श्री.गुरुपती रुद्रपशुपती लिंगायत मठ मिरज यांच्या वतीने २०नोंव्हेबर रोजी बसव पुरस्कार, सत्कार व वधु-वर मेळावा
मिरज दि 17 :- प्रतिनिधी रमेश मिठारी
लिंगायत समाजातील सर्व पोट जाती साठी वधू-वर परिचय मेळावा शनिवार दिनांक २०नोंव्हेंबर रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० पर्यंत लिंगायत मठ, सोमवार पेठ मिरज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जगद्गुरु श्री.गुरुमुर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी , प्रमुख उपस्थिती श्री.गुरुमुर्ती गुरुनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी,श्री.गुरुमुर्ती रुद्रपशुपती उर्फ विजयकुमार महास्वामीजी-मिरज,श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी,मासुलकर महाराज-मासोरी मठ कराड,श्री.महादेव महाराज महास्वामीजी-कवठेमहांकाळ, पाहूणे -सुदर्शन बिरादार-लातूर, बसवराज कनजे-पुणे, मच्छिंद्र भोसले-सोलापूर , सुहास मजती-मिरज या मान्यवरांच्या उपस्थितीत सुरेश शेटे, महादेव तेली, रमेशकुमार मिठारे, डॉ.सरिता पट्टणशेट्टी, यांना बसव पुरस्कार ने सन्मानित करण्यात येणार आहे.तर डॉ.रविंद्र आरळी ,शिवाणी सगरे, डॉ.कपिलेश्वर गुळभिले व वेदिका हारगे यांचा विशेष सत्कार गौरव सोहळा ठेवण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजक प्रदिप वाले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment