खानापूर सार्वजनिक दुर्गा मंडळातर्फे रविवारी दि 2 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन..!
खानापूर दि 1 :- शिवकुमार कल्याणी ।
दुर्गा माता सार्वजनिक नवरात्रौत्सव समिती खानापूर या मंडळाचे हे २३ वे वर्ष असून त्यानिमित्त २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार, दि. २ आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सकाळी 9 वाजता सदर रक्तदान शिबीर दुर्गा मंडळाच्या भवनात होणार असल्याची माहिती खानापूर सार्वजनिक मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष संतोष कदम यांनी दिली.
रक्तदाता हा रुग्णाचा जीवनदाता असून, रुग्ण व उपचार यामधील अमृतासारखा महत्त्वाचा संजीवनी देणारा देवदूत आहे. त्यामुळे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या मध्ये खानापूर व परिसरातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे येत रक्तदान करण्याचे आवाहन दुर्गा मंडळातर्फे करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड , रक्तपेढीतर्फे या शिबिरात रक्तसंकलन केले जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करण्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांशी संपर्क करावे , व रक्तदाता म्हणून या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा असे शोषल मिडीयातून संदेश फिरवण्यात येत असुन, रक्तपेढीतर्फे व मंडळातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे,सदर मंडळाची स्थापना इ.स.२००० साली झाली असुन दर वर्षी अनेक सामाजिक उपक्रम या मंडळाने राबवले आहेत,व याही वर्षी उत्सवात,महारक्तदान शिबीर, समाज प्रबोधनपर किर्तन,व्याख्यान, महाराष्ट्राची लोककला असणारे भारूड,देवीचा जागर गोंधळ, महाप्रसाद, अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, पदाधिकारी,व मार्गदर्शक विजय धनसुरे, विश्वनाथ ताडकोले, निळकंठ पटणे, उमाकांत पाटील,बालाजी तुरुकवाड, विनोद रायकोडे, राजेंद्र भायकटे, सुनिल ठिगळे,हावगी पाटील,सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत ..
No comments:
Post a Comment