Sunday, October 31, 2021

डॉ राजेंद्र घुटे यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे यांना मिळालेल्या पुरस्काराने सातारा जिल्ह्यामधील उद्योजकांनी आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवासजी पाटील

डॉ राजेंद्र घुटे यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे यांना मिळालेल्या पुरस्काराने सातारा जिल्ह्यामधील उद्योजकांनी आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवासजी पाटील
उंब्रज दि .३० प्रतिनिधी डॉ राजेंद्र घुटे यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे यांना मिळालेल्या पुरस्काराने सातारा जिल्ह्यामधील उद्योजकांनी आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवासजी पाटील यांनी उंब्रज तालुका कराड येथे केले, तर सत्काराला उत्तर देताना डॉ राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे बोलले की हा पुरस्कार उंब्रज ग्रामस्थ , माझे मित्र परिवार समाज बांधव व कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळाले मुळे हा पुरस्कार मला मिळाला उंब्रज मधील इतर उद्योजकांनी देखील असे पुरस्कार मिळवून आपल्या गावाचे नाव उज्वल करावे, उंब्रज येथील लिंगायत समाजातील प्रसिद्ध उद्योजक डॉ राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला पुरस्कार आणि अमेरिकन विद्यापीठा ची डॉक्टरेट ही पदवी मिळाल्या बद्दल उंब्रज ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात केले यावेळी ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा खासदार श्रीनिवासजी पाटील हे होते तर पालकमंत्री मा ना बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते सत्कार समारंभ आयोजित करणेत आला प्रमुख उपस्थिती मध्ये कराड अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख मा सुभाषराव जोशी ,कराड अर्बन बँकेचे चेअरमन मा डॉ सुभाषराव एरम हे होते मा खासदार श्रीनिवासजी पाटील यांचा सत्कार सत्यम पेट्रोकेमिकल चे विक्रांत घुटे यांचे हस्ते मा ना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण घुटे यांचे हस्ते अर्बन कुटुंब प्रमुख मा सुभाषराव जोशी यांचा सत्कार सिध्दार्थ बाजारे यांचे हस्ते तर मा डॉ सुभाषराव एरम यांचा सत्कार सागर तोडकर यांचे हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा गोपाळराव येळवे यांनी केले तर आभारप्रदर्शन adv प्रमोद पुजारी यांनी केले सत्यम पेट्रोलिकेमिकल चे वतीने दादासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले मित्र परिवार यांचे वतीने डॉ कोडुगले उंब्रज ग्रामस्थ यांचे वतीने जेष्ठ लेखक परवडकर मा दत्ता आबा जाधव , लिंगायत समाज उंब्रज यांचे वतीने लिंगेश्वर फणसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉ राजेंद्र प्रल्हाद शेठ घुटे यांना शुभेच्छा दिल्या समस्त लिंगायत समाज उंब्रज यांचे वतीने मा डॉ राजेंद्र प्रल्हाद शेठ घुटे यांना महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली या कार्यक्रमास उंब्रज आणि परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी ,तसेच लिंगायत समाज उंब्रज हे बहुसंख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...