Tuesday, January 3, 2023

कर्नाटकातील सिद्धेश्वर स्वामी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याबाबतची काही आठवणी.

 

कर्नाटकातील सिद्धेश्वर स्वामी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याबाबतची काही आठवणी.


                                        

कर्नाटकातील सिद्धेश्वर स्वामी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याबाबतची काही आठवणी.



 सिद्धेश्वर स्वामी हे जरी कर्नाटकात जन्मले तरी त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले होते 

1968 या काळामध्ये दसरा चौकाजवळील सध्याच्या टायटन शोरूम च्या माडीवर डॉक्टर माई चव्हाण यांचा दवाखाना होता आणि त्याच्या तिसऱ्या मजल्यावर एक छोटे सभागृह होते तेथे एमआर देसाई यांचे द्वितीय चिरंजीव विचारवंत श्री दत्ता बाळ यांची दर रविवारी व्याख्याने होत असत ही व्याख्याने तत्त्वज्ञान पर असल्यामुळे त्याला अनेक लोक जमत असत .नजीकच लिंगायत बोर्डिंग मध्ये राहणारे सिद्धेश्वर स्वामी काही वेळेला आपली हजेरी लावत ते राजाराम कॉलेजमध्ये एम ए तत्त्वज्ञान विषय घेऊन शिकत होते आणि त्यांच्या मागे मी एक वर्ष तेथेच शिकत होतो माझाही विषय तत्त्वज्ञान होता आणि आम्हा दोघांना तत्त्वज्ञान शिकवणारे प्राध्यापक श्रीनिवास दीक्षित होते आमचे भाग्य की श्रीनिवास दीक्षित यांच्यासारख्या एका नामवंत प्राध्यापकाकडून आम्ही तत्त्वज्ञानाचे धडे गिरवले पुढे श्रीनिवास दीक्षित मला पीएचडी साठी सुद्धा गाईड होते शेवटपर्यंत दीक्षित सरांची कृपादृष्टी लाभली.

यानंतर बरेच वर्ष सिद्धेश्वर स्वामींची भेट नव्हती कणेरी मठाचे अदृष्यकाडसिद्धेश्वर यांचे ज्ञानदीप मासिक मी संपादन करत होतो. तिथे त्यांचे येणै चालू होते. एकदा भोज येथे सिद्धेश्वर स्वामींची प्रवचन मालिका होती आणि त्यातल्या एका कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी थोडी चर्चा झाली जुन्या आठवणी निघाल्या त्यानंतर प्रवचनाच्या अगोदर त्यांनी मला बोलण्याची विनंती केली मी थोडा वेळ बोललो वक्तशीरपणाबद्दल सिद्धेश्वर स्वामींची ख्याती होती बरोबर ठराविक वेळेला त्यांचे व्याख्यान सुरू असायचे त्याला खूप लांबून लोक यायचे यानंतर एकदा ते इचलकरंजीला उद्योगपती मालूंच्या फार्म हाऊस वर होते त्या वेळेला माझे महायोगी गौतम बुद्ध हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते त्यावर बऱ्यापैकी चर्चा होत्या मी त्याची प्रत सिद्धेश्वर स्वामींना दिली आणि गौतम बुद्धांच्या अस्थिरक्षेचा स्तूप कोल्हापूरमध्ये होता याबद्दलच्या संशोधनाची माहिती दिली पुढे काही दिवसानंतर मला अदृश्य कार् सिद्धेश्वर स्वामींचा निरोप आला सिद्धेश्वर स्वामीना तुमचं बुद्धा वरचे व्याख्यान ऐकायचं आहे आणि कनणेरी मठ मध्ये ते आलेले आहेत त्यावेळी खाली माझे व्याख्यान लोकांसमोर सुरू होते आणि तिथला स्पीकर ची वायर गेस्ट हाऊसला सिद्धेश्वर स्वामींच्या खोलीमध्ये नेलेली होती मी साधारणपणे सकाळ आणि दुपारी चार तास गौतम बुद्ध या विषयावर मांडणी केली .पहिले सत्र झाल्यावर अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीं व मी त्यांना गेस्ट हाऊस वर भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले "डॉक्टर देसाई  तुम्ही केलेली बुद्ध तत्त्वज्ञानाची मांडणी ही बिनचुक आहे .मला खूप आवडली."

सिद्धेश्वर स्वामींची माझी शेवटची भेट  तीन /चार वर्षांपूर्वी कनेरी मठावर झाली .माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील साहेबांनी मला सांगितले की आपण कणेरी मठावर जायचे आहे तिथे एक मोठे योगी येणार आहेत त्यांना भेटायचं आहे मी त्यांच्याबरोबर गेलो आणि एका शेतामध्ये सिद्धेश्वर स्वामीच बसलेले होते डी वाय साहेब माझी ओळख करून देताना ते म्हणाले "अहो त्यांचा माझा फार जुना परिचय आहे आम्ही एकाच गुरूकडे तत्त्वज्ञान शिकलेलो आहोत आणि त्यांनी सुंदर हास्य दिलं ते हास्य आजही  मला आठवतं त्या बैठकीत त्यांच्याबरोबर नेहमी असणारे एकसंबाचे  स्वामी मात्र नव्हते ते योग शिक्षक होते आणि एका रस्त्या अपघातामध्ये त्यांचे निधन झालं होतं सिद्धेश्वर स्वामींच्या बरोबर थोडी चर्चा झाली आणि आम्ही निघालो त्यानंतर मात्र सिद्धेश्वर स्वामींची माझी भेट झाली नाही कोरोनाचा काळ होता त्यामुळे आम्ही लांबच राहिलो आणि आज या दुःखद बातमीने तत्त्वज्ञान क्षेत्रातला एक तपस्वी निघून गेला याचं मनस्वी दुःख आहे  अध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक व्याख्याते, प्रवचनकार आहेत पण  तत्त्वज्ञानाचा भरभक्कम वैचारिक आधार असणारे मात्र जवळजवळ नाहीत .ती उणीव सिद्धेश्वर स्वामी गेल्यानंतर भरून निघणे कठीण आहे .

सौजन्य  :- डॉ. सुभाष देसाई कोल्हापूर ९४२३० ३९९२९, संकलन महादेव मेंडगिरी  सातारा 

Monday, January 2, 2023

ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन.

 ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं

 सोमवारी वृद्धापकाळाने निधन.




ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं

 सोमवारी वृद्धापकाळाने निधन.


                                        


सातारा  दि. ३ :- रविंद्र वाकडे 

 ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी  यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन झालं. आपल्या वाणीने त्यांनी लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले. माणुसकीच्या विचारांनी भारावून टाकले. कशाचेही स्तोम नाहीअवडंबर नाही अशी त्यांची साधी राहणी होती. ते जसे उच्च पदस्थधनिकांना जवळचे वाटत तसेच गोरगरीबांनाही आपले वाटत. कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र सीमावर्ती भागात त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. ज्ञानयोगी आश्रमविजयपूर (कर्नाटक) येथील परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांचे काल रात्री देहावसन झाले. तत्वज्ञानाचे थोर अभ्यासकविचारवंत आणि महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या माणुसकीच्या विचारांचा प्रसारक आपल्यातून हरपले . शिवैक्य झाले .

कर्नाटक सरकारनं मंगळवार, 3 जानेवारीला विजयपुरा येथील शाळामहाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीये.कर्नाटक सरकारनं सिद्धेश्वर स्वामींचं अंतिम संस्कार राज्य सन्मानानं करण्याचा निर्णय घेतलाय. आजमंगळवारी संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वामीजींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसह कर्नाटक चे मुख्यमंत्री बोम्बई, अन्य नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार नाकारल्यानंतर स्वामीजी प्रकाशझोतात आले होते. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून माहिती दिली होती.


                                   


आज स्वामीजी देहरूपाने आपल्यात नाहीत पण त्यांनी कानडी भाषेत लिहिलेली पुस्तकेत्यांची रेकॉर्ड केलेली व्याख्याने आपल्यासोबत  कायम आहेत.हा आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहे. सिद्धेश्वर स्वामीजी  यांच्या निधनाने समस्त लिंगायत समाजातील बांधवांकडूनशोक व्यक्त केला जात आहे त्यांच्या निधनाने  समाजात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे .



वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही 'सिद्ध सजावट स्पर्धा' , घरबसल्या विजेत्यांना मिळणार हजारोंची बक्षिसे

 


वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही 'सिद्ध सजावट स्पर्धा' , घरबसल्या विजेत्यांना मिळणार हजारोंची बक्षिसे


वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही 'सिद्ध सजावट स्पर्धा' , घरबसल्या विजेत्यांना मिळणार हजारोंची बक्षिसे



सोलापूर दि २ :  प्रतिनिधी 

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी 'सिद्ध सजावट स्पर्धे'चे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            मागील दोन वर्षे  कोरोनामुळे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर निर्बंध आले होते. अशावेळी घरबसल्या भक्तांना सिद्धेश्वरांची भक्ती करता यावी, त्यांचे जीवन चरित्र समजून घेता यावे, त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय व्हावा तसेच भक्तांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी गेली दोन वर्षे 'सिद्ध सजावट स्पर्धा' घेण्यात आली होती. यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात होणार आहे. तरीही स्पर्धकांच्या मागणीनुसार यंदाही सिद्ध सजावट स्पर्धा घेण्याचे ठरले आहे.

          स्पर्धेसाठी सिद्धरामेश्वरांचे अध्यात्मिक आणि धार्मिक कार्य, सिद्धरामेश्वरांचे विचार, सिद्धरामेश्वरांचे समाजीक कार्य, सिद्धरामेश्वर यात्रेतील विधी, गड्डा यात्रा, सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, असे 5 विषय ठेवले आहेत. स्पर्धेसाठी एक अट आहे. ती म्हणजे घरामध्ये सिद्धेश्वर यांची प्रतिमा अथवा मूर्ती स्थापन करूनच त्यासमोर सजावट करावयाची आहे. 

          सदरहू स्पर्धा संपूर्ण कुटुंबासाठी असून सर्वांसाठी खुली आहे. 8 जानेवारी पर्यंत या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करता येईल. स्पर्धकांनी 9604045418, 9657096190 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी.

            स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस 15 हजार रु एम. के. फाउंडेशनतर्फे महादेव कोगनुरे यांच्यावतीने, द्वितीय बक्षीस 11 हजार रु स्व. बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ माजी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्याकडून, तृतीय बक्षीस 9 हजार रु कै. गीताई गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्मरणार्थ श्रीरंग महाराज औसेकर यांच्याकडून, चतुर्थ बक्षीस 7 हजार रु कै. रावसाहेब ढेपे यांच्या स्मरणार्थ प्रवीण ढेपे यांच्याकडून, पाचवे बक्षीस 6 हजार रु अजित खाडिलकर यांच्याकडून, सातवे बक्षीस 5 हजार रु कै. गंगाधर शेटे यांचे स्मरणार्थ शिवानंद शेटे यांच्याकडून, आठवे बक्षीस 4 हजार रु कै. टोपणप्पा कल्लूरकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर कल्लूरकर यांच्याकडून, नववे बक्षीस 3 हजार रु गिरजाबाई कल्लूरकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर कल्लूरकर यांच्याकडून तर उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची 5 बक्षिसे कै. बसवराज दुलंगे यांच्या स्मणार्थ आशिष दुलंगे यांच्याकडून दिली जाणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना स्व. धर्माजी भोसले यांच्या स्मणार्थ माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्याकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

           तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र कै. काशिनाथ दुलंगे यांचे स्मरणार्थ डॉ. अजित दुलंगे यांच्यावतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सोलापूरवासियांनी व समस्त सिद्धेश्वरभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी केले आहे.

         पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, सोमेश्वर याबाजी, विजय बिराजदार, राजेश नीला, बसवराज जमखंडी, सचिन विभुते आदी उपस्थित होते.

Tuesday, December 27, 2022

ग्लोबल बिझनेस काॅनक्लेव्ह चे बेंगलोर येथे 20 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजन

 

ग्लोबल बिझनेस काॅनक्लेव्ह  चे बेंगलोर येथे 20 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजन 



ग्लोबल बिझनेस काॅनक्लेव्ह  चे बेंगलोर येथे 20 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजन 



सातारा, दि.28 -  रविंद्र वाकडे.

  वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( VIA)वीरशैव लिंगायत समाजाच्या एकमेव अशा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनेच्या वतीने लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे व लिंगायत भुषण मा.सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली

 महाराष्ट्रात आतापर्यंत 8 बिझनेस एक्स्पो, व्यवसाय मार्गदर्शन शिबीरे, नोकरी मेळावे आयोजित केले गेले आहेत व आता महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी,शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, होतकरू तरुण, तरुणी यांच्यासाठी जगभरातील वीरशैव लिंगायत उद्योगपती,साॅफ्टवेअर कंपनीचे सीईओ,ॲग्री एक्सपर्ट , एज्युकेशन स्टार्टअप कंपनी या व इतर अनेक क्षेत्रातील दिग्गज उद्योजकांना भेटण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्या येत आहे.




 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनने आएलवायएफ,बसव समिती, वीरशैव समाज ऑफ अमेरिका,एआयव्हीएम,या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वीरशैव लिंगायत संघटनांना बरोबर घेऊन बेंगलोर येथे लिंगायत समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच  आंतरराष्ट्रीय बिझनेस समिटचे, बेंगलोर येथे शुक्रवार, दि 20 ,शनिवार 21 व रविवार दि. 22 जानेवारी 2023 रोजी आयोजण केले गेले आहे.* 


 यात जगभरातील प्रमुख अशा  उद्योजकांचे 300 स्टाॅल्स असणार आहेत व यातून एकमेकांना व्यापार करण्यासाठी मोठी बाजारपेठ व नवीन व्यावसायिक संधी निर्माण करून दिली जाणार आहे.


 या ऐतिहासिक व भव्यदिव्य अशा कार्यक्रमात सहभागी होणें साठी व अधिक माहितीसाठी कृपया मा.प्रदिप साखरे ,वर्किंग कमिटी,ग्लोबल बिझनेस काँनक्लेव,बेंगलोर मा.अध्यक्ष व्हाया युथवींग 9923610610 व मा. पी.आय.गुड्डिमठ, वर्किंग कमिटी,ग्लोबल बिझनेस कॉनक्लेव्ह बेंगलोर ,जनरल सेक्रेटरी ' व्हाया '9850441438 यांचेशी संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



या कार्यक्रमात मा.बाबासाहेब कल्याणी,डॉ.विजय संकेश्र्वर ,डॉ.अजयकुमार, डॉ. शामनुरू शिवशंकराप्पा,डॉ.प्रभाकर कोरे, मा.जगदिश शेट्टर, मा.लक्ष्मण सावदी, मा.मुर्गेश आर. निराणी , मा.अरविंद जत्ती, मा.ईश्वर खंद्रे, मा.एम.बी.पाटील, मा.आण्णासाहेब एस. जोल्ले, मा.शिवकुमार उडसी, मा.अरविंद बेल्लाद, मा.बी. वाय.विजयेंद्र, मा.ओमप्रकाश कोयटे, मा.सुनील रुकारी,नवीन कोट्टीगे, मा.संतोष केनचेंबा, मा.नेत्रावती चेन्नमा या मार्गदर्शकांचे  विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.**

पिंपरी चिंचवड व पुणे लिंगायत समाज आयोजित आगळावेगळा मोफत वधू-वर पालक मेळावा संपन्न

 

पिंपरी चिंचवड व पुणे लिंगायत समाज आयोजित आगळावेगळा मोफत वधू-वर पालक मेळावा  संपन्न.


 पिंपरी चिंचवड व पुणे लिंगायत समाज आयोजित आगळावेगळा मोफत वधू-वर पालक मेळावा  संपन्न.


सातारा, दि.27 - रविंद्र वाकडे.

 समस्त पिंपरी - चिंचवड व पुणे लिंगायत समाजातर्फे खास आगळा-वेगळा  मोफत वधू - वर पालक परिचय मेळावा व इंटरॅक्शन मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार दि.25.12.2022 रोजी सकाळी 10 ते संध्या.4 या वेळेत पार पडला.या वेळी सकाळी 10 ते 11 या वेळेत मोफत नाव नोंदणी करण्यात आली.त्यानंतर 11 ते 1 वधू - वर परिचय करून देण्यात आला. दु.1 ते 2 भोजन आयोजित करण्यात आले.त्यानंतर पुन्हा दु.2 ते 4 वधू - वर परिचय करून देण्यात आला.


पिंपरी - चिंचवड व पुणे लिंगायत समाजातर्फे खास आगळा-वेगळा  मोफत वधू - वर पालक परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ.अशोक नगरकर



या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.तसेच कोणत्याही पोटजातीचा विचार न करता सर्वजण एकाच छताखाली  एकत्र आले.वधू - वर किंवा पालक या पैकी कोणाही एकास उपस्थित राहण्याची परवानगी देवून कार्यक्रमात सुलभता आणण्यात आली.या कार्यक्रमाला कोणीही प्रमुख पाहुणे त्यांचे भाषण ,उपदेश अथवा संदेश यासाठी मौल्यवान वेळ वाया घालवण्यात आला नाही.मुलगा,मुलगी किंवा पालक यांनी स्वतः पुढे येवून स्वतःची  माहिती दिली. या सर्व परीचायासाठी केवळ 4 तासांचा वेळ देण्यात आला.सर्व जणांनी आपले परीचयपत्र  मोबाईल व्हॉट्सअप ग्रुपवर सरळ दाखल केले.दुपारी 1 ते 2 या वेळेत नाममात्र शुल्क रु.70 मध्ये कूपन योजनेप्रमाणे अनलिमिटेड भोजन व्यवस्था आयोजित करण्यात आली होती.एका रजिस्टर वही मध्ये सर्वांची नावे व पत्ता ,फोन नंबर्स सह नोंद केली जावून त्याचा फोटो व्हॉट्सॲप वर शेअर केला गेला. या सर्व उपस्थितांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जाऊन त्यावर सरळ बायोडाटा टाकण्यास परवानगी देण्यात आली.

हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या अशा मध्यवर्ती निसर्गरम्य पार्श्वभूमीवर श्री मल्लिकार्जुन मंदिर  हॉल,आकुर्डी स्टेशन जवळ,बिजली नगर पूला शेजारी ,आकुर्डी प्राधिकरण पुणे येथे आयोजित करण्यात आला.या ठिकाणी पार्किंग साठी प्रशस्त जागा उपलब्ध होती.मेळाव्याच्या विशेष माहितीसाठी डॉ.अशोक नगरकर 9823164918,श्री. चंद्रशेखर दलाल 9423239582,श्री.सुरेश वाळके 8698203488,श्री.सुरेश लिंगायत 9146091122,श्री.नरसिंह मुळे 9850160586,श्री.बसवराज कुल्लोळी,श्री.बसवराज कणजे ,श्री.दत्ता बहिरवाडे ,श्री.संतोष पताटे,श्री प्रकाश डिकोळे ,श्री.चंद्रशेखर खोचरे,श्री.संगमेश्वर शिवपुजे,श्री.भीमराव येरेगे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास श्री नागेश देगील,श्री.बालाजी पाटील,श्री.योगेश तोडकर यांनी विशेष सहकार्य केले.तसेच या कार्यक्रमाला समस्त लिंगायत समाज,पिंपरी - चिंचवड.श्री.मल्लिकार्जुन प्रतिष्ठान ,आकुर्डी.बसववादी सोशल फाउंडेशन,चिंचवड.भारतीय समतावादी पक्ष,बसव सेवा प्रतिष्ठान,सिंहगड रोड.लिंगायत सेवा मंडळ,हडपसर.राष्ट्रीय बसव दल,भोसरी,पुणे.बसव सेवा प्रतिष्ठान,सिंहगड रोड. म.बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठान,कात्रज.शिवयोगी प्रतिष्ठान , विश्रांतवाडी.लिंगायत समाज,आळंदी.लिंगायत समाज, तळेगाव - दाभाडे.लिंगायत परिषद ,पुणे,शिवयोगी प्रतिष्ठान ,धानोरी. म.बसवेश्वर प्रतिष्ठान,कात्रज,पुणे.लिंगायत सेवा मंडळ,हडपसर यांच्या भरघोस शुभेच्छा प्राप्त झाल्या.

 मागील व या मेळाव्यास उपस्थित असलेल्या सर्व ग्रुप मेंबर्स चे नाव व फोन नंबर यांचे एक बुकलेट तयार करण्यात आले असून,ते व्हॉट्स ॲप ग्रूप वर ॲड करण्यात आले आहे.त्याचा उपयोग सर्वांना होईल.सकाळी बरोबर 10.30 ला सुरू झालेला मेळावा संध्याकाळी 4.30 वा.संपला.या मेळाव्याला अतिशय अभूतपूर्व असे यश मिळाले.एकूण 700 मेंबर्सनी आपआपले बायोडाटे दाखल केले.अतिशय सुसूत्रपणे पालकांनी व उमेदवारांनी आपली नाव नोंदणी येथे केली.स्कॅन सिस्टीम द्वारे उमेदवाराला अतिशय कमी वेळात ग्रुप मध्ये ॲड करण्यात आले.सर्वांनी आपले बायोडाटे ग्रुप मध्ये तात्काळ दाखल करून हा पेपर लेस मेळावा संपन्न करण्यास मोठा हातभार लावला.

याच पद्धतीने सर्व कार्यक्रमामध्ये नाव नोंदणी झालेल्या क्रमांका नुसार प्रत्येक उमेदवार व पालक यांनी पुढे व्यासपीठावर येवून उत्कृष्ठ ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे आपली माहिती उपस्थित सर्वांसमोर सादर केली.ती उपस्थित सर्वांनी अतिशय शांत पणे ऐकून मोठे सहकार्य केले.

  या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच अगदी थोडक्यात मा. शिवाजी साखरे, मा.धोंडेराज माळी, मा.चंद्रशेखर दलाल, मा.नारायण बहिरवाडे  साहेब , मा.अण्णाराव बिराजदार साहेब, मा. सुरेशजी वाळके यांनी शुभेच्छा संदेश दिले.डॉ.अशोक नगरकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व सर्व मेंबर्सनी बायोडाटे कसे अपलोड करावेत तसेच कार्यक्रमाचे प्रयोजन - आयोजन व नियोजन यांची सखोल माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचा संपूर्ण दिवस मा. सुरेशजी लिंगायत यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचालन केले.तसेच शरण संगमेश्वर शिवपुजे,भीमराव येरगे, हंचे साहेब व इतर सर्व मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनापासून परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानापन्न असणाऱ्या शुभ रंगाच्या जगज्योती म.बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आला.ही मुर्ती इंजिनियर नरसिंह मुळे यांनी उपलब्ध करून दिली होती.तसेच त्यांनी या कार्यक्रमाचे डिजिटल बॅनर पण उपलब्ध करून दिले.या कार्यक्रमामध्ये सौ.अंकिता देगी ल,श्री.नागेश देगील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.' लिंगायत समाजातील पोटजात सोडा व लिंगायत जोडा ' या उक्तीप्रमाणे या दांपत्याने क्रांतिकारक विवाह करून सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

इंजिनीयर योगेश तोडकरी,नागेश देगील,अंकिता देगील,संगमेश्वर शिवपपुजे,भीमराव येरगे यांनी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंदणी करण्याची व्यवस्था अतिशय चोखपणे पार पाडली.त्यामुळे सर्वांचा' डेटा ' उपलब्ध झाला.लिंगायत समजातील प्रतिथयश व्यावसायिक श्री.धर्मगुत्ते सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे अनलिमिटेड स्वादिष्ट जेवण व चहा यांची व्यवस्था केवळ नाममात्र 70 रू.मध्ये कूपन सिस्टीम वर  उपलब्ध केली होती.त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळून  अतिशय शिस्तीत भोजन कार्यक्रम संप्पन्न झाला.या सात्विक रुचकर भोजनाचे सर्वांनी  खूप कौतुक केले.

या कार्यक्रमाचे काही निवडक फोटो व बुकलेट पीडीएफ फॉर्म मध्ये उपलब्ध करण्यात आले असून,त्याचा सुयोग्य वापर करून  सर्व पालक व वधू - वर यांचे फोन नंबर व माहिती उपलब्ध करून घेवून त्याद्वारे आपला विवाह योग जुळवावा अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली असून,हा एक सामाजिक सद्भावना या दृष्टिकोनातून केला गेलेला एक स्तुत्य प्रयत्न आहे.असे डॉ.अशोक नगरकर यांनी जाहीर करून या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.**

Sunday, December 25, 2022

शिखर शिंगणापूर येथील कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळ्याचा भूमीपूजन समारंभ संपन्न

  शिखर शिंगणापूर येथील कोटी  लिंगार्चन  व लक्ष भोजन सोहळ्याचा भूमीपूजन समारंभ  संपन्न 




शिखर शिंगणापूर येथील कोटी  लिंगार्चन  व लक्ष भोजन सोहळ्याचा भूमीपूजन समारंभ  संपन्न 




सातारा, दि.26  -  प्रा.अजय शेटे.

    तीर्थक्षेत्र फाऊंडेशन तर्फे शिखर शिंगणापूरच्या पावन भूमी मध्ये महाशिवरात्र पर्वकाळ गुरूवार दि.16 फेब्रुवारी ते  सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी कोटी लिंगार्चन व लक्षभोजन सोहळा आयोजित केला गेला आहे.या भव्य सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ रविवार दि.25.12.2022 रोजी दु.1 ते 4 या वेळेत विविध संत महात्म्यांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला .


                              

हा भूमीपूजन समारंभ प. पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी ,श्री काशी महापीठ ,वाराणसी यांच्या शुभहस्ते संप्पन्न झाला .यावेळी त्यांच्या समवेत प.पू. श्री ष ब्र 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज ( मठाधिपती शिखर शिंगणापूर ), प.पू.श्री. व. ब्र .108 सद्गुरू महादेव शिवाचार्य स्वामीजी,वाई (वाईकर महाराज) पू.श्री. ष. ब्र.108 पद्म भास्कर डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज ,तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान , धारेश्वर मठ , धारेश्वर.श्री. प. ब्र.108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान, बेळंकी. (बेळंकीकर महाराज ), प.पू.मन्ना महाराज या  वीरतपस्वी व तपोरत्न महाराज यांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला.

                                  


प.पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्र्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रथमच श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर नगरी मध्ये आगमन झाल्या मुळे भव्य मिरवणूक व शोभायात्रा  आयोजित करण्यात आली व त्यांच्या हस्ते श्री शंभू महादेवास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर  'उमाबन ' येथील प्रशस्त जागेत भूमीपूजन करण्यात येवून कुदळ मारण्यात आली.  श्री.मोहन बडवे , मा.अध्यक्ष ,तीर्थक्षेत्र फाउंडेशन , मा. शेखरजी मुंदडा , मा.स्वागताध्यक्ष कोटी लिंगार्चन सोहळा ,समस्त वीरशैव लिंगायत समाज ,शिखर शिंगणापूर व समस्त ग्रामस्थ शिखर शिंगणापूर,श्री.मंदार बडवे,चिन्मय बडवे ,नागेश बडवे,अक्षय महाराज भोसले,आनंद कुलकर्णी,बाळासाहेब खाडे,वीरभद्र कावडे,  शितल बडवे  , अनिल बडवे,शिवकुमार शास्त्री , संदिप खाडे यांनी कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केले होते.सर्वांचा अतिशय यथोचित असा सत्कार करण्यात आला.

श्री प.पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर स्वामी महाराज यांनी सर्व पंचाचारा मधील जंगम पूजन व त्याचे महात्म्य अतिशय अभ्यासपूर्ण व ज्ञानपूर्ण रितीने कथन केले.


                                 


यानंतर जगद्गुरु मल्लिकार्जुन महास्वामीजी आपल्या भाषणात  म्हणाले की,तीर्थ क्षेत्र फाउंडेशन,शिखर शिंगणापूर यांनी या कार्यक्रमाचे खूप मोठे धनुष्य पेलले आहे.एखादे चांगले काम करताना अनेक समस्या उभ्या राहतात.परंतु येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करण्याचे बळ श्री शंभू महादेव देईल.या सोहळ्यासाठी पूजन करण्यात येणाऱ्या प्रत्येक  'कंकर ' मध्ये श्री शंकर वसलेले असून,हे सर्व एक कोटी ' कंकर ' हे पवित्र अशा नर्मदा नदी मधून प्राप्त केले आहेत.त्याचे पूजन करण्याचे भाग्य अनेक भाग्यवान दाम्पत्यांना मिळणार आहे.शिवाय यावेळी लक्ष भोजन अन्नदान करण्यात येणार आहे.हे सर्वात मोठे पुण्याईचे काम आहे. याआधी असा कार्यक्रम फक्त कर्नाटक राज्यात झाला होता.परंतु तो सर्व प. पू.महाराज यांनी आयोजित केला होता.मात्र हा येथील कार्यक्रम हा सर्वसामान्य अशा सर्व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला असून,याचे महत पुण्य सर्वांनी प्राप्त करून घ्यावे.

शिंगणापूर पोलीस स्टेशन चे पोलीस सब इन्स्पेक्टर मा.भुजबळ साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवला होता .

या कार्यक्रमाला प्रा.नागनाथ स्वामी,  नंदकुमार खोत,गुरुलिंग स्वामी, लिंगराज साखरे,दिलीप ढोले, गुरुलींग तोडकर,अविनाश तोडकर,बसवेश्वर येवले,राजेंद्र शेटे,रविंद्र गाडवे , सुरेश म्हामणे श्रीकांत म्हामणे,सागर म्हामणे,उमेश कुलकर्णी व हजारो स्त्री - पुरुष भाविक भक्त हजर होते.


नव्या संसद भवनाला ' अनुभव मंटप अथवा बसवमंटप ' नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी , पंतप्रधानांना निवेदने पाठवा - डाॅ.बसवराज बगले

 

नव्या संसद भवनाला ' अनुभव मंटप अथवा बसवमंटप ' नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी , पंतप्रधानांना निवेदने पाठवा - डाॅ.बसवराज बगले 




नव्या संसद भवनाला ' अनुभव मंटप अथवा बसवमंटप ' नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी , पंतप्रधानांना निवेदने पाठवा - डाॅ.बसवराज बगले 

           


     सोलापूर दि  25   :-  प्रतिनिधी 

 जगातील पहिल्या लोकशाही संसदेची मुहूर्तमेढ क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी केली. म्हणून दिल्लीत नव्याने निर्माण केलेल्या संसद भवनाला " अनुभव मंटप अथवा बसवमंटप " असे नामकरण करण्यात यावे,अशी मागणी देशातील सर्व समाजबांधवांनी आणि संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी असे आवाहन डाॅ.बसवराज बगले (सोलापूर ) यांनी केले आहे.




          बाराव्या शतकात म्हणजे हजारो वर्षांपूर्वी लोकशाही मूल्ये जपणाऱ्या निधर्मी समाज रचनेचा आरंभ 'अनुभव मंडपाच्या " रूपाने करून महात्मा बसवेश्वरांनी जगासमोर सर्वप्रथम एक आदर्श ठेवला.म्हणूनच ते जगातील " पहिले महात्मा " ठरले. मंगळवेढा प्रांतातील बिज्जळ राज्याचे प्रधानमंत्री झाल्यानंतर अनुभव मंटप या नावाने लोकशाही संकल्पनेचा शुभारंभ त्यांनी केला.सर्व धर्मियांना एकत्र करून निधर्मी तत्त्वज्ञानाची बीजे रोवली.जातीभेद नष्ट करण्याची समाजरचना मांडली,त्याच तत्वानुसार आज लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.

            अशा युगप्रवर्तकांचा वैचारिक ठेवा भविष्यात सदैव स्मरणात राहण्यासाठी दिल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाला अनुभव मंटप अथवा बसवमंटप असे नामकरण झाले पाहिजे.यासाठी कर्नाटकातून खूप मोठ्या प्रमाणात उठाव सुरू झाला आहे.त्याची सुरूवात बसव तत्व प्रसारक धर्मगुरूंनी केली आहे.महाराष्ट्र,आंध्र, तेलंगणा,गोवा राज्यात खूप मोठ्या प्रमाणात वीरशैवांतील अठरापगड समाज बांधवासह लिंगायत आणि बसवप्रेमींकडून याबाबत पाठपुरावा होणे ही काळाची गरज आहे.      

              त्यासाठी समाजातील बसवप्रेमीं संघटनांनी आपली निवेदने पंतप्रधान कार्यालयास पाठवावीत.सर्व पक्षीय खासदार,आमदार,सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि ग्रामशाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहाराची मोहीम गतीमान करावी. असे आवाहन महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी केले आहे.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...