Saturday, October 22, 2022

श्रीशैल जगद्गुरु करणार सुक्षेत्र येडुर ते महाक्षेत्र श्रीशैल अशी 560 किमी ची पदयात्रा द्वादश पीठारोहण समारंभाला मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपस्थित राहणार

 श्रीशैल जगद्गुरु करणार सुक्षेत्र येडुर ते महाक्षेत्र श्रीशैल अशी 560 किमी ची पदयात्रा  द्वादश पीठारोहण समारंभाला मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपस्थित राहणार


 श्रीशैल जगद्गुरु करणार सुक्षेत्र येडुर ते महाक्षेत्र श्रीशैल अशी 560 किमी ची पदयात्रा  द्वादश पीठारोहण समारंभाला मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपस्थित राहणार



सातारा, दि.23 -रविंद्र वाकडे.

 जानेवारी 2023 मध्ये श्रीशैल सूर्यसिंहासन महापी ठाचे जगद्गुरु डॉ.चन्नसिद्धराम पंडिताराध्य भागवदपाद यांचा द्वादश पीठारोहण महोत्सव आणि  जन्मसुवर्णमहोत्सव साजरा होणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन स्वतः जगद्गुरुनी दिले.



10 ते 15 जानेवारी या  पाच दिवसीय महासम्मेलना दरम्यान एक दिवस  उपस्थित राहण्याचे आश्वासन मा.पंतप्रधान यांनी दिल्याचे मंदृपचे रेणुका शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

मा.पंतप्रधान यांच्याशी औपचारिक संवाद साधताना श्रीशैल जगद्गुरु म्हणाले की, आपल्या देशातील श्री ज्योतिर्लिंग क्षेत्रे एकामागून एक विकसित होत आहेत.ही अतिशय आनंदाची बाब आहे. मा.पंतप्रधानांच्या आगमनाने श्रीशैल क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची पण घोषणा होईल.संपूर्ण जगात भारताला विश्वगुरू बनवण्याच्या त्यांच्या निर्धाराला त्यामुळे अधिक बळकटी येईल.त्यानंतर मा.पंतप्रधान म्हणाले की,येथील सर्व संतांनी पूर्वीपासून सर्वसामान्य समूह विकासाचे ध्येय ठेवले होते.त्यांचेच कार्य पूर्ण करण्याचे काम माझ्या हातून होत आहे.





यानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील सुक्षेत्र येडूर ते महाक्षेत्र श्रीशैल असा एकूण 29 ते 33 दिवसांचा 560 किमी पदयात्रेचा कार्यक्रम असून श्रीशैल जगद्गुरु श्रीशैल येथे 42 दिवसांचे अनुष्ठानही करणार आहेत.10 ते 15 जानेवारी या दरम्यान समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. 



या कालावधीत अखिल भारत वीरशैव महासभा अधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन , राष्ट्रीय वचन संमेलन,वीरशैव साहित्य संमेलन यासह अनेक सामाजिक,धार्मिक व  सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.



या कार्यक्रमात देशविदेशातील भाविक सामील होणार आहेत.मा.पंतप्रधान यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देताना औसा संस्थानचे डॉ.शांतवीरलिंग शिवाचार्य,श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हजर होते.




No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...