कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश,शिवकुमार स्वामीजी.
सातारा दि 21:- महादेव मेंडगीरी प्रतिनिधी लिंगयात TV live
कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश *प.पू. शिवकुमार स्वामीजी यांची आज पुण्यतिथी*. ते मृत्यूसमयी १११ वर्षांचे होते. लिंगायत समाजाचे गुरू असलेले स्वामीजी *'वॉकिंग गॉड'* म्हणून ओळखले जायचे. सिद्धगंगा मठाद्वारे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वामीजीनी विपुल कार्य केले. मठाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत तब्बल १३० शैक्षणिक संस्थांची उभारणी झाली आहे.
७०० वर्षांचा इतिहास असलेला सिद्धगंगा मठ लिंगायत समाजाचा सर्वात मोठा म्हणून ओळखला जात असला तरी तो सर्वाना खुला आहे. सर्व जाती धर्माच्या तब्बल आठ हजार मुलांना मोफत शिक्षण त्याचबरोबर त्यांच्या राहण्या, जेवणाची सोय या मठामार्फत केली जाते. या मठाची चूल कधीच बंद होत नाही. रोज २० हजारहून अधिक भाविकांना इथे अन्नदान केले जाते. भारतीय संस्कृतिविषयक सर्व भाषांतील पुस्तके या मठात जतन करून ठेवण्यात आली आहेत. स्वामीजींच्या आधुनिक विचारसरणी आणि कार्यामुळे हा मठ चर्चेच्या केंद्रस्थानी आला. राज्य सरकारने त्यांना *"कर्नाटक रत्न"* तर केंद्र सरकारने त्यांना *"पदमभूषण'* पुरस्काराने गौरवान्वित केले आहे.
कर्नाटकच्या आणि लिंगायत समाजाच्या सामाजिक शैक्षणिक पटलावर आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या शिवकुमार स्वामीजींना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment