लिंगायत समाजाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर रविवारी शिरूर अनंतपाळ व देवणी येथे बैठक
लिंगायत समाजाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर रविवारी शिरूर अनंतपाळ व देवणी येथे बैठक.
लातूर दि :- १४ प्रतिनिधी ,दिवाळी नंतर होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर लिंगायत समाजाची शिरूर अनंतपाळ व देवणी येथे रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी लिंगायत महासंघाच्यावतीने बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता शंकरलिंग शिवाचार्य महाराज मठसंस्थान शिरूर अनंतपाळ येथे तर देवणी येथील मठात दुपारी 2.30 वा. लिंगायत समाज बांधवांची बैठक लिंगायत महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवू इच्छिणार्या भावी उमेदवारांनी व विद्यमान उमेदवारांनी तसेच दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावच्या समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन लिंगायत महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.या बैठकांना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद भुसारे, माधव मल्लिशे, नवनाथ डोंगरे, दिलीप सोलगे तसेच शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, शिरूर अनंतपाळ तालुका संघटक विठ्ठलराव पाटील तसेच देवणी तालुकाध्यक्ष शेषेराव मानकरी, व शहराध्यक्ष विजयकुमार लुल्ले व दोन्ही तालुक्यातील लिंगायत महासंघाच्या पदाधिकार्यांनी आवाहन केल्याचे लिंगायत शहर सरचिटणीस लिंगेश्वर बिरादार यांनी सांगितले. तसेच 23 ऑक्टोबर रोजी वरील विषयासंदर्भात लातूर व उदगीर येथे सुध्दा अशा बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही लिंगेश्वर बिरादार यांनी सांगितले.



No comments:
Post a Comment