष केंद्रित केले.आणि छ.संभाजी महाराज यांना पकडण्यात यश मिळवले..पुढे त्यांना अतिशय निर्घृण पणे मारले.त्यांच्या मृत्यू नंतर छ.राजाराम महाराज यांचा रायगडावर राजा म्हणून राज्याभिषेक झाला.. ..त्यानंतरही मोगलांनी रायगडाला वेढा घातला.पण शुर मराठे छ.राजाराम महाराज यांना सुरक्षित प णे पळवून ने वू शकले..त्यावेळी ते केलाडीच्या दिशेने जात आहेत.अशी माहिती मुघल सैन्याला मिळाली..तेव्हा औ रंग जेबा ने राणी चेन्नमा ला केलाडी राज्यात छ.राजाराम महाराज यांना येवू न देण्याचे फर्मान काढले.अन्यथा केलाडी वर आक्रमण केले जाईल .असा दम दिला गेला..पण राणी चेन्नमा ला हिंदवी स्वराज्याची सर्व परिस्थिती माहीत होती..आणि तिच्या राजाचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे.असे मानून तिने बादशहाचे हे फर्मान मोठ्या जिद्दीने धुडकावून लावले. व छ. राजाराम महाराज सैन्यासह केलाडी ला पोहोचल्यावर तिने त्यांचा मोठा सन्मान केला व आपला राजश्रय व संरक्षण देवून आपल्या हिंदवी राजधर्माचे पालन केले.. व मुघल सैन्या विरोधात लढाईची तयारी केली. ..हे समजल्यावर बादशहाने राणीला पत्र लिहून छ.राजाराम महाराज व त्यांचे मराठा सरदार यांना चांगल्या पद्धतीने आपल्या ताब्यात देण्याची विनंती केली.. व हेतुपूर्वक पणे ठरवून विचार करण्यास वेळ द्यावा असे सांगितले. व वेळकाढू पणा करून पावसाळा सुरू होवू दिला.त्यानंतर तिने बादशहाला सांगितले की.. छ.राजाराम महाराज हेच फक्त आता मराठ्यांचे राजे शिल्लक राहिले आहेत.शिवाय त्यांनी आधीच अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीत आपले राज्य सोडले आहे..तेव्हा आपला मुघ लकी प्रस्ताव मी सरळ..सरळ नाकारत आहे. छ.शिवरायांचे पुत्र असलेल्या छ.राजाराम महाराज यांना मी माझ्या पूत्रा समान मानते.आणि त्यांचे रक्षण करणे माझे आद्य कर्तव्य समजते. ..त्यामुळे बादशहाने अतिशय चिडून अझ मथ आरा च्या नेतृत्वाखाली केलाडीवर आक्रमण केले.. ..ऐन पावसाळ्यात मोगलांनी बिड नू र मध्ये प्रवेश केला.हे वातावरण मोगल सैन्याला त्रासदायक ठरले.आणि राणी चा गनिमी कावा यशस्वी ठरला.त्याचा बरोबर फायदा केलाडी सैन्याने उठविला. व. बादशहाच्या सैन्यावर प्रचंड ताकदीनिशी आक्रमण केले. व त्यांना पराभूत केले. व मुघल सैन्याला ठार करून त्याचे घोडे ..संसाधने.. व रसद काबीज केली.. बादशहा औरंगजेब याच्या दारुण पराभवामुळे व राणी चेन्नमा हिच्या गनिमी काव्याच्या लष्करी डावपेचां मुळे या आलमगि रा ने अतिशय चिडून तिची ..' स्त्री अस्वल " म्हणजेच घोळून..घोळून व खेळवून खेळवून मारणारी अशी अव्हेलानात्मक तुलना केली..पुढे युद्ध काही दिवस चालू राहून शांत झाले.. ..त्यानंतर राणी चेन्नमा ने छ.राजाराम महाराज यांना सर्व मदत करून व संरक्षण देवून ..सुरक्षित अशा तामिळनाडू मधील ' जिंजी ' किल्ल्यावर जावून राहण्यास मदत केली. व मराठ्यांचा शेवटच्या राजाच्या प्राणांचे रक्षण केले.. ..पुढे छ .राजाराम महाराज यांनी राणी चेन्नमा ना एक पत्र लिहले.त्यात ते म्हणतात की.. त्या बिकट आणि बाणीच्या परिस्थितीत जेव्हा मोठ्या राज्याचे राजे आणि राज्यकर्त्यांनी बादशहाला घाबरून मला मदत करण्यास नकार दिला.तेव्हा तुम्ही मला मोठ्या धैर्याने आश्रय दिला आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यास मदत केली.तुमचे हे शौर्य आणि औदार्य मी कधीही विसरू शकणार नाही.ज्यांनी छ.शिवाजी महाराजां चा मुलगा असलेल्या. छ.राजाराम यांचे रक्षण केले.मुघल सैन्याला मोठ्या धाडसाने पराभूत केले.आणि मराठा राज्य व राजा यांना वाचवले. अशा माझ्या दुसऱ्या मातेस माझा नमस्कार असो.देवी श्री भवानी तुम्हाला सर्व सुख देवो..मी देवाला प्रार्थना करतो कि..त्याची केलाडी राज्याची जमीन आनंदाचे घर बनू शकेल.. ..तुमचाच मुलगा.. छ.राजाराम.. ....................................... .. कर्नाटकातील केलाडी राज्याचेच एक भाग असलेले 'बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर् ' हे एक महान संस्थान होते. आपला सावत्र मुलगा शिवलिंग रुद्रसर्ज याच्या मृत्युनंतर राणी चेन्नमा ने त्यांचा दत्तकपुत्र गुरुलिंग मल्ल सर्ज याला गादीवर बसवून स्वतः राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.तेव्हा ह्या दत्तक विधानाला नाकारून ब्रिटिश एजंट व धारवाड प्रांताचा कलेक्टर थ्याकरे याने पुन्हा कित्तुर संस्थान ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा मोठे युद्ध झाले.राणी चेन्नमा ने स्वतः लढाईत भाग घेवून रण मैदान गाजवले व 3 सप्टेंबर 1724..मध्ये त्याला युद्धात ठार मारले.पुढे डी क न या इंग्रज अधिकाऱ्याने 23..सप्टेंबर 1724..रोजी कित्तुर ला पुन्हा वेढा दिला. सन 1724..ते..सन 1729..असा पाच वर्षे राणी चेन्नमा ने इंग्रजांना मोठ्या त्वेषाने प्रतिकार केला. ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रज सरकार यांच्या संस्थान खालसा करण्याच्या धोरणाला त्यांचा प्रचंड विरोध होता.ब्रिटिश दडपशाही ला त्यांनी मोठा प्रतिकार केला. व भूमिगत राहून शेवटपर्यंत विरोध केला. ..पण संगाप्पा व हु राकडली या राणीच्या दोन फितूर सरदारांनी इंग्रजांना शहरात शिरण्याचा चोरवाटा दाखविल्याने इंग्रजांनी कित्तुर किल्ल्यात घुसून शेवटी 3..डिसेंबर 1724..रोजी राणी चेन्नमा ला पकडलेच..तिला पकडुन पुढे ' बेल होंगल '..बैल होनंग ळ ..येथील कारागृहात डांबून ठेवले.या तुरुंगातच 2.. फेब्रुवारी 1729..रोजी शूर केलाडी.. कित्तूर् राणी चेन्नमा चे निधन झाले. . ..बेळगाव पासून 50.. कि.मी.दूर असलेले कित्तुर संस्थान खालसा करून बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले..या वेळी इंग्रजांनी किल्ल्यामध्ये जी लूट केली त्या मध्ये 16..लक्ष रुपये रोख..4..लक्षांचे जवहिर..घोडे.. उंट..हत्ती यासह 36..तोफा..बंदुका..तलवारी.. आणि प्रचंड दारूगोळा त्यांना मिळाला.....राणी चेन्नमा यांच्या निधनानंतर सन 1729 मध्ये सांगलीच्या सयाप्पा पाटील यांनी देसायांच्या दत्तक मुलास पुढे करून इंग्रज सत्तेला कायदेशीर आव्हान उभे केले होते.परंतु या आव्हानाला ही ब्रिटिशांनी शह दिला. * सन 1857 सालच्या बंडा पूर्वी तसेच झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्वीही ..वर्षे आधी एका भारतीय शूर लिंगायत रणरागिणी भारतीय स्वातंत्र्य युद्धात नाव अजरामर करून गेली.. शौर्य..धैर्य..यांचे प्रदर्शन करत जिने ब्रिटिश सतेला आवाहन देवून जबरदस्त हादरा दिला.त्या होत्या केलाडी.. कित्तूर् राणी चेन्नमा..त्याच्या या महान भारत देश प्रेम कार्यास विनम्र अभिवादन ..अभिवादन * ..राणी चेन्नमा यांच्या या महान कार्याची दखल घेवून मा.राष्ट्रपती प्रतिभताई पाटील यांच्या हस्ते दिल्ली येथील विधान भवनात 2007..साली त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे..**

No comments:
Post a Comment