लिंगायत समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आप्पा उर्फ श्री बीबी बहिरट सर. त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण . आणि या निमित्ताने त्यांना वाहिलेली शब्द रुपी श्रद्धांजली .
लिंगायत समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आप्पा उर्फ श्री बीबी बहिरट सर .
लिंगायत समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आप्पा उर्फ श्री बीबी बहिरट सर हे समाजातील आणि रयत शिक्षण संस्थेमधील सर्वांचे आवडते , सगळ्यांचे लाडके आप्पा हे गजब व्यक्तिमत्व होतं ते जेवढे रागीट होते तितकेच मायाळू व प्रेमळ होते. वडील ,भाऊ, मामा ,मुलगा, काका ,मेहुणा अशा सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी जेवढे व्यवस्थित पार पाडल्या तेवढ्याच सामाजिक व आर्थिक जबाबदारीही पार पाडल्या. रयत शिक्षण संस्थेची 33 वर्ष सेवा करून सेवानिवृत्तीनंतरही संस्थेची सेवा ते अविरत करतच होते एक हुशार व अभ्यासू व्यक्ती म्हणून ते संस्थेत प्रसिद्ध होते तसेच त्यांच्या सेवाकाळात त्यांनी शिक्षकेतर संघटनेची तालुका व जिल्हाध्यक्ष पद भुषविले होते .त्यांच्या कारकिर्दीचा आलेख बघितला तर त्यांच्या वडिलांना पण ते एवढे पुढे जातील असे कधी वाटले नव्हते ,लहानपणी गावातील सगळ्यात आगाऊ मुलगा, कायम त्रास देणारा ,दररोज एक तरी भांडण घरी घेऊन येणारा त्रासदायक मुलगा होते. अभ्यासाकडे कधी विशेष लक्ष दिलेच नाही दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी फलटण येथे आले आपली परिस्थिती बेताची होती पण त्यातही पदवी पूर्ण करून रयत शिक्षण संस्थेत क्लार्क या पदावर रुजू झाले .त्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात भरपूर शिकत गेले आणि शिकवत ही गेले. त्यांनी स्वतःची परिस्थिती बेताची असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत खूप जणांना मदत केली .कौटुंबिक जबाबदारीत तीन मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यास आधार दिला . सातारा येथे स्वतःची जागा घेऊन स्वतःचे घर बांधले त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांची पत्नी शुभदा बहिरट यांनी मोलाची साथ दिली .अशा या धाडसी हजरजबाबी मनमिळावू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तीने कायम स्वतःबरोबर इतरांनाही पुढे नेले, परंतु काळ कोणासाठी थांबत नाही अशा या उत्तुंग व्यक्तीमत्वा चे निधन दिनांक 19 जानेवारी रोजी 2021 रोजी झाले. आज त्यांच्या जाण्यास वर्षपूर्ती होत असली तरी त्यांचे अस्तित्व जाणवत आहे .सगळ्यांच्या मनातील त्यांची जागा कायम शाश्वत राहणार आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांची मुलगी या नात्याने वाहिलेली शब्दांजली त्यांना अर्पण.
प्रणाली वाकडे उंब्रज
No comments:
Post a Comment