मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .
मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .
सातारा, दि.17 - प्रा.अजय शेटे.
कुठलेही राज्य,देश हा मजबूत, बळकट तेव्हाच होतो जेव्हा तेथील पोशिंदा हा भक्कम असेल,त्याची धुरा ही सुनियंत्रीतपणे जबाबदार व्यक्तीकडून सांभाळल्या जात असतील. मला सांगायला आनंद होतो. 26 मे 2014 रोजी आपल्या देशाची धुरा ही अशाच योग्य व्यक्ती च्या हाती आली ती त्यांच्या संस्कृती, संस्कार, पक्ष ह्या वरील अढळ निष्ठेमुळेच,विश्वासामुळे.
26 मे 2014 रोजी आपल्या भारताला खंबीर नेतृत्व लाभले.पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी ह्यांची नेमणूक झाली. मोदीजी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि 26 मे 2014 पासून स्वतंत्र भारताचे 15 वे पंतप्रधान आहेत. ते 7 ऑक्टोबर 2001 पासून 22 मे 2014 पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्या नंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
बऱ्याच वर्षांनंतर भारताला असे चतुःरस्त्र व्यक्तीमत्वाचे नेतृत्व लाभले आहे. आज राजकारण सोडून मोदीजींच्या उर्वरित सुप्त गुणांबद्दल विचार करुया.
मोदीजींनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी ह्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. खरोखरच चेष्टा नव्हे आपले योग्य विचार, प्रस्ताव हे तब्बल 175 देशांनी स्विकारणे. आपले म्हणणे समस्त देशांना पटवून सांगणे व त्यांना त्यावर अंमल करावासा वाटायला लावणे.
प्रत्येक व्यक्ती ला आपण स्वतः खूप आवडतं असतो,आणि असं आवडायलाच पाहिजे. खरी खासियत म्हणजे आपण लोकांना, इतरांना आवडणं,ते खूप कठीण असतं.व्यक्ती निरनिराळ्या कारणांमुळे आवडते तिच्या सौंदर्यामुळे, व्यक्तीमत्वामुळे .आवडणं एकवेळ सोप्पं पण लोकप्रिय होणं कर्मकठीण. ह्यासाठी चांगले कार्य, स्वार्थाचा त्याग लागतो. मोदीजींची अजून एक खासियत म्हणजे त्यांना लोकांमध्ये राहायला, मिसळायला,त्यांची मते जाणून घ्यायला आवडतं.त्यांचा जनसंपर्क अफाट आहे.तसचं ह्या साठी अत्यावश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान शिकून आत्मसात करून त्याचा सराईतासारखा वापर करणे हे पण अतिशय कौतुकास्पद. वय,व्यस्त दिनचर्या ह्या सारख्या कुठल्याही सबबी त्यांच्या कडून कोणीच कधीच ऐकल्या नाहीत.लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादाचीही ते जोड देतात. भारताचे सर्वाधिक टेक्नो-सॅव्ही नेते म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी ते वेबचा वापर करतात. फेसबुक, ट्विटर, गुगल, इन्स्टाग्राम, साउंड क्लाउड,लिंकडीन,वेबो ह्यासारख्या सोशल मिडीयावर ते खूप सक्रिय आहेत आणि ते ही संपूर्णपणे अभ्यासानिशी तयारी करून. जुलै 2015 रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक आणि अधिकाधिक वापर करणारी ही योजना आहे.अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची चाके जलद गतीने फिरतील आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील हा दूरवरचा विचार ते करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी ‘स्वच्छ भारत अभियान' सुरू केल्या गेले जी संपूर्ण देशात स्वच्छतेसाठी एक जनजागृती चळवळ ठरली.
कुठल्याही देशाचा उत्तरोत्तर विकास हा तेव्हाच होतो जेव्हा आपला देश इतर देशांच्या संपर्कात असतो,त्यांच्या विविध उपक्रमांचा एक हिस्सा बनतो. आणि नेमकी हीच गोष्ट मोदीजीं सारख्या चाणाक्ष नेत्याने ओळखली.त्यामुळे आपले विचार, विविध योजना ह्या सोशल मिडीयाचा योग्य भरपूर वापर करुन अख्ख्या जगासमोर आणण्याचे तंत्र आणि श्रेय हे मोदीजींकडे जातं.
नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित निर्णयांमुळे जागतिक व्यासपीठावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची खरी क्षमता आणि भूमिका समोर आली आहे. त्यांनी सार्क देशांच्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणाची जगभरात प्रशंसा झाली. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी 17 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नेपाळचा, 28 वर्षांनंतर ऑट्रेलियाचा, 31 वर्षांनंतर फिजीचा आणि 34 वर्षांनंतर सेशेल्सचा दौरा केला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, सार्क आणि जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहिले, जिथे विविध जागतिक, आर्थिक आणि राजकीय मुद्यांवरील भारताच्या भूमिकेची आणि मतांची व्यापक प्रमाणात प्रशंसा झाली. त्यांच्या जपान दौऱ्यामुळे भारत-जपान संबंधांचे नवीन पर्व सुरू झाले. मंगोलियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनले आणि त्यांचा चीन आणि दक्षिण कोरियाचा दौरा भारतात गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. त्यांच्या फ्रान्स आणि जर्मनी दौऱ्यादरम्यान युरोपबरोबर त्यांची सातत्यपूर्ण चर्चा सुरू असल्याचे जाणवले.अरब राष्ट्रांशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यावर मोदी यांनी भर दिला.ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी आखाती देशांचा दौरा केला. आखाती देशात 34 वर्षांत दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. आखाती देशांशी आर्थिक संबंध बळकट करण्यावर त्यांनी या दौऱ्यात भर दिला. जुलै 2015 मध्ये मोदी यांनी पाच मध्य आशियाई देशांचा दौरा केला. त्यांचा हा दौरा अनेक दृष्टीनं यशस्वी आणि आदर्श असा मानला जातो. ऊर्जा, व्यापार, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण करारांवर या दौऱ्यादरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या. ह्याबरोबरच अनेक देशांच्या लोकप्रतिनिधींनाही आपल्या देशात त्यांनी सन्मानपूर्वक निमंत्रित केले. ह्यामुळे या सर्व देशांबरोबर भारताचे सहकार्य सुधारण्यास मदत झाली. भारत आणि अमेरिका संबंधांच्या इतिहासात प्रथमच 2015 च्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.
ऑगस्ट 2015 मध्ये भारताने प्रशांत द्वीपसमूह राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले. प्रशांत द्वीपराष्ट्रांमधील महत्वाचे नेते या परिषदेत उपस्थित होते. भारत आणि प्रशांत द्वीपराष्ट्रांमधील महत्वाच्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.
गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्र ह्या विषयात त्यांनी एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
राजकारणाव्यतिरिक्त नरेंद्र मोदींना लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात कवितांचाही समावेश आहे.
अशा व्यक्ती आपल्या सगळ्यांसाठीच आदर्श आणि दीपस्तंभ असतात. सध्या जरा महाराष्ट्रामधून मोठमोठे प्रकल्प हातातून अलगद निसटल्यासारखे काढता पाय घेतात आहे.परंतु मोदीजींनी महाराष्ट्राला एक मोठ्ठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिलेले आहेत.आणि ह्या आधीही त्यांनी जी जी काही आश्वासन दिलेली होती ती त्यांनी पूर्ण केलेली असल्याने त्यासारखेच हे पण आश्वासन ते नक्कीच पूर्णत्वास नेतील.
अशा या भारताच्या वैश्विक पंतप्रधानास 72 व्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा .**










No comments:
Post a Comment