Monday, October 17, 2022

वीरशैव लिंगायत धर्माचे जगद्गुरूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट

 वीरशैव लिंगायत धर्माचे जगद्गुरूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट


वीरशैव लिंगायत धर्माचे जगद्गुरूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट



सातारा दि १७ :- प्रणाली वाकडे 

दि.17-10-2022 सोमवार रोजी सायं.5 वाजता भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना जानेवारी महिन्यात श्रीशैल्य पिठामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण श्री शैल्य जगदगुरू श्री श्री श्री 1008 डॉ.चनसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी व डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिले. यांच्या समवेत केंद्रीय संसदीय मंत्री ना. प्रल्हाद जोशी उपस्थित होते. मा. पंतप्रधान मोदीजीनी निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आनंदाने होकार दिला.

श्रीशैल्य जगदगुरु  श्री श्री श्री 1008  डॉ.चनसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीसोबत वीरशैव लिंगायत समाजातील विविध समस्यांवर व देशातील विविध प्रश्नांवर तब्बल 20 मिनिट विस्तृत चर्चा केली.



लिंगायत समाजाचे शंभर सदस्य येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी होतील.प्रा सुदर्शनराव बिरादार


लिंगायत समाजाचे शंभर सदस्य येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी होतील.प्रा सुदर्शनराव बिरादार 





लिंगायत समाजाचे शंभर सदस्य येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी होतील.प्रा सुदर्शनराव बिरादार 
शिरूर अनंतपाळ दि 17  - प्रा अजय शेटे प्रतिनिधी 
लिंगायत महासंघाच्या वतीने शिरूर अनंतपाळ येथे आज रविवार दिनांक १६आक्टोबर रोजी लिंगायत समाजाची शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मठात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकिच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना  लिंगायत महासंघाचे प्रांतांध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार म्हणाले कि, लिंगायत समाजाची राजकीय क्षेत्रातील भागीदारी वाढवायची आहे.जिल्हयात पाच लाख लिंगायत मतदार आहेत.पण सर्व पक्षीय मिळून सहा सदस्य जिल्हा परिषद व बोटावर मोजता येणारे पं स सदस्य .एवढ्यावर समाजाला न्याय मिळणार नाही.आता सर्व पक्षीय नेत्यांनी विचार करुन लिंगायतांना लोकसंख्येच्या आधारावर जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.यात कोणता पक्ष लिंगायत समाजाला मदत करत़ ते आम्हाला बघायचे आहे.





लिंगायत समाजाला योग्य वाटा द्यावा अन्यथा आम्ही आपला घाटात करु.लिंगायत समाजांनी आपला माणुस कोणत्याही पक्षातुन निवडणूक लढवत असतील तर त्यांना मदत करावी.असे झाले तर १००सदस्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण निवडून आणु असे प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी सांगितले.यावेळी लिंगायत महासंघाचे जिल्हासंघटक काशिनाथ मोरखंडे, सिद्रामप्पा पोपडे, लिंगायत महासंघाचे शहर सरचिटणीस लि़गेश्वर  बिरादार, गोरोबा काका शिवणे,शिवाजी पांडे, तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, तालुका संघटक विठ्ठलराव पाटील,संग्राम हावा,हत्तरगे ताई,कुरे ताई या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.






Friday, October 14, 2022

लिंगायत समाजाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर रविवारी शिरूर अनंतपाळ व देवणी येथे बैठक

 लिंगायत समाजाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर रविवारी शिरूर अनंतपाळ व देवणी येथे बैठक




लिंगायत समाजाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर रविवारी शिरूर अनंतपाळ व देवणी येथे बैठक. 

 


लातूर दि :- १४ प्रतिनिधी ,  
दिवाळी नंतर होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर लिंगायत समाजाची शिरूर अनंतपाळ व देवणी येथे रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी लिंगायत महासंघाच्यावतीने बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता शंकरलिंग शिवाचार्य महाराज मठसंस्थान शिरूर अनंतपाळ येथे तर देवणी येथील मठात दुपारी 2.30 वा. लिंगायत समाज बांधवांची बैठक लिंगायत महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवू इच्छिणार्‍या भावी उमेदवारांनी व विद्यमान उमेदवारांनी तसेच दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावच्या समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन लिंगायत महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.
या बैठकांना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद भुसारे, माधव मल्लिशे, नवनाथ डोंगरे, दिलीप सोलगे तसेच शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, शिरूर अनंतपाळ तालुका संघटक विठ्ठलराव पाटील तसेच देवणी तालुकाध्यक्ष शेषेराव मानकरी, व शहराध्यक्ष विजयकुमार लुल्ले व दोन्ही तालुक्यातील लिंगायत महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी आवाहन केल्याचे लिंगायत शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार यांनी सांगितले. तसेच 23 ऑक्टोबर रोजी वरील विषयासंदर्भात लातूर व उदगीर येथे सुध्दा अशा बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही लिंगेश्‍वर बिरादार यांनी सांगितले.




 



Wednesday, October 12, 2022

नागणसूर येथे लिंगैक्य बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

नागणसूर येथे लिंगैक्य बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.



नागणसूर येथे लिंगैक्य बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.



सातारा, दि.11 -  रविंद्र वाकडे.

 अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील ग्रामदैवत व महाराष्ट्राच्या मंठस्थ नागणसूरचे नंदादिप परमपूज्य बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि 7,8 व 9 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या 90 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे मठ संस्थान व श्री स्वामीजींचे जीवन कार्य या विषयीची अधिक माहिती प्रसारित करण्यासाठी https://basavalingeshwar.com वेबसाईटचे उद्घाटन दि.8 रोजी नुकतेच करण्यात आले आहे.




    नागणसूर विरक्त मठाचे अधिपती परमपूज्य डॉ.अभिनय बसवलिंग महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या प्रमाणे 11 हजार सुवासिनींची ओटी भरणे,7000 जंगम गणाराधना विधी,सामूहिक विवाह समारंभ आयोजन व एक लाख एक हजार भक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम पार पाडण्यात आला.



या कार्यक्रमात दि.8 रोजी पहाटे 6 वा.श्री शिवलिंगास  महारुद्रा भिषेक करण्यात आला.तसेच स.9 वा. षटस्थळ ध्वजारोहण करण्यात आले. स.11 वा.एकूण अकरा हजार सुवासिनींचा ओटी भरण कार्यक्रम पूर्ण करण्यात आला.या नंतर सात हजार जंगम गणाराधना पूजा विधी पार पाडण्यात आला.या नंतर कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्रप्रदेश सह देशातील कानाकोपऱ्यातून असलेल्या सद्भभक्ताना एक लाख,एक हजार पुरणपोळी व तूप अशा महाप्रसादाचे अन्नदान वाटप करण्यात आले.दुपारी चार  वाजता नवागत वधू - वरांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्यात आला.

दि.9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्री बसवलिंग महास्वामीजींच्या प्रतिमेची व धर्मग्रंथाची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.या मिरवणुकीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.त्याच बरोबर लेझिम, टिपरी,झांज, भजन यांचे सादरीकरण अनेक सांस्कृतिक मंडळाकडून करण्यात आले. सर्व भक्तांना सलग दोन दिवस अन्नदान महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




हे मठ संस्थान मु.पो.नागणसूर , ता.अक्कलकोट, जि.सोलापूर येथे असून,त्यास श्री बसवलिंगेश्र्ववर समाधी मठ संस्थान उर्फ 'तुप्पीन मठ ' असे संबोधले जाते.या आश्रम संस्थानला पूर्व व दक्षिण  दिशा असे दोन मोठे प्रवेशद्वार असून,या संस्थांनचे मूळ अधिपती श्री. प. पू.बसवलिंगेश्वर स्वामी महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीने व समुपदेशक मार्गदर्शनाने येथील जनतेच्या जीवनात आमूलाग्र सारासार विचारसरणी व विवेकवाद रुजवला.




हे एक स्वयंभू व जागृत मठ संस्थान असून त्यास ' गद्दुगे मठ ' असे पण म्हटले जाते.हे मठ संस्थान उच्च प्रतीचे लाकूड व मार्बल फरशी दगड यापासून बनवले गेलेे असून ,आतमध्ये श्री स्वामीजींचे जीवन चरित्र दर्शन घडवणारे ' मुख दर्शन ' नावाचे चित्र प्रदर्शन करण्यात आले आहे.श्री.स्वामीजी हे स्वतः बल उपासक होते.रोज पहाटे व्यायाम करून त्यांनी आपली शरीरयष्टी मजबूत बलदंड बनवून आरोग्य साधनेचे महत्त्व पुढील पिढीला पटवून दिले होते. व या पवित्र मठसंस्थानला नावलौकिक प्राप्त करून दिला.त्यामुळे त्यांना ' पैलवान योगी ' असे पण म्हटले जायचे.



त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा  व गुरुकृपेेस पात्र व्हावे.असे आवाहन डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामिजी यांनी सर्व भाविक भक्तांना केले आहे.





सदरचा पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौजे नागण सूर येथील स्थानिक रहिवाशी व सार्वजनिक मंडळे यांनी अथक परिश्रम घेतले.







Saturday, October 8, 2022

तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य : औसेकर महाराज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांची झाली पाण्याची सोय वीरशैव व्हीजन व आस्क मी तर्फे 3500 पाणी बाटल्यांचे वाटप



तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य : औसेकर महाराज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांची झाली पाण्याची सोय वीरशैव व्हीजन व आस्क मी तर्फे 3500 पाणी बाटल्यांचे वाटप


तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य : औसेकर महाराज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांची झाली पाण्याची सोय वीरशैव व्हीजन व आस्क मी तर्फे 3500 पाणी बाटल्यांचे वाटप

 सोलापूर दि ७ : राजशेखर बुरुकुले सोलापूर 

 भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देणे ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अवलंब करणाऱ्या अनेक संस्था आज समाजात कार्य करीत आहेत त्यापैकीच वीरशैव व्हिजन ही एक संस्था आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य असल्याचे प्रतिपादन औसा संस्थानचे सद्गुरु गोरखनाथ महाराज औसेकर यांनी केले.




          तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या श्री तुळजाभवानी भक्तांसाठी पिण्याचे थंड पाण्याच्या बाटल्या वीरशैव व्हीजन व आस्क मी हेल्पलाइन तर्फे वितरित करण्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर  नीलकंठ सहकारी बॅंकेचे संचालक जयनारायण भुतडा, आस्क मी हेल्पलाइनचे संचालक राहुल शेटे, समर्थ रोडलाईन्सचे संचालक आप्पासाहेब लोणी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.

             तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी विविध ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्यात येते. काही ठिकाणी औषधोपचारही केले जातात. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या वाटेत भेडसावत असल्याचे काही भक्तांनी वीरशैव व्हिजनला सांगितले. त्यामुळे वीरशैव व्हिजनने भक्तांना वाटेत पिण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. याचा 3500 भाविकांनी लाभ घेतला.

            यावेळी सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोमनाथ चौधरी, महेश शिंदे, तुकाराम मुळे उपस्थित होते.

              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत लोणी, मन्मथ कपाळे, गणेश सूर्यवंशी, मनोज चौधरी, आदित्य सिद्धे, महादेव हारके सनी आरळीमार, महेश घुले, सचिन वैद्य यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या वतीने पाण्या पाण्याच्या बाटल्या वितरित करताना गोरखनाथ महाराज औसेकर, जयनारायण भुतडा, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, सोमनाथ चौधरी



Tuesday, October 4, 2022

कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर)

 कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) 


कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) 


सातारा दि ४ प्रा अजय शेटे 

कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे  आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) यांच्याकडे पाहिले जाते वारणा समुहाचे प्रमुख,जनसुराज्य शक्ती पक्षाचे,सुराज्य फौंडेशनचे संस्थापक पन्हाळा-शाहूवाडी तालुक्याचे आमदार यांसह महत्वाच्या पदांवर आज कार्यरत आहेत समाजामध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करणे.जिद्द आणि निष्ठा या जोरावर सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून १९५८ मध्ये पहिला ऊस गळीत हंगामा सुरू करून कै.तात्यासाहेब कोरे यांनी पंचक्रोशीत शेतकरी चळवळीस प्रारंभ केला काही वर्षात नावारूपास आलेल्या वारणा उद्योग व सहकार समुह पुढे चालवणारे लाडके आमदार डाॅ.विनय कोरे यांनी समाजासमोर नावीन्यपूर्ण आदर्श ठेवला अशा या नेत्याचा आज वाढदिवस होत आहे.




याबरोबरच देशासह राज्यात कोरोना विषाणू रोगाने लोकांची पिळवणुक झाली असून वारणा परिसरातील लोकांना हक्काचे कोरोना केअर सेंटर आमदार डाॅ.विनय कोरे यांनी उभारणी करून अत्यंत कमी दरात कोरोना पेंशटला उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

गगणाला गवसणी घालण्याची इच्छा-शक्ती असणारे माजी मंत्री आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) यांच्या रुपाने समाजाला लाभला आहे अशा गतिमान नेतृत्वाची अशीच चढती कमान राहो, हिच आज वाढदिवसादिनी अपेक्षा....





Saturday, October 1, 2022

खानापूर सार्वजनिक दुर्गा मंडळातर्फे रविवार दि 2 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन..!


खानापूर सार्वजनिक दुर्गा मंडळातर्फे रविवारी दि  2 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन..!
 
खानापूर दि 1  :- शिवकुमार कल्याणी ।
दुर्गा माता सार्वजनिक नवरात्रौत्सव समिती खानापूर या मंडळाचे हे २३ वे वर्ष असून त्यानिमित्त २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार, दि. २ आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी  सकाळी 9 वाजता सदर रक्तदान शिबीर दुर्गा मंडळाच्या भवनात  होणार असल्याची माहिती खानापूर सार्वजनिक मंडळाचे  मंडळाचे अध्यक्ष संतोष कदम यांनी दिली.
रक्तदाता हा रुग्णाचा जीवनदाता असून, रुग्ण व उपचार यामधील अमृतासारखा महत्त्वाचा संजीवनी देणारा देवदूत आहे. त्यामुळे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या मध्ये खानापूर व परिसरातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे येत रक्तदान करण्याचे आवाहन दुर्गा मंडळातर्फे करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड , रक्तपेढीतर्फे या शिबिरात रक्तसंकलन केले जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करण्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांशी संपर्क करावे , व रक्तदाता म्हणून या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा असे शोषल मिडीयातून संदेश फिरवण्यात येत असुन, रक्तपेढीतर्फे  व मंडळातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे,सदर मंडळाची स्थापना इ.स.२००० साली झाली असुन दर वर्षी अनेक सामाजिक उपक्रम या मंडळाने राबवले आहेत,व याही वर्षी उत्सवात,महारक्तदान शिबीर, समाज प्रबोधनपर किर्तन,व्याख्यान, महाराष्ट्राची लोककला असणारे भारूड,देवीचा जागर गोंधळ, महाप्रसाद, अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, पदाधिकारी,व मार्गदर्शक विजय धनसुरे, विश्वनाथ ताडकोले, निळकंठ पटणे, उमाकांत पाटील,बालाजी तुरुकवाड, विनोद रायकोडे, राजेंद्र भायकटे, सुनिल ठिगळे,हावगी पाटील,सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत ..

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...