Wednesday, September 21, 2022

मधुबन ॲग्री टुरिझम & थ्री डी पार्क ची लाईफ टाइम मेंबरशीप योजना सुरू ,हि ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठीच आहे .


मधुबन ॲग्री टुरिझम & थ्री डी पार्क ची लाईफ टाइम मेंबरशीप योजना सुरू ,हि ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठीच आहे .



मधुबन ॲग्री टुरिझम & थ्री डी पार्क ची लाईफ टाइम मेंबरशीप योजना सुरू ,हि ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठीच आहे .



       
सातारा, दि. 22 - प्रा अजय शेटे 

 निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न शुद्ध वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी ठाराविक दिवस सहकुटुंब  या पर्यटन केंद्रावर येवून येथील सर्व सुविधांचा  मनमुराद आनंद आता नाममात्र  फी मध्ये लाइफटाइम मेंबरशीप घेण्याची सोय आता मधुबन ॲग्री टुरिझम व थ्री डी पार्क,कराड - चिपळूण रोड, नाडे (पूर्व ), ता.पाटण येथे  नव्या ने प्रथमच

उपलब्ध करण्यात आल्याची माहिती या केंद्राचे संचालक मा. विक्रम पवार  सौ माधवी पवार यांनी जाहीर केले आहे.




या पार्क मध्ये सकाळी 10 ते 4 या वेळेत विविध सुविधांचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. नवीन पॅकेज योजनेनुसार कोणत्याही विवाहित दाम्पत्याला रू.एक लाख,दहा हजार,एकशे ,अकरा रुपये मध्ये कायमस्वरूपी दर वर्षाला  सात दिवस या पार्क मधील सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

यामध्ये  सर्व सोयींनी युक्त सुसज्ज निवास व्यवस्था नाष्टा,चहा,जेवण, मुझिकल रेन डान्स,पशू - पक्ष्यांचे सानिध्य,जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती,स्विमिंग टँक,थ्री डी अँम्पी थियेटर, लहान मुलांसाठी गार्डन खेळणी व विहार ,किल्ल्यांच्या प्रतिकृती

अशा सुविधा सलग उपलब्ध आहेत.

येत्या दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तावर  ॲडव्हांस बुकिंग करणाऱ्या दांपत्यास या योजनेच्या रकमेत  खास पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे.तसेच ग्रुप बुकिंग साठी पण  खास विशेष सवलत उपलब्ध होणार आहे.शिवाय ही मेंबरशिप बुकिंग योजना फक्त पन्नास दाम्पत्य जोडीसाठीच उपलब्ध आहे.तेव्हा सर्व हौशी पर्यटकांनी त्वरित आपले ॲडव्हांस बुकिंग करावे.




         तसेच नेहमीच्या पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना या सर्व सुविधांचा लाभ हा  प्रत्येक दिवसासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी 4 या वेळेत मोठ्या स्त्री - पुरुष व्यक्तीस रू.पाचशे व दहा वर्षाच्या आतील मुलामुलींना रू.चारशे मध्ये घेता येणार आहे.

तरी सर्व पर्यटकांनी तातडीने संपर्क क्रमांक,9823540239. प्रा . अजय शेटे यांच्या मोबाईल ला संपर्क करून   अधिक माहिती जाणून घ्यावी असे पार्क व्यवस्थापन तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

शालेय सहली साठी सुद्धा हा पार्क उपलब्ध असून,एका वेळी अनेक व्यक्तींची सोय उपलब्ध होऊ शकेल.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

Life time मेंबर साठी खास ऑफर  घटस्थापनेच्या दिवसात फक्त 25,000 रु भरून आपली मेंबर शिप बुक करा उर्वरित रक्कम भरणे साठी 1 महिना , मुदत  मिळेल . ही सवलत ठराविक कालावधी साठी उपलब्ध आहे नवरात्री मधील फक्त 9 दिवसच या योजनेचा लाभ घेता येईल

-----------------------------------------------------------------------------------------------------------

तसेच वर्षातील 7 दिवस मेंबर व्यक्ती यांनी सध्याच्या दराने विचार केल्यास मेंबरशिप घेणाऱ्यांना दर वर्षी रू.21000/- लाभ मिळणार आहे आणि ही लाभाची रक्कम दरवर्षी वाढतच जाणार आहे.तसेच मेंबरशिप घेणाऱ्या व्यक्तीस या पार्क मध्ये कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन केल्यास 10  % टक्के विशेष सवलत पण मिळणार आहे.  अधिक माहितीसाठी वर दिलेल्या मोबाईल नो ला संपर्क साधावा.

वडूज विभाग संपर्क

  प्रा . अजय शेटे   :- 9823540239.







Monday, September 19, 2022

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये 100 बालकांवर मोफत हदय शस्त्रक्रिया रत्नागिरीतील आरोग्य शिबिराचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंतांच्या हस्ते उद्घाटन


डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये 100 बालकांवर मोफत हदय शस्त्रक्रिया
रत्नागिरीतील आरोग्य शिबिराचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंतांच्या हस्ते उद्घाटन



डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये 100 बालकांवर मोफत हदय शस्त्रक्रिया
रत्नागिरीतील आरोग्य शिबिराचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंतांच्या हस्ते उद्घाटन
सातारा  दि .19 :- प्रा .अजय शेटे 

  शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व वाडिया हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने काल व आज दोन दिवस लहान बालकांच्या हृदयाच्या छिद्रांच्या शस्त्रक्रियांचे महाआरोग्य शिबिर रत्नागिरी येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. 
---------–---------------///-/------------------
मुख्यमंत्र्यांच्या नावे वैद्यकीय सेवेतील कामाचा जागतिक विक्रम होवू शकतो व याच असंख्य रुग्णांच्या आशिर्वादानेच त्यांना चोवीस तास काम करण्याची ऊर्जा मिळते- ना.उदय सामंत
---------------------------------------------------
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी मतदारसंघाचे भूमिपुत्र ना.उदयजी सामंत साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी, वाडिया हॉस्पिटलचा समूह व वैद्यकीय मदत कक्षाचा संपूर्ण समूह यावेळी उपस्थित होता. यापूर्वी अशा प्रकारे लहान बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत करण्याचे शिबिर मुख्यमंत्री ना.शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये झाले होते. त्यानंतर द्वितीय वेळेला ते ना.सामंत साहेबांच्या आग्रहाखातर रत्नागिरीमध्ये पार पडले. यापुढे देखील अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमध्ये खंड पडू देऊ नका, हे देखील मंत्री महोदयांनी आवर्जून सांगितले. ठाण्यामध्ये ज्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर व मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल ही दोन्ही रुग्णालय नो कॅश काऊंटर झालेली आहेत. त्याप्रमाणे नो कॅश काऊंटर असलेलं रुग्णालय देखील पुढच्या दोन महिन्यात आम्ही रत्नागिरीमध्ये सुरु करु असा शब्द मंत्री महोदयांनी दिला. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी जात,पंथ,पक्ष सर्वकाही बाजूला ठेवून आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं कार्य महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील उभं केलेलं आहे.




 त्यामुळे हा नेता सर्वसामान्यांना आपलासा वाटतो आहे‌‌. हीच आमची ताकद आहे. ना.शिंदे साहेबांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा जागतिक विक्रम होवू शकतो व हीच ऊर्जा त्यांना 24 तास काम करण्यासाठी पुरेशी ठरते असे देखील ना.सामंतांनी आवर्जून नमूद केले. वैद्यकीय क्षेत्रातील आर्थिक अडचणींमुळे अनेकांची संसार उध्वस्त झालेली अनेक उदाहरणे आहेत. परंतु त्यांना मदत करणाऱ्यांची संख्या मात्र तुरळक आहे, हे वास्तव आहे. मात्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सेवा परमो धर्म‌: या वृत्तीने सर्वार्थाने कार्य करतो आहे, ही आनंदाची बाब आहे. मंगेश चिवटे हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या वैद्यकीय सेवेचा देखील  आम्हाला अभिमान आहे. रत्नागिरी हे मुख्यमंत्री महोदयांचे आवडते ठिकाण आहे. यामुळे रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासाकरिता मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे जे शक्य होईल ते ते सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहोत हे देखील ना. सामंत साहेबांनी जाहीर केले.



 प्रास्ताविक करत असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी ना.शिंदे साहेब व ना.सामंत साहेब यांची मैत्री कशाप्रकारे आहे हे स्पष्ट केले. विविध सामाजिक संस्थांचे संचालक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. जनहितास्तव शासनाकडून त्यांच्या काही अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांचा सकारात्मक पद्धतीने विचार करत लवकरात लवकर ती सर्व कामे मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून व ना.सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले जातील असे देखील चिवटे यांनी अश्वस्त केले. कार्यक्रमाच्या उत्तम नियोजन - आयोजनासाठी ‌अधिका-यांनी खूप मेहनत घेतली. याबद्दल त्यांचे देखील विशेष अभिनंदन मान्यवरांनी केले.



Friday, September 16, 2022

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 72 व्या  वाढदिवसानिमित्त  हार्दिक शुभेच्छा .



मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 72 व्या  वाढदिवसानिमित्त  हार्दिक शुभेच्छा .



सातारा, दि.17 - प्रा.अजय शेटे.

        कुठलेही राज्य,देश हा मजबूत, बळकट तेव्हाच होतो जेव्हा तेथील पोशिंदा हा भक्कम असेल,त्याची धुरा ही सुनियंत्रीतपणे जबाबदार व्यक्तीकडून सांभाळल्या जात असतील. मला सांगायला आनंद होतो. 26 मे 2014 रोजी आपल्या देशाची धुरा ही अशाच योग्य व्यक्ती च्या हाती आली ती त्यांच्या संस्कृती, संस्कार, पक्ष ह्या वरील अढळ निष्ठेमुळेच,विश्वासामुळे.




           26 मे 2014 रोजी आपल्या भारताला खंबीर नेतृत्व लाभले.पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी ह्यांची नेमणूक झाली. मोदीजी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि 26 मे 2014  पासून स्वतंत्र भारताचे 15 वे पंतप्रधान आहेत. ते 7 ऑक्टोबर  2001 पासून 22 मे 2014 पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्या नंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.





      बऱ्याच वर्षांनंतर भारताला असे चतुःरस्त्र व्यक्तीमत्वाचे नेतृत्व लाभले आहे. आज राजकारण सोडून मोदीजींच्या उर्वरित सुप्त गुणांबद्दल विचार करुया.

         मोदीजींनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी ह्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. खरोखरच चेष्टा नव्हे आपले योग्य विचार, प्रस्ताव हे तब्बल 175 देशांनी स्विकारणे. आपले म्हणणे समस्त देशांना पटवून सांगणे व त्यांना त्यावर अंमल करावासा वाटायला लावणे.



         प्रत्येक व्यक्ती ला आपण स्वतः खूप आवडतं असतो,आणि असं आवडायलाच पाहिजे. खरी खासियत म्हणजे आपण लोकांना, इतरांना आवडणं,ते खूप कठीण असतं.व्यक्ती निरनिराळ्या कारणांमुळे आवडते तिच्या सौंदर्यामुळे, व्यक्तीमत्वामुळे .आवडणं एकवेळ सोप्पं पण लोकप्रिय होणं कर्मकठीण. ह्यासाठी चांगले कार्य, स्वार्थाचा त्याग लागतो. मोदीजींची अजून एक खासियत म्हणजे त्यांना लोकांमध्ये राहायला, मिसळायला,त्यांची मते जाणून घ्यायला आवडतं.त्यांचा जनसंपर्क अफाट आहे.तसचं ह्या साठी अत्यावश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान शिकून आत्मसात करून त्याचा सराईतासारखा वापर करणे हे पण अतिशय कौतुकास्पद. वय,व्यस्त दिनचर्या ह्या सारख्या कुठल्याही सबबी त्यांच्या कडून कोणीच कधीच ऐकल्या नाहीत.लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादाचीही ते जोड देतात. भारताचे सर्वाधिक टेक्नो-सॅव्ही नेते म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी ते वेबचा वापर करतात. फेसबुक, ट्विटर, गुगल, इन्स्टाग्राम, साउंड क्लाउड,लिंकडीन,वेबो ह्यासारख्या सोशल मिडीयावर ते खूप सक्रिय आहेत आणि ते ही संपूर्णपणे अभ्यासानिशी तयारी करून. जुलै 2015 रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक आणि अधिकाधिक वापर करणारी ही योजना आहे.अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची चाके जलद गतीने फिरतील आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील हा दूरवरचा विचार ते करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली  2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी ‘स्वच्छ भारत अभियान' सुरू केल्या गेले  जी संपूर्ण देशात स्वच्छतेसाठी एक जनजागृती चळवळ ठरली.


         कुठल्याही देशाचा उत्तरोत्तर विकास हा तेव्हाच होतो जेव्हा आपला देश इतर देशांच्या संपर्कात असतो,त्यांच्या विविध उपक्रमांचा एक हिस्सा बनतो. आणि नेमकी हीच गोष्ट मोदीजीं सारख्या चाणाक्ष नेत्याने ओळखली.त्यामुळे आपले विचार, विविध योजना ह्या सोशल मिडीयाचा योग्य भरपूर वापर करुन अख्ख्या जगासमोर आणण्याचे तंत्र आणि श्रेय हे मोदीजींकडे जातं.

      नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित निर्णयांमुळे जागतिक व्यासपीठावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची खरी क्षमता आणि भूमिका समोर आली आहे. त्यांनी सार्क देशांच्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणाची जगभरात प्रशंसा झाली. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी 17 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नेपाळचा, 28 वर्षांनंतर ऑट्रेलियाचा, 31 वर्षांनंतर फिजीचा आणि 34 वर्षांनंतर सेशेल्सचा दौरा केला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, सार्क आणि जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहिले, जिथे विविध जागतिक, आर्थिक आणि राजकीय मुद्यांवरील भारताच्या भूमिकेची आणि मतांची व्यापक प्रमाणात प्रशंसा झाली. त्यांच्या जपान दौऱ्यामुळे भारत-जपान संबंधांचे नवीन पर्व सुरू झाले. मंगोलियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनले आणि त्यांचा चीन आणि दक्षिण कोरियाचा दौरा भारतात गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. त्यांच्या फ्रान्स आणि जर्मनी दौऱ्यादरम्यान युरोपबरोबर त्यांची सातत्यपूर्ण चर्चा सुरू असल्याचे जाणवले.अरब राष्ट्रांशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यावर मोदी यांनी भर दिला.ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी आखाती देशांचा दौरा केला. आखाती देशात 34 वर्षांत दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. आखाती देशांशी आर्थिक संबंध बळकट करण्यावर त्यांनी या दौऱ्यात भर दिला. जुलै 2015 मध्ये मोदी यांनी पाच मध्य आशियाई देशांचा दौरा केला. त्यांचा हा दौरा अनेक दृष्टीनं यशस्वी आणि आदर्श असा मानला जातो.  ऊर्जा, व्यापार, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण करारांवर या दौऱ्यादरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या. ह्याबरोबरच अनेक देशांच्या लोकप्रतिनिधींनाही आपल्या देशात त्यांनी सन्मानपूर्वक निमंत्रित केले. ह्यामुळे या सर्व देशांबरोबर भारताचे सहकार्य सुधारण्यास मदत झाली. भारत आणि अमेरिका संबंधांच्या इतिहासात प्रथमच 2015 च्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.




ऑगस्ट 2015 मध्ये भारताने प्रशांत द्वीपसमूह राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले. प्रशांत द्वीपराष्ट्रांमधील महत्वाचे नेते या परिषदेत उपस्थित होते. भारत आणि प्रशांत द्वीपराष्ट्रांमधील महत्वाच्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

           गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्र ह्या विषयात त्यांनी एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले.

राजकारणाव्यतिरिक्त नरेंद्र मोदींना लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात कवितांचाही समावेश आहे.




        अशा व्यक्ती आपल्या सगळ्यांसाठीच आदर्श आणि दीपस्तंभ असतात. सध्या जरा महाराष्ट्रामधून मोठमोठे प्रकल्प हातातून अलगद निसटल्यासारखे काढता पाय घेतात आहे.परंतु मोदीजींनी महाराष्ट्राला एक मोठ्ठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिलेले आहेत.आणि ह्या आधीही त्यांनी जी जी काही आश्वासन दिलेली होती ती त्यांनी पूर्ण केलेली असल्याने त्यासारखेच हे पण आश्वासन ते नक्कीच पूर्णत्वास नेतील.



अशा या भारताच्या वैश्विक पंतप्रधानास 72 व्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा .**




Thursday, September 15, 2022

गौरीशंकर स्वामी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

 

                                                                    दुःखद निधन

          गौरीशंकर स्वामी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन .



             गौरीशंकर स्वामी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन .



लातूर  दि १६ :-   प्रतिनिधी

 येथील पाचशे घर मठाचे तत्कालीन पुजारी गौरीशंकर लिंगया स्वामी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता आल्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वीरशैव लिंगायत स्मशानभूमी, लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लातूर येथील पाचशे घर मठाजवळ राहणारे गौरीशंकर लिंगायत स्वामी यांनी पाचशे घर मठ संस्थानचे पुजारी विश्वस्त म्हणून वीस ते पंचवीस वर्ष सेवा केली. मागील काही वर्षापासून वयोमानानुसार त्यांनी मठसंस्थांच्या सेवेतून सेवानिवृत्ती घेतली होती. ते धार्मिक वृत्तीचे, कायम हसरे, मन मिळाऊ वृत्तीचे होते. ते आपल्या घरी सायंकाळच्या वेळेला बसलेले होते. यावेळी अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री  10.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर वीरशैव लिंगायत स्मशानभूमी, लातूर येथे शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता मामी, मुलगा नागेश, सून, नातू नाती असा मोठा परिवार आहे.ते शिवाजी विद्यालयाचे सहशिक्षक विकास स्वामी आणि पत्रकार वैभव स्वामी यांचे मामा होते. स्वामी परिवारावर कोसळलेल्या दुःखात दैनिक समर्थ राजयोग परिवार सहभागी आहे.

शेतकऱ्यांचा २५ टक्के अग्रीम पीकविमा अखेर मंजूर,कैलास येसगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आले यश.

 शेतकऱ्यांचा २५ टक्के अग्रीम पीकविमा अखेर मंजूर,कैलास येसगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आले यश.



शेतकऱ्यांचा २५ टक्के अग्रीम पीकविमा अखेर मंजूर,कैलास येसगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आले यश.



देगलूर( दि.१६) तालूका प्रतिनिधीः महादेव उप्पे

 खरीप पिकांच्या सुरूवातीला संपूर्ण महिनाभर झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आँगष्टमध्ये झालेला पावसाचा खंड यामुळे सोयाबीन, कापूस, तूर या प्रमुख पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. खरीप सिझन हेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मोठे साधन असते. पण खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांमध्ये असंतोष व हतबलता वाढत होती. अशा परिस्थितीत शेतकरी नेते तथा पीकविमा प्रश्नाचे अभ्यासक कैलास येसगे कावळगावकर यांनी पुढाकार घेत प्रथम महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांची भेट घेऊन देगलूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीसोबत केलेल्या विमा करारातील तरतूदीप्रमाणे २५ टक्के अडव्हान्स पीकविमा तात्काळ वितरीत करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली.तदनंतर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन या मागणीचा पाठपुरावा केला.पत्रकार,सोशल मिडीया व इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने २५ टक्के अग्रीम रक्कम मंजूर करण्याची मागणी लावून धरली. अन् जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अखेर बुधवारी २५ टक्के अग्रीम रक्कम वितरीत करण्याची अधिसूचना काढली.

      या अधिसूचनेमुळे नुकसानीच्या २५ टक्के पीकविमा देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार असले तरी ते पुरेसे नाही. आता नुकसानीच्या प्रमाणात पीक काढणी पश्चात जास्तीचा पीकविमा व वाढीव शासकीय मदत मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी माहिती कैलास येसगे यांनी दिली.




राष्ट्रसंतांच्या भक्तीस्थळाचा सर्वांगीण विकास करणार..परिवहन भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांचे प्रतिपादन..!

 राष्ट्रसंतांच्या भक्तीस्थळाचा सर्वांगीण विकास करणार..परिवहन भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांचे प्रतिपादन..!



राष्ट्रसंतांच्या भक्तीस्थळाचा सर्वांगीण विकास करणार..परिवहन भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांचे प्रतिपादन..!




 देगलूर दि ११ :- प्रतिनिधी  शिवकुमार कल्याणी: 

लिंगैक्य राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे समाधी स्थळ म्हणजेच भक्तीस्थळाचा सर्वांगीण विकास करणार असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले याबाबत अधिक माहिती अशी कि राष्ट्रसंत माऊलींचे कार्य मला जवळून माहीत असल्याचे सांगून, स्वातंत्र्य लढ्यात पंजाबच्या प्रांतांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य केल्याचे सांगत, त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची पताका , महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, आणि इतर राज्यांमध्ये पसरली आहे ,आणि म्हणूनच राष्ट्रसंतांच्या भक्तीस्थळाचा केंद्र शासनाच्या वतीने  सर्वांगीण विकास करणार व भक्तीस्थळ ते कपीलाधार या महामार्गास श्री संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग असे नाव देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ, वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी (आभासी पटलाद्वारे) व्हिडिओ कान्फरेंन्सच्या माध्यमातून केले,




स्थानिक स्वराज्य संस्थेत लिंगायतांना सत्तेत चांगला वाटा द्यावा अन्यथा समाजाच्या एकजुटीने 100 सदस्य निवडून आणू , प्रा.सुदर्शनराव बिरादार.

 

स्थानिक स्वराज्य संस्थेत लिंगायतांना सत्तेत चांगला वाटा द्यावा अन्यथा समाजाच्या एकजुटीने 100 सदस्य निवडून आणू , प्रा.सुदर्शनराव बिरादार.


स्थानिक स्वराज्य संस्थेत लिंगायतांना सत्तेत चांगला वाटा द्यावा अन्यथा समाजाच्या एकजुटीने 100 सदस्य निवडून आणू , प्रा.सुदर्शनराव बिरादार.



लातूर  दि :- प्रतिनिधी शिवकुमार कल्याणी 

  लिंगायत महासंघाच्यावतीने टिपराळ ता.शिरूर अनंतपाळ येथे लिंगायत समाज मेळाव्याचे आयोजन गुरूवार दि.8 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.बिरादार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेत लिंगायत समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात चांगला वाटा द्यावा. अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका या निवडणूकीत लिंगायत समाजाच्या एकजुटीने 100 च्या वर सदस्य निवडून आणू.

ते पुढे म्हणाले लिंगायत समाजाच्या मताचा फायदा प्रत्येक राजकीय पक्षाने घेतला. पण लिंगायत समाजाला न्याय देताना प्रत्येक पक्षाने आपला हात आखडता घेतला. त्यामुळे मागील नगर पंचायतीच्या निवडणूकीवेळी समाजाने असे ठरविले होते की, कोणत्याही पक्षातून समाजाचा उमेदवार निवडणूक लढवित असल्यास त्याला निवडून द्यायचे. त्याचा परिणाम असा झाला 4 नगर पंचायतीच्या निवडणूकीत 68 नगरसेवकापैकी 34 नगरसेवक लिंगायताचे निवडून आले. 2 नगराध्यक्ष, 3 उपनगराध्यक्ष, कमिटीचे सभापती व स्विकृत सदस्य एवढी संख्या निवडून आली. आता होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय पक्षांनी न्याय भुमिका घेतली नाही तर लिंगायत समाजाच्या एकजुटीच्या माध्यमातून 100 च्या वर सदस्य निवडून आणू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.




याबरोबरच राजकीय पक्षांना त्यांनी विनंती केली ठराविक घराण्याला पदे देवून लिंगायतांना पदे दिली असे समजुन सर्वसामान्य लिंगायतांवर अन्याय केल्यास त्याचा परिणाम पक्षांना भोगावा लागेल असा इशाराही प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी दिला. लिंगायत महासंघ ही समाजाच्या प्रश्‍नावर आवाज उठविणारी संघटना असून लिंगायतांना आरक्षण मिळेपर्यंत संघटना लढा देतच राहील. या कार्यक्रमात लिंगायत महासंघाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत कालापाटील यांचा तर जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल कमलाकर डोके, काशीनाथ मोरखंडे यांची जिल्हा संघटकपदी, गणेश पटणे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी,  प्रा.डॉ.पंडीत देवशेट्टे, करीबसवेश्‍वर पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व जिल्हा कार्यकारिणीच्या सर्वच मार्गदर्शक पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष शंकरे, नवनाथ डोंगरे, गणेश पटणे, कमलाकर डोके व प्रा.सुदर्शनराव बिरादार आदिंची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी लिंगायत महासंघाचे निलंगा तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, रेणापूर तालुकाध्यक्ष राजेश्‍वर उकीरडे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, अहमदपूर तालुकाध्यक्ष महेश भिंगोले, चाकुर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, गजानन पाटील, कपील माकणे, अशोक काडादी, एन.आर.स्वामी, रामेश्‍वर तेली, प्रा.महेश धोंडीहिप्परगेकर, उदगीर शहराध्यक्ष सुभाष शेरे, विश्‍वनाथ सावळे स्वामी, संगय्या स्वामी, विजय बापटले, संयोजक लिंगेश्‍वर बिरादार, त्र्यंबक बिरादार, संग्राम बिरादार, विठ्ठलराव पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर, ग्रामस्थ व परिसरातील समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार विठ्ठलराव पाटील यांनी मानले.




लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...