लिंगायत समाजाचे शंभर सदस्य येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी होतील.प्रा सुदर्शनराव बिरादार
लिंगायत समाजाचे शंभर सदस्य येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी होतील.प्रा सुदर्शनराव बिरादार
शिरूर अनंतपाळ दि 17 - प्रा अजय शेटे प्रतिनिधी
लिंगायत महासंघाच्या वतीने शिरूर अनंतपाळ येथे आज रविवार दिनांक १६आक्टोबर रोजी लिंगायत समाजाची शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मठात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकिच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना लिंगायत महासंघाचे प्रांतांध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार म्हणाले कि, लिंगायत समाजाची राजकीय क्षेत्रातील भागीदारी वाढवायची आहे.जिल्हयात पाच लाख लिंगायत मतदार आहेत.पण सर्व पक्षीय मिळून सहा सदस्य जिल्हा परिषद व बोटावर मोजता येणारे पं स सदस्य .एवढ्यावर समाजाला न्याय मिळणार नाही.आता सर्व पक्षीय नेत्यांनी विचार करुन लिंगायतांना लोकसंख्येच्या आधारावर जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.यात कोणता पक्ष लिंगायत समाजाला मदत करत़ ते आम्हाला बघायचे आहे.
लिंगायत समाजाला योग्य वाटा द्यावा अन्यथा आम्ही आपला घाटात करु.लिंगायत समाजांनी आपला माणुस कोणत्याही पक्षातुन निवडणूक लढवत असतील तर त्यांना मदत करावी.असे झाले तर १००सदस्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण निवडून आणु असे प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी सांगितले.यावेळी लिंगायत महासंघाचे जिल्हासंघटक काशिनाथ मोरखंडे, सिद्रामप्पा पोपडे, लिंगायत महासंघाचे शहर सरचिटणीस लि़गेश्वर बिरादार, गोरोबा काका शिवणे,शिवाजी पांडे, तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, तालुका संघटक विठ्ठलराव पाटील,संग्राम हावा,हत्तरगे ताई,कुरे ताई या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment