लिंगायत महासंघाच्या वतीने महात्मा बसवेश्वर दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन संपन्न.
लातूर दि :- प्रतिनिधी प्रणाली वाकड़े लिंगायत TV live
लिंगायत महासंघाच्या वतीने महात्मा बसवेश्वर दिनदर्शिका 2022 या दिनदर्शिकेचे लातूर येथे काल प्रकाशन करण्यात आले. अतिशय सुंदर व आकर्षक असलेली दिनदर्शिका, एक परिपूर्ण दिनदर्शिका काढण्यात आली आहे. या महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेचे लातूर येथे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी लिंगायत महासंघाचे माणिक मुळे, विश्वनाथप्पा मिटकरी, विश्वनाथप्पा सावळे स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कुडुंबले, शहराध्यक्ष बलराज खंडूमलके, तर शहर सरचिटणीस लिंगेश्वर बिरादार, तुकाराम कावळे, सौ राधिका कावळे सुर्यकांत बजगुडे आदींची उपस्थिती होती.
या महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेचे मोफत वितरण करण्यात येत असून दिनदर्शिकेचे सर्व पदाधिका- यांनी कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment