** खरा महानायक **
विशेष लेख ..प्रा.अजय शेटे..वडूज..
9823540239.
..खरा महानायक कोण ? हा जर प्रश्न आपल्या बॉलिवूड प्रेमींना विचारला तर दिलीपकुमार..राजेश खन्ना..देव आनंद..जितेंद्र..पासून ते सर्वश्रेष्ठ महानायक अमिताभ बच्चन पर्यंत अनेकांची नावे तोंडा त येतील..तसेच बॉलिवूड च्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीवर मसाला चोळून भाष्य करणारी आपली महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे व पत्रकार मंडळी नुकत्याच ताज्या घडलेल्या व अभिनेता सलमान पुत्र असलेल्या चरसी आर्यन खान व बॉलिवूड मधील ड्रग मन..हेरॉईन ..ते आर. डी.एक्स विश्व.. अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ते अभिनेता संजय दत्त पर्यंत मादक चर्चा व वादविवाद करण्यात जवळ जवळ आठवडाभर गुंतले होते..
..पण त्याच वेळी मात्र कर्नाटक व सीं मे ची प्रसार माध्यमे व पत्रकार मात्र एक वेगळाच विषय घेवून समाजासमोर प्रदर्शित होत होते. त्याचे कारण हि तसेच आदर्शवादी होते..
..ते म्हणजे कन्नड लिंगायत सुपरस्टार अभिनेते डॉ.राजकुमार यांचा सुपुत्र असलेल्या आणि अतिशय कमी अशा ४६ व्या वयात कॉलीवूड चा सुपरस्टार बनलेल्या पुनीत राजकुमार या लिंगायत अभिनेत्याचे नाव सलग एक आठवडाभर कर्नाटक दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर २४ तास गाजत होते..त्याचे कारण म्हणजे या गुणी अभिनेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने झालेला अचानक मृत्यू..आणि हाच मृत्यू कर्नाटक व सीमा वादी जनतेला हळहळ करायला लावणारा ठरला..तसेच त्याच्या लोकप्रियतेमुळे केवळ सुरक्षेसाठी कर्नाटक सरकारला कलम १४४ घोषित करावे लागले..
..काय असावी या मागची जादू हे जर आपण नीट पाहिले तर लक्षात येईल की.या तरुण गुणी अभिनेत्याने एकापाठोपाठ एक असे २१ सुपरहिट आदर्श चित्रपट कर्नाटक फिल्म इंडस्ट्रीला दिले..आणि तिचा दर्जा संपूर्ण भारतात उंचावला..हाच अभिनेता २६ अनाथाश्रम..४६ मोफत शाळा..१६ वृद्धाश्रम..१९ गोशाळा..चालवत होताच शिवाय १८०० अनाथ विद्यार्थी..विद्यार्थिनी यांचे पालक बनून त्याने त्यांना पूर्णपणे दत्तक घेतलेले होते..आणि हा सर्व खर्च तो स्वताच्या उत्पन्नातून करायचा..
..त्याच्या मृत्यूनंतरही अनेक साधकबाधक चर्चा झाल्या..त्यामध्ये जिम ला प्रवेश देताना पहिली आरोग्य तपासणी केली जाऊन अहवाल तपासला जावा..पूरक खाद्य पदार्थ त्याची उपयोगिता..प्रमाणित गरज आणि अतिरेकी सेवन याचे सपरिणाम व दुष्परिणाम..तसेच अती व्यायामा मुळे होणारी दमछाक व त्यातून होणारा बलव्यय..योग्य अयोग्य व्यायाम पद्धती..परंतु मरण हे कधी मरणाराचे नसते.तर त्याच्या मागे उरणारांचे असते..या न्यायाने विचार केला तर पुनीत ने जिवंत असताना केलेल्या सामाजिक कार्याचे मरण आज त्याच्या बरोबरच होणार होते..परंतु पेरलेली माणसे पण कधी कधी उगवतात या उक्तीनुसार पुनीत चाच जिवलग मित्र असलेला कॉली वूड चा दुसरा सुपरस्टार अभिनेता विशाल हा पुढे सरसावला आणि यापुढे हे महान कार्य मी पुढे चालू ठेविन असा संकल्प तात्काळ त्याने आपल्या प्रिय मित्राच्या पर्थिवासमोर जाहीर केला.आणि आपल्या मित्राला खरोखरच ची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले..त्याच्या या निर्णयामुळे कर्नाटकच्या सामाजिक क्षेत्राला एक नवीन पालक मिळाला आणि बरीच शी काळजी कमी झाली..
..आपल्याकडे थोड्याफार रकमेची देणगी अथवा शुल्लक मदत केली तरी त्याचे खूप मोठे प्रदर्शन केले जाते..त्यामुळे एका हाताचे दुसऱ्या हाताला कळून न देता दान करणारांची त्यांच्यापुढे खूप मोठी गोची होते..पूनित राजकुमार ने जिवंत असताना कधीही त्याच्या कामाची जाहिरात केली नाही..ती फक्त अखंड कर्म करत राहिला..१०० पेरले तर ८० तरी उगवेल असे त्याचे कार्य कमी वेळात जास्त वाढले..त्याने मा पंतप्रधान निधी साठीही ५० लाख रुपयांची देणगी दिली..आत्ता खास मुलींच्या शिक्षणासाठी त्याचे नवीन शैक्षणिक प्रकल्प उभा करण्याचे कार्य चालू होते.मदती साठी सादर केलेल्या कोणत्याही खेळासाठी..सामाजिक व करमणूक कार्यक्रमासाठी त्याने कधीही बिदागी घेतली नाही.. असे सर्व शो तो विनामा न धन सादर करायचा..कन्नड भाषेतील कौन बनेगा करोडपती या माली केचा तो स्टार्ट तो एंड अँकर होता.परंतु एकदा आयोजकांनी हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह प्रश्न टाकल्यावर त्याने स्वतः हून आहे त्याच ठिकाणी तो शो सोडून दिला. व आपले मनापासून चे हिंदू धर्म प्रेम दाखवून दिले..
..आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान केले जावेत. हा त्याचा मानस त्याची आई..पत्नी.. व मुला..मुलीने पूर्ण केला.आणि त्याला कर्नाटक सरकारच्या मालकीच्या फिल्म स्टुडिओ मध्ये शासकीय इत मा ता त देहाग्नी देण्यात आला..
..जो आव डे सर्वांना.. तोची आवडे देवाला.. मरावे परी कीर्ती रुपी उरावे..या न्यायाने सर्वांनी खारीच्या वाट्याने का होईना समाज व्यथा रथाची दोरी पुढे ओढावी व आपण जिवंत प्रेते नाही आहोत.हे भावी बॉलीवूड ला दाखवून द्यावे.. हिच खऱ्या अर्थाने सुपरस्टार पुनीत राजकुमार च्या कार्याला आणि त्याच्यात लपलेल्या एका खऱ्या महानायकाला पण भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल..तसेच त्याच्या डोळे दिपावणाऱ्या समाज कार्याला पण विनम्र अभिवादन..
..शेवटी एव्हढेच म्हणता येईल..
..जिंदगी के परदे पर ..इतना खूब निभा वाे किरदार..
.. कि , परदा गिरनेपर भी तालिया बजती रहे ...** माहिती संकलन आणि लेखन प्रा अजय शेटे , रविंद्र वाकडे
No comments:
Post a Comment