उंब्रज च्या वैभवात भर घालणारे भव्य आणि दिव्य असे शिवस्मारक उंब्रज मध्ये लवकरच साकारणार असा संकल्प उंब्रज तालुका कराड येथील श्री शिवयोध्या प्रतिष्ठान यांचे वतीने काल स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर करण्यात आला
उंब्रज दि 18 :- लिंगायत TV live प्रतिनिधी प्रसाद वाकडे
उंब्रज च्या वैभवात भर घालणारे भव्य आणि दिव्य असे शिवस्मारक उंब्रज मध्ये लवकरच साकारणार असा संकल्प उंब्रज तालुका कराड येथील श्री शिवयोध्या प्रतिष्ठान यांचे वतीने काल स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर करण्यात आला
श्री शिवयोध्या प्रतिष्ठान उंब्रज तालुका कराड यांचे वतीने दि १७ रोजीउंब्रज येथे श्री.छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी संकल्प अभियानाचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे आयोजन करण्यात आले होते या वेळी उंब्रज तालुका कराड येथील, श्री शिवयोध्या प्रतिष्ठानचे शिवभक्त व ग्रामस्थ उंब्रज उपस्थित होते यावेळी जगदिश्वर महादेवांचे व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शंभू महादेवांच्या साक्षीने उंब्रज बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी श्री .छ.शिवाजी महाराज यांचा सोळा फूट उंच भव्य आणि दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला. संकल्प पूर्तीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 31 उंब्रजकरांनी हातात बंधन बांधून लवकरात लवकर अश्वारूढ पुतळा उभारण्याची शपथ घेतली.नुकताच घटस्थापना शारदिय नवरात्रोत्सवच्या शुभदिनी लोकवर्गणीचाही शुभारंभ करण्यात आला आहे. शिवस्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावें म्हणून उंब्रज आणि परीसरातील सर्व शिव भक्त व नागरिकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.श्री.छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासारखे पवित्र शिवकार्य दुसरे असूच शकत नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपसातील राजकिय तथा वैयक्तिक मतभेद विसरून या शिवकार्यात योगदान द्यावे असे आवाहनही श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचे वतीने करण्यात आले आहे.राज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी संकल्प अभियानाचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे आयोजन करण्यात आले होते या वेळी उंब्रज तालुका कराड येथील, श्री शिवयोध्या प्रतिष्ठानचे शिवभक्त व ग्रामस्थ उंब्रज उपस्थित होते यावेळी जगदिश्वर महादेवांचे व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शंभू महादेवांच्या साक्षीने उंब्रज बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी श्री .छ.शिवाजी महाराज यांचा सोळा फूट उंच भव्य आणि दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला. संकल्प पूर्तीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 31 उंब्रजकरांनी हातात बंधन बांधून लवकरात लवकर अश्वारूढ पुतळा उभारण्याची शपथ घेतली.नुकताच घटस्थापना शारदिय नवरात्रोत्सवच्या शुभदिनी लोकवर्गणीचाही शुभारंभ करण्यात आला आहे. शिवस्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावें म्हणून उंब्रज आणि परीसरातील सर्व शिव भक्त व नागरिकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.श्री.छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासारखे पवित्र शिवकार्य दुसरे असूच शकत नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपसातील राजकिय तथा वैयक्तिक मतभेद विसरून या शिवकार्यात योगदान द्यावे असे आवाहनही श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचे वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment