प्रा.नंदकुमार कुंभार यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी केली संपादन
रमेशकुमार मिठारे :लिंगायत TV Live विशेष प्रतिनिधी
निमशिरगाव , ता. शिरोळ येथील नंदकुमार विरभद्र कुंभार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी जाहीर झाली. नाईट काॅलेज कोल्हापूर येथे सहायक प्राध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. " स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी तील कृषीजन समूहाची भाषा " या विषयावरील प्रबंध त्यांनी प्रा. डॉ. जी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाकडे सादर केला होता. या अभ्यासासाठी त्यांना ज्येष्ठ लेखक राजन गवस, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, सौ. रजनीताई मगदूम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
नंदकुमार कुंभार हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत या पदवीपर्यंत पोहचले आहेत. मराठी विषयातील या पदवीबरोबरच त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे बीएस्सी. हाॅर्टीकल्चर व एम्.एड करीताही लघु शोधप्रबंध सादर करून पदवी संपादन केलेली आहे. त्यांनी तीन विद्यापीठातून तीन विषयातील पदव्युत्तर पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या नियतकालिकांतून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समग्र व्यक्तिमत्वाचा संशोधनपर अभ्यास करत आहेत.
शैक्षणिक कार्याबरोबरच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. त्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवात झाली आणि उच्चशिक्षित व काम करण्याची धडपड यामुळे सलग दोन वेळा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले. उत्तम वक्तृत्व व कार्य करण्याची क्षमता तसेच कुशल संघटन कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक संपादन करत आहेत. त्यांच्यावर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांचा प्रचंड पगडा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केलेले आहे.
या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment