उंब्रज तालुका कराड येथील कुमारी योगिता विजापुरे हिने आपल्या लग्नाच्या सुरुवातीला गावदेवाची सुरुवात केली छ्त्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करून.
उंब्रज तालुका कराड येथील कुमारी योगिता विजापुरे हिने आपल्या लग्नाच्या सुरुवातीला गावदेवाची सुरुवात केली छ्त्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करून.
उंब्रज दि 22 :- प्रतिनिधी प्रसाद वाकडे
उंब्रज तालुका कराड येथील विक्रम इलेक्ट्रॉनिक चे विक्रम विजापूरे यांची कन्या योगिता चा विवाह निश्चित झाला असून पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या अगोदर गावदेव केले जातात आणि याची सुरुवात ही ग्रामदैवतेचे दर्शनानी केली जाते मात्र विक्रम विजापूरे यांच्या कन्येने या परंपरेस फाटा देऊन संपूर्ण महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचे आशीर्वाद घेऊन केले असून या भावी पिढी समोर एक वेगळा आदर्श ठेवला असून या मुळे उंब्रज आणि परिसरात या विषयावर योगिता चे नाव आदरानी घेतले जात आहे , तिने आज च्या तरुण आणि तरुणीसाठी आज नव्या रितीला वाट करून दिली योगिताने आपल्या लग्नाच्या सुरुवातीला गावदेवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेन केली , या वेळी सोबत वडील विक्रम विजापुरे ,निकिता , अंकिता. इत्यादी उपस्थित होते , योगिताचे लग्न २३/०१ /२०२२ रोजी होणार असून तिच्या या विवाहासाठी उंब्रज ग्रामस्थ आणि समस्त शिव भक्तानी शुभेच्छा दिल्या .
No comments:
Post a Comment