Friday, September 30, 2022

आर - फिटनेस ठरतेय महिलांसाठी मोकळा श्वास

 

                         आर - फिटनेस ठरतेय महिलांसाठी मोकळा श्वास 


                        आर - फिटनेस ठरतेय महिलांसाठी मोकळा श्वास 




सातारा, दि.1 -   प्रा.अजय शेटे.

दि.27 व 28 सप्टेंबर रोजी संध्या.4 ते 7 या वेळेत सलग दोन दिवस ' आर - फिटनेस जिम,'  वडूज  तर्फे पंचरत्न मंगल कार्यालय येथे विविध मनोरंजक उपक्रम घेण्यात आले.

या मध्ये गरबा,दांडिया,झुंबा डान्स व होम  - मिनिस्टर सारख्या खेळांचा समावेश होता.या उपक्रमाचे या वर्षी पहिलेच वर्ष होते.तरी देखील वडूज मधील महिला - भगिनिंकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडा काळ का होईना ,सर्व महिलांसाठी हा ' मोकळा श्वास ' होता.



आर - फिटनेस चे संचालक ट्रेनर  ऋतुराज राऊत यांच्या संकल्पनेतून गेले वर्षभर  गुरुकृपा मंगल कार्यालय येथे खास महिलांसाठी ' झुंबा व योगा ' क्लासेस घेतले जात आहेत.या माध्यमातून या संस्थेने एक पाऊल पुढे येवून महिला विश्वात खास असा एक नवा ठसा उमटवला आहे  व या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.**




Thursday, September 29, 2022

वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम संपन्न

           वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम संपन्न 



        वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम संपन्न 



सातारा, दि.30 -प्रा.अजय शेटे.  

शिवदत्त दुर्गा उत्सव मंडळ ,वडूज तर्फे सालाबाद प्रमाणे चालू 18 व्या वर्षी गुरूनिर्वाण महारुद्र पशुपती वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम येथील श्री विठ्ठल मंदिर येथे गुरूवार दि.29 रोजी संध्याकाळी 6 ते 7.30 या वेळेत पार पडला.

यावेळी वंदनीय श्री कोळेकर  महाराज यांनी सांगितले की, श्री दुर्गा देवीची नऊ रूपे व तिच्या अनुषंगाने येणारे तिचे नऊ रंग हे तिच्या ठायीच्या अनेक शक्तींचे प्रतीक आहे.त्यातून महिलांनी सद्गुण घेवून आपले दैवी व आध्यात्मिक जीवन घडवावे.तसेच संसार व समाज कार्यात कार्यरत रहावे.




 ते पुढे म्हणाले की,आपले आराध्य दैवत भगवान श्री शिवशंकर असून ,त्याची भक्तीच आपणास जीवनात तारून नेते.भक्तीयोग आणि कर्मयोग हा आपला पाया असून ,आपले धर्मग्रंथ व गुरू हेच आपले मार्गदर्शक आहेत.त्यांनी घालून दिलेल्या चालीरिती प्रमाणे आपण आपली धर्म वाटचाल केली पाहिजे.

या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अजय शेटे यांनी केले.श्री.कुमारकाका शेटे यांच्या हस्ते श्री महाराजांचा यथोचित सत्कार करण्यात आला.श्री.संजय येवले यांनी श्री महाराजांचे पाद्यपूजन केले.श्री.बसवेश्वर येवले यांनी पंचारती ओवाळणी केली. श्री.राजेंद्र शेटे यांनी आरती गायन केले.श्री.सोमनाथ येवले यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.




 मंडळ व्यवस्थापन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल टाकणे,वैभव टाकणे,गजानन गाडवे, अशोक जोशी अथक परिश्रम घेवून सेवाकार्य करतात.

श्री.शेखर भाऊ म्हामणे, दत्तात्रय येवले, अमित गाडवे,विकास ठिगळे, सागर येवले,दत्तात्रय गाडवे, शंकर एकांडे, राहूल म्हामणे , मिलिंद लंगडे,सुहास येवले यांचे मार्गदर्शन लाभते.




श्री शिवयोगिनी लघुरुद्र महिला मंडळच्या सर्व सदस्य महिला सदस्या व महिला कुटुंबीय श्री दुर्गा मातेची मनापासून भक्ती करून सेवा करतात.

श्री दुर्गा देवीच्या आरतीचा मान रोज नवीन कुटुंबांना दिला जाऊन  त्यांच्या तर्फेच सात्विक प्रसाद वाटप केले जाते.रोज महिला व लहान मुले - मुली यांचा रास दांडिया,भोंडला,संगीत खुर्ची,चमचा लिंबू, पोत्याची शर्यत  असे खेळ खेळले जातात.श्री दुर्गा देवीस रोज नवीन रंगाची साडी नेसवली जाऊन शुभ पूजा केली जाते.महाप्रसाद अर्पण केला जातो.




वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) एक्स्पो 2023 आता हुबळी कर्नाटक मध्ये होणार

 


 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) एक्स्पो 2023 आता हुबळी कर्नाटक मध्ये होणार


वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) एक्स्पो 2023 आता हुबळी कर्नाटक मध्ये होणार


सातारा, दि.30 - रविंद्र वाकडे.

  वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) तर्फे लिंगायत समाजाचा सामाजिकतेतून आर्थिक विकास व्हावा व तरुण ,तरुणी ,व्यावसायिक ,उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यातून समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ' व्हाया ' तर्फे गेल्या 12 वर्षातून महाराष्ट्रात व्यावसायिक प्रदर्शन ,सेमिनार,एक्स्पो ,नोकरी महोत्सव असे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.


एकमेव आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक संघटना असलेल्या वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ने यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील व्यापारी ,उद्योजक यांच्या मध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी व तरुण व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी यावर्षी ' व्हाया एक्स्पो 2023  ' हुबळी कर्नाटक येथे आयोजित केला आहे.त्यासंदर्भात आढावा बैठक 'केएलई विद्यापीठ ' हुबळी येथे 


'के एल ई ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लिंगायत भूषण मा. खा.प्रभाकरजी कोरे साहेब व लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे ,व्हाया सेक्रेटरी गुड्डीमठ साहेब ,व्हाया युथविंग अध्यक्ष प्रदीप साखरे व 'ए आय व्ही एम् 'चे  पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हुबळी ,धारवाड,बेळगाव,बेंगळुरू येथील उद्योजक उपस्थित होते.






आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. त्यामुळे संस्काराचा विसर पडत चाललेला दिसतो. अशा परिस्थितीत मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम राबवून एक प्रकारे संस्काराचे बीज रोवले जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर

 


 आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. त्यामुळे संस्काराचा विसर पडत चाललेला दिसतो. अशा परिस्थितीत मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम राबवून एक प्रकारे संस्काराचे बीज रोवले जात आहे.  महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर .






 आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. त्यामुळे संस्काराचा विसर पडत चाललेला दिसतो. अशा परिस्थितीत मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम राबवून एक प्रकारे संस्काराचे बीज रोवले जात आहे.  महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर.


     नांदगाव   दि २९ :- प्रतिनिधी     

   नांदगाव (ता. कराड) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका दिवंगत सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या ४थ्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चरेगावकर बोलत होते. कृष्णा चँरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव थोरात अध्यक्षस्थानी होते . ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.तु.सुकरे गुरुजी, उद्योजक जगन्नाथ कुचेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जाधव, संदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

___________________________________________________________________________________

 दिवंगत सिंधुताई सुकरे यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक दुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पूजेच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. तर वृक्ष चळवळ बळकट करण्याच्या उद्देशाने गावातील हरीत सेनेचे कार्यकर्ते गणेश कडोले, प्रथमेश शेटे, निलेश चौधरी आदींच्याकडे रोपे प्रधान करण्यात आली. यावेळी वन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या राजेंद्र गवते  यांचा तर न्यू इंग्लिश स्कूलच्या पालक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हितेश सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.

___________________________________________________________________________________

 चरेगावकर म्हणाले, खरंतर आम्ही सगळेच समाजाचे काहीतरी देणे लागत असतो. याची जाण ठेवून प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून काम केले तर राष्ट्र बळकट व्हायला वेळ लागणार नाही .

शिवाजीराव थोरात म्हणाले, आई हा प्रत्येकाचा पहिला गुरु आहे हे लक्षात घेऊन सिंधुताई सुकरे यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ राबवलेले उपक्रम इतरांना प्रेरणा देणारे आहेत.

 संदीप जोशी म्हणाले, सिंधुताई सुकरे यांचेकडून आम्हाला प्राथमिक शिक्षणाचे धडे मिळाले. आईच्या ममतेने ज्ञानदान करणाऱ्या त्या नावाप्रमाणेच 'वास्तल्यसिंधू' शिक्षिका होत्या. 

कार्यक्रमाला दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे सचिव एस.टी. सुकरे, संचालक शंकरराव पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती परशुराम पाटील, वसंत माटेकर, मच्छिंद्र कुंभार, मारुती यशवंत पाटील, सयाजी शिंदे, दिलीप पाटील, संतोष पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते, सुधीर पाटील, अधिकराव पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, उत्तम पाटील, उदय पाटील, पोपटराव पाटील, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम कांबळे, जयकर पाटील, शरद शिणगारे, महेश पवार, शरद पाटील, संभाजी पाटील, अनिल पाटील, हरिहर तोडकर, मोहन कुचेकर, रोहित मुळीक ,संजय तलबार, अभिजीत माटेकर, ग्रामपंचायत सदस्या गौरी मोरे, डी.एम. मोरे, रघुनाथ पाटील, सर्जेराव पाटील, रामभाऊ साळुंखे, संभाजी पाचंगे ,धोंडीराम शिंदे, चंद्रकांत कडोले, शिवाजी माळी, सुनील शिणगारे ,नितीन आंबेकर, राजेंद्र पाटील, अमर कदम, जगन्नाथ पाटील, रघुनाथ जाधव, वैभव शेटे, प्रणव तांबवेकर, रमेश पाटील, केतन पाटील, प्रणित कुचेकर, शुभम मोरे, दिगंबर शिंदे आदींची उपस्थिती होती.

 प्रमोद सुकरे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.   काकडे सर यांनी आभार मानले. हणमंत यादव यांनी सूत्रसंचालन केले.




Wednesday, September 28, 2022

एन.एस.एस. ई.परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार

          एन.एस.एस. ई.परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार 



       एन.एस.एस. ई.परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार 



सातारा, दि.28 -प्रा.अजय शेटे.

 वडूज येथील म.फुले प्राथमिक शाळेतील स्पर्धा परीक्षा एन.एस.एस. ई.मध्ये उत्तम गुण मिळवून क्रमांक व यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचा सत्कार समारंभ उच्च न्यायालय नियुक्त सदस्य मा.सतीश शेटे, मा.गोविंद भंडारे यांचे हस्ते आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे सविस्तर स्वरूप व स्पर्धा परीक्षा बाबतचे मनोगत या परीक्षेच्या आयोजक संचालिका सौ.भारती  सागर पवार मॅडम यांनी केले.

म.फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शितल पवार यांनी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी केलेल्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. हु.परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य मा.महेश गोडसे सर् यांनी विद्यार्थी - विद्यार्थिनी ,सह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून ,मार्गदर्शन ही केले.

यावेळी संचालक सतीश शेटे म्हणाले की ,सर्व गुणी विद्यार्थी हे या शाळेची खरी संप्पती आहे.शाळेतील शिक्षिका,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्गदर्शिका व पालक वर्ग यांचेमुळे विद्यार्थ्यांची खरी जडणघडण होत असते.




यावेळी संचालक मा. गोविंद भंडारे यांचेही भाषण झाले.त्या वेळी त्यांनी सांगितले की,विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेत अनेक उपक्रम राबवून ,विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो.

या कार्यक्रमाला डॉ.हेमंत पेठे,श्री.नितीन जाधव यांनीही शुभचिंतन व्यक्त करून यशस्वी विद्याथ्र्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला सौ. खाडे मॅडम यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

यावेळी  चि.ओजस अजय शेटे व त्याचे पालक सौ.मनिषा अजय शेटे मॅडम यांचाही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून संचालक  मा.सतीश शेटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच इतर सर्व गुणी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. म.फुले शाळेच्या सर्व शिक्षिका,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग,विद्यार्थी - विद्यार्थिनी हजर होते.




Monday, September 26, 2022

वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद,जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण

 

वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद,जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण




वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद,जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण



उदगीर  दि  २६  (प्रतिनिधी)ः

 लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी रघुकूल मंगल कार्यालय, उदगीर येथे वीरशैव लिंगायत समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 450 वधू-वरांनी भाग घेवून उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.मनोहर पटवारी, मल्लिकार्जुन मानकरी, उदगीर हावगीस्वामी मठाचे शिवाचार्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे, प्रा.प्रभाकर उदगीरे, रामेश्‍वरअप्पा कानडे, लिंगायत महासंघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील गुंजोटीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष उद्योजक अनिल शेटकार, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, प्रदेश सहसचिव सुरेश वाले, लातूर लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, काशीनाथ मोरखंडे, लिंगेश्‍वर बिरादार, विठ्ठलराव पाटील, निलकंठ शिवणे, नांदेडचे प्रसिध्द ठेकेदार माधवराव पटणे, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, कपील माकणे, गणेश पटणे, अहमदपूर अध्यक्ष महेश भिंगोले, संतोष कल्याणी, नवनाथ डोंगरे, सांगलीचे प्रदिप वाले, बसवराज पाटील कौळखेडकर, माधवराव निंगदाळे, प्रा.रामदास मिरजगावे, चंद्रकांत शिरसे, सुभाष शेरे, भिमाशंकर शेळके, राजकुमार वडले, अशोक तोंडारे, बाबुराव शेटकार, चंद्रकांत डांगे, अशोक काडादी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रा.प्रभाकर उदगीरे सर नांदेड व रामेश्‍वरअप्पा कानडे माजलगाव यांना जीवनगौरव पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उमाकांत मळगे, शिवहार येलुरकर, माधवराव लिंगदाळे, रामदास मिरजगावे, शिवकुमार हासरगुंडे, सुनिल हवा, श्रीनिवास गंगथडे, उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्यासह 22 मान्यवरांना समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच श्रीमती अंजुम कादरी व सौ.सुलभा साकोळकर यांना अक्कामहादेवी  पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या वधूवर मेळाव्यासाठी भावी वधू व वर आणि पालकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली व 450 वधूवरांची नाव नोंदणीही झाली.

या मेळाव्यासाठी उदगीर तालुका व परिसरातून समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






Sunday, September 25, 2022

मौ.गंगापूर येथील सरपंच जयश्री बिरादार यांना वाणी या जातीची वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त

 

मौ.गंगापूर येथील सरपंच जयश्री बिरादार यांना वाणी या जातीची वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त




मौ.गंगापूर येथील सरपंच जयश्री बिरादार यांना वाणी या जातीची वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त


उदगीर दि 25 :- संगम पटवारी प्रतिनिधी  लिंगायत TV Live 

मौ. गंगापूर  येथील ग्रामपंचायत निवडणूक सन २१ ते २५ अंतर्गत प्रभाग क्रमांक २ मधून सर्वसाधारण स्ञी या जागेवर निवडणूक लढवून प्रचंड मतांनी निवडून आल्या होत्या या निवडणुकीच्या अनुषंगाने मौजे गंगापूर ता. उदगीर ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव  सुटलेले असल्याने  त्यांनी सरपंचपदासाठी नामनिर्देशन अर्ज भरून (ता. ११) फेब्रुवारी २१ रोजी बहुमताने सौ. जयश्री नागभूषण बिरादार यांची सरपंचपदी  निवड करण्यात आली. सौ जयश्री नागभूषण बिरादार यांनी मा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर यांच्याकडे वाणी या जातीच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी  दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी अर्ज दाखल केला होता, त्या अर्जाच्या अणूषंगाने त्याच्या विरोधात गावातील महानंदा गुरुलिंग स्वामी यांनी आक्षेप/तक्रार नोंदविली होती . या जाती-दाव्याच्या प्रकरणात मा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन सौ जयश्री नागभूषण बिरादार यांनी दाखल केलेल्या वाणी या जातीच्या दाव्याबाबत( दि .16) सप्टेंबर रोजी न्यायनिर्णय देऊन व तसेच वाणी या जातीचे जात प्रमाणपत्र वैध ठरवून त्यांना वाणी या जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी गंगापूर च्या सरपंच सौ. जयश्री नागभूषण बिरादार यांची बाजू वकील म्हणून अँड प्रसाद काळे पाटील, औरंगाबाद यांनी प्रखरपणे बाजू मांडली आणि तसेच अँड दिपक मंगले या वकीलाने त्यानां साह्य केले आक्षेपदार/तक्रारदार यांचे वकील म्हणून अँड विष्णू गाडेकर यांनी काम पाहिले.



लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...