तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य : औसेकर महाराज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांची झाली पाण्याची सोय वीरशैव व्हीजन व आस्क मी तर्फे 3500 पाणी बाटल्यांचे वाटप
तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य : औसेकर महाराज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांची झाली पाण्याची सोय वीरशैव व्हीजन व आस्क मी तर्फे 3500 पाणी बाटल्यांचे वाटप
सोलापूर दि ७ : राजशेखर बुरुकुले सोलापूर
भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देणे ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अवलंब करणाऱ्या अनेक संस्था आज समाजात कार्य करीत आहेत त्यापैकीच वीरशैव व्हिजन ही एक संस्था आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य असल्याचे प्रतिपादन औसा संस्थानचे सद्गुरु गोरखनाथ महाराज औसेकर यांनी केले.
तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या श्री तुळजाभवानी भक्तांसाठी पिण्याचे थंड पाण्याच्या बाटल्या वीरशैव व्हीजन व आस्क मी हेल्पलाइन तर्फे वितरित करण्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर नीलकंठ सहकारी बॅंकेचे संचालक जयनारायण भुतडा, आस्क मी हेल्पलाइनचे संचालक राहुल शेटे, समर्थ रोडलाईन्सचे संचालक आप्पासाहेब लोणी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी विविध ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्यात येते. काही ठिकाणी औषधोपचारही केले जातात. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या वाटेत भेडसावत असल्याचे काही भक्तांनी वीरशैव व्हिजनला सांगितले. त्यामुळे वीरशैव व्हिजनने भक्तांना वाटेत पिण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. याचा 3500 भाविकांनी लाभ घेतला.
यावेळी सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोमनाथ चौधरी, महेश शिंदे, तुकाराम मुळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत लोणी, मन्मथ कपाळे, गणेश सूर्यवंशी, मनोज चौधरी, आदित्य सिद्धे, महादेव हारके सनी आरळीमार, महेश घुले, सचिन वैद्य यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या वतीने पाण्या पाण्याच्या बाटल्या वितरित करताना गोरखनाथ महाराज औसेकर, जयनारायण भुतडा, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, सोमनाथ चौधरी
.jpg)


No comments:
Post a Comment